Nov 30, 2021
भयपट

झोपडी अंतिम भाग

Read Later
झोपडी अंतिम भाग

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
मिठी आवळली जात होती. जीव गुदमरायला लागलेला. त्यात कानापाशी तो गतीने श्वासोच्छ्वास घेण्याचा आवाज. हृदयात धडकी भरवणारा. हे काहीतरी वेगळच असल्याचं एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आजपर्यंत त्याचा अशा गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता ; पण आता तो स्वतःच असा भयानक अनुभव घेत होता. तो जोरजोरात पाय झाडून, शरीराला हिसके देऊन तिला आपल्यापासून दूर करायचा प्रयत्न करु लागला.
शेवटी त्याच्या शरीराभोवतीचा तिच्या हातांचा \" विळखा \" सुटला‌. ती त्याच्या समोर उभी राहिली. तिची ती जळजळीत नजर, ओठांवरच भेसूर स्मितहास्य, यांमुळे तिचा मूळचा सुंदर चेहरा वेडसर, भयानक दिसत होता. त्याकडे बघण अशक्य होऊन त्याने मान फिरवली.

" काय झालं साहेब ? असं तोंड का फिरवताय ? " तिने हलक्या आवाजात विचारलं. जवळ येऊन त्याच्या शर्टाची कॉलर पकडली, आणि हळूवारपणे त्याच्या गालांवरून ओठ फिरवू लागली. आता तिचा स्पर्श नकोसा वाटत होता. तो पुन्हा सुटकेसाठी तडफडू लागला.

" काय, किळस येतीये ? भीती वाटत आहे ? " आता तिच्या आवाजाला धार चढत होती‌. " प्रमोशनचं अमिष दाखवून, नाही जमलं निरनिराळ्या पद्धतीने धमकावून, घाबरवून मध्यमवर्गीय स्त्री कर्मचाऱ्यांच्या मजबूरीचा फायदा उठवतोस, तेव्हा त्यांना कसं वाटत असेल ? "
त्याला धक्काच बसला. हिला कसं समजलं ? तो असा विचार करत असतानाच त्यांचा कान पकडून तिने जोरात पिरगळला. त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.

" दुखतय ? तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या देवीसारख्या बायकोचा पदोपदी अपमान करतोस, तो रोज निमूटपणे सहन करताना तिच्या मनाला किती वेदना होत असतील, याचा कधी विचार केलास ? तुझ्या या कुकर्मांबद्दल तिला कळलं, तर तिचं काय होईल याचा विचार केलास ? "

" कोण आहेस तू ? " त्याने दबलेल्या आवाजात कसंबसं विचारलं.

" मी.. स्त्रीचं महत्व न जाणणाऱ्या, स्त्रीला खेळणं समजणाऱ्या तुझ्यासारख्यांचा मृत्यू." ती विलक्षण उद्विग्न स्वरात उद्गारली.

त्या शब्दांनी त्याच्या काळजात धस्स झालं. आता आपली यातून सुटका होणं जवळपास अशक्य आहे हे तो समजून चुकला. ती वळून दुसऱ्या भिंतीतल्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. आकाशातील चंद्राकडे पाहून बोलू लागली.

- पाच वर्षांपूर्वी अशाच एका रात्री एक कैदी जेलमधून पळून या जंगलात शिरला होता. त्याच्या मागावर पोलिसही आले होते. माझ्या दुर्दैवाने त्याला माझी झोपडी दिसली. तो आत घुसला. त्याच्या कपड्यांवरून तो कैदी असल्याच ओळखून मी त्याला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला ; पण त्यानं चाकू दाखवून मला गप बसायला भाग पाडल. थोडावेळ आजूबाजूला शोध करून पोलिस पुढे गेले. तो बिनधास्त झाला‌. मी त्याला इथून जाण्यासाठी विनवलं. तरी तो गेला नाहीच, उलट माझ्यावर.. माझ्यावर..." प्रदीप काय ते समजला‌.
" मी खूप विरोध केला. त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चवताळून त्याने माझा गळा दाबून जीव घेतला. काय चूक होती माझी ? मी दिसायला सुंदर होते ही ? सांगा ना. मला इज्जतीने जगायचा अधिकार नव्हता ? " मग क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली. " तरी मी शेवटी त्या कैद्याने माझा जीव घेतल्याबद्दल त्याचे आभारच मानेल. कारण हे असं घडल्यावर इथून बाहेर पडून लोकांना तोंड दाखवणं मला शक्य झालं नसतं. हे सगळ कुणाला माहीत नसल तरी माझ्या मनाला ठाऊक होतंच ना. कदाचित मी स्वतःच आपल आयुष्य संपवलं असतं."

प्रदीपने चमकून तिच्याकडे पाहिलं.

" आणि तेव्हाच मी ठरवलं, जेव्हा कुणी असा नीच प्रवृत्तीचा पुरुष या जंगलाच्या हद्दीत येईन त्याला मी हालहाल करून मारेन."

प्रदीप हतबुद्ध होऊन गेला होता. आपल्या आजवरच्या कर्मांच प्राक्तन समोर उभं असलेलं पाहून आणि निशाची करूण कहाणी ऐकून त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडलं होतं. मनाच्या एका कोपऱ्यात आपलं कृत्य चुकीचं असल्याची जाणीव सतत असायची ; पण त्याकडे तो सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचा. एखाद्या स्त्रीच्या मनावर याचा किती आणि कसा परिणाम होत असेल हे त्याला आजवर समजलं नव्हतं. ते आज समजलेलं. आपणही तेच करीत होतो जे त्या कैद्याने केलं. फक्त पद्धत वेगळी, सभ्य. आणि सुधा. आपण नेहमी तिचा अपमान केला. आपल्या पुरुषी अहंकारामुळे. ती मात्र आपल्या प्रेमापोटी सगळ निमूटपणे सहन करत राहिली. इतकंच काय आपण तिची फसवणूक केली. खरच तिला हे कळल तर तिची काय अवस्था होईन. नाही. आपल्यासारख्या घाणेरड्या विचारांच्या, वृत्तीच्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नाही.

" निशा बरोबर आहे तुझं मला जगण्याचा काही अधिकार नाही. मी स्त्रीचं महत्व समजू शकलो नाही. कित्येक स्त्रियांचा, स्वतःच्या पत्नीचाही घोर अपमान केला. मला मृत्यू हीच शिक्षा योग्य आहे." तो निश्चयी स्वरात म्हणाला.

निशा मागे वळली. त्याच्याकडे एकटक बघू लागली. जसं की त्याच्या अंतर्मनाचा वेध घेऊ पाहत होती. मग नकारार्थी मान हलवून आपल्या मूळ शांत, गोड आवाजात म्हणाली

" नाही साहेब. आता तुम्हाला तुमच्या चुक कळली आहे. पश्चात्ताप झाला आहे. आता मी हे पाप करू शकत नाही."

तिने पुढे होऊन त्याचे हात दोरखंडातून मोकळे केले. तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला. नकळत त्याचे हात जोडले गेले. मग गहिवरल्या मनाने तो तिथून बाहेर पडला. थोड पुढे गेल्यावर त्याने एकदा मागे वळून पाहिले. निशा झोपडीच्या दारातच उभी होती. स्त्री ही देवीच रूप असते हे त्याने मनोमन मान्य केले होते. त्याची पत्नी सुधाने त्यानं दिलेल्या हीन वागणूकीच्या बदल्यात त्याला केवळ निस्वार्थ प्रेम देऊन, आणि निशाने आज त्याला जीवदान देत, चांगला माणूस बनण्याची संधी देऊन हे सिद्ध करून दाखवले होते. दोघांच्याही ओठांवर स्मित उमटलं. तो पुढे निघून गेला.

निशाने रागाच्या भरात त्यावेळी प्रतिज्ञा केली होती खरी, पण एखाद्याला जीवे मारणं तिच्यासारख्या सौम्य मनाच्या स्त्रीला जमलंच नसतं. मात्र आज तिने प्रदीपच्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून त्याला माणूस बनण्या लायक केलं होतं. याचं तिला अपार समाधान वाटत होते. तिने डोळे मिटून घेतले, आणि अंतर्धान पावली.

आता तिथे राहिली होती, फक्त ती रिकामी झोपडी.

समाप्त
@ प्रथमेश काटे

अशाच उत्तमोत्तम मराठी कथा वाचण्यासाठी ग्रुपला भेट द्या -https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing