Nov 30, 2021
भयपट

झोपडी भाग ३

Read Later
झोपडी भाग ३

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

झोपडी

भाग २

     प्रत्येक पावलागणिक प्रदीपच्या मनातील अधीरता वाढत होती. डोळे समोरच्या झोपडीवर खिळलेले. या अधीरतेच त्याला जरा आश्चर्यच वाटलं. त्याने एकवार निशाकडे बघितले, आणि किंचित हसून मान डोलावली. मनातल्या अधीरतेचं कारण त्याला उमगल होत.

ते झोपडीपाशी पोहोचले. निशाने दरवाजा आत ढकलला, आणि दोघं आतमध्ये आले. बाहेरून एवढीशी वाटणारी झोपडी आतून बऱ्यापैकी मोठी होती. मध्ये भिंत तयार करून स्वयंपाकघर आणि बसण्याची खोली असे दोन भाग केले होते. आत येताच प्रदीपला दोन विचित्र वाटणाऱ्या गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे बाहेर ढगाळ वातावरणामुळे इतकं गरम होत असताना, इथे मात्र गारवा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठूनसा किंचित पण स्पष्टपणे जाणवणारा कुबट दर्प येत होता.

" निशा बाहेर इतकं गरम होत असताना, आत एवढा गारवा कसा ? आणि हा दुर्गंध कसला ? " त्याने न राहवून विचारलच.

" साहेब हा तुमच्यासारखा सिमेंट मातीचा बंगला नाही. आपल्याला ताजी हवा देणाऱ्या झाडांच्या लाकडांपासून बनलेली आहे ही माझी छोटीशी झोपडी. इथे नेहमीच गारवा असतो, आणि मला तरी कसली दुर्गंधी येत नाहीये बुवा." ती म्हणाली.
तिच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराने त्याचं समाधान झाले. तरी दुसरा प्रश्न होताच ; पण तोही तिच्या उत्तर देण्याच्या पद्धतीमुळे प्रदीप विसरून गेला‌. \" बुवा \" हा शब्द उच्चारताना तिच्या चेहऱ्यावरील लाडिक भाव, वाक्य पूर्ण केल्यानंतरची गोड स्माईल. सगळंच लोभस, बघत राहावंसं वाटत होतं.
ती पुढे काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्याने मोबाईल खिशातून काढून स्क्रीन वर नजर टाकली. त्यावरील नाव बघून त्याच्या डोळ्यात जराशी नाराजीची छटा उतरली. त्याची पत्नी सुधाचा कॉल होता.

" मी जरा बोलून येतो." तो म्हणाला. निशाने होकारार्थी मान डोलावली. तो बाहेर अंगणात आला.

" हॅलो, बोल. "

" अहो, कुठे आहात ? बारा वाजत आले. अजून नाही आलात." पत्नीने काळजीच्या सुरात विचारलं.

" हं, ते आज खूप कामं होती. त्यामुळे निघायला उशीर झाला, म्हणून एका मित्राच्या घरी थांबलोय." तो थंड आवाजात बेफिकीरपणे म्हणाला.

" अहो मग सांगायच नाहीत का ? मला भीती वाटत होती. एकतर असे पावसाळ्याचे दिवस. आणि.."

" बस बस. दिवसभर ऑफिसात मरमर कामं केल्यावर अशा फालतू गोष्टी नाही लक्षात राहात. तो घुश्शातच म्हणाला. " आणि मी कुठे पावसात नाही अडकलो, मित्राच्या घरी सेफ आहे. आता फोन ठेव." असं म्हणून त्याने मोबाईल खिशात ठेवला.
" काकूबाई कुठली." स्वतःशीच पुटपुटून तो आत गेला.

प्रदीपची पत्नी सुधा. त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती. दिसायला देखणी, चारचौघांत उठून दिसेल अशी. तरी साधी, सालस होती ती. आणि नेमका हाच त्याचा साधेपणा त्याला आवडत नव्हता. देवानं इतकं सुंदर रूप, एवढं ऐश्वर्य दिलंय, तर तिने जरा ताठ्यात रहावं, हिंडाव - फिरावं, मौजमजा करावी. स्वतः फ्री राहावं, आपल्यालाही स्वतंत्र राहू द्यावे अशी त्याची अपेक्षा. त्यात तो मुळातच \"अशा\" वृत्तीचा. आता तर तिला अजूनच खतपाणी मिळालं होतं. तो तिला काकूबाई समजू लागला होता. तिनं त्याच सगळ ऐकलं तर स्वतःची मतं नसणारी, नवऱ्याच्या हो ला हो करणारी नंदीबैल ; कधी त्याला विरोध दर्शवून आपलं मत मांडलं तर उद्धट. ती बिचारी मात्र नवऱ्याच्या प्रेमापोटी सगळ सहन करायची.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing