Dec 06, 2021
प्रेरणादायक

कोरोना पोसिटीव्ह.......बी पोसिटीव्ह.

Read Later
कोरोना पोसिटीव्ह.......बी पोसिटीव्ह.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मम्मा......... दलवाजा खो.....ल......मम्मा......

तिचा दीड वर्षाचा मुलगा दारावर टक टक करत तिला आवाज देत होता.
तिचा नाईलाज होता..... ती इच्छा असून पण दार खोलू शकत नव्हती.......कारण तिच्या शरीरात.... कोरोनाने प्रवेश केला होता.घरातच आयसोलेट होऊन फक्त सात तास झाले होते. अजून तेरा दिवस बाकी होते. सगळं सोडावं आणि जाऊन त्याला घ्यावं अस तिला सारख वाटतं होतं पण ती परिस्थितीपुढे हतबल होती.त्याच्या आवाजाने ती खचत चालली होती.

 

तिच्या नवऱ्याने घरातूनच तिला फोन लावला आणि मूला कडे बोलायला दिलं.

हॅयो....... मम्मा...... तू कुते आये...…..

हॅलो शोना......मम्मा ना तुझ्या साठी दूदू बिशकीत आणायला दुकानात आली आहे......

ओके दन..... मम्मा.......तू देवलीश.....भातु खालीश......मी ऍपल खल्ला...... चाऊन चाऊन.......


हो.......वा वा.... छान छान....... बरं आता मम्मा फोन ठेवते ओके.......बाय...... पिल्लू......टाटा......


बा.......य.........टाटा........मम्मा लबु......


लव्ह यू 2 पिल्लू.... ....


मुलाचा आवाज तर तिला तिच्या खोलीत येतच होता पण आता त्याच्याशी फोन वर बोलून तिला थोडं बर वाटत होतं पण तिला खूप रडू येत होतं

फोन ठेवतानाचा तिचा हुंदका तिच्या नवऱ्याने ऐकला होता. दुसऱ्या दिवशी तो तिला बॅग भरून ठेवायला सांगतो आणि सकाळी दहा वाजताच मुलगा उठण्याआधी तिला कोविड सेंटर ला घेऊन जातो. 


तिकडे एका रूम मध्ये तीन जण कोविड पेशंट अशी सुविधा होती. शिवाय चहा,नाश्ता, जेवण आणि गोळ्या सगळ्या ठरल्या वेळेत होतं. तिला तिकडे आयसोलेट होऊन दोन दिवस झाले पण ती मुलाच्या आठवणीने रडत होती. शेवटी तिसऱ्या दिवशी नवरा पुन्हा तिला भेटायला आला.


असं रडून कसं चालेल सांग बघू..........तू अशी रडत राहिलीस तर तुलाच त्रास होईल. डॉक्टर सांगत होते तुझी ऑक्सिजन लेव्हल खूप कमी आहे....... असच राहील तर तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. चालेल का तुला.....….."तो"


अं हं.........."ती"


काय अं हं...????" तो"

काही नाही........"ती"


मला माहित आहे तुझा जीव पिल्लुसाठी तळमळतोय.......पण आपला नाईलाज आहे की नाही...... असं खचून नाही चालणार.......तुला खूप स्ट्रॉंग रहावं लागेल.....आपल्या पिल्लुसाठी........आणि माझ्यासाठी पण........पिल्लू सारखं मम्मा मम्मा करत होता म्हणून तुला मी इकडे आणलं आहे आता लवकर ठणठणीत होऊन घरी ये......आम्ही सगळे तुझी वाट बघतोय......."तो"


हम्मम्म........."ती"


काय नुसतं मुक्या सारखी बोलतेस......मी नाही येणार इकडे रोज…...आता खूप रिक्वेस्ट केली तेंव्हा कुठे मला आत सोडलं आहे प्लिज यार अशी शांत नको राहू........"तो"


ती दीर्घ.......श्वास घेते आणि स्वतःचे डोळे पुसते.


मी आता नाही रडणार मी खूप स्ट्रॉंग होणार.........आपल्यासाठी आपल्या पिल्लुसाठी..... त्याला सांगा त्याची मम्मा लवकरच घरी येईल. ती डोळ्यातलं पाणी पुसतंच त्याला सांगत होती. 


तो पण तिला धीर देऊन जातो. तिचा मुलगा रोज फोन वर तिच्याशी बोलत होता. तिला भेटायचा हट्ट करत होता. घरात मम्मा नाही म्हणून इवलासा जीव गोंधळल्यासारखा झाला होता सैरभैर झाला होता. तिकडे तिची पण अवस्था तशीच होती.

चौदा दिवस पूर्ण होतात त्याच दिवशी तो तिला आणायला जातो.तो येण्याआधीचं ती तयार असते.जायच्या आदल्या दिवशी तिची पुन्हा कोरोना चाचणी करतात आणि ती निगेटिव्ह येते पण तरी घरी जाऊन आणखीन दोन दिवस तिला सुरक्षित अंतर ठेवून वावरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. घरात सगळ्यांना मास वापरण्यास बंधनकारक करतात.


ती घरी येऊन आंघोळ करते आणि देेव्हाऱ्यातल्या बाप्पा समोर दिवा लावते. कोरोना मधून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल देवाचे आणि देवरूपी डॉक्टरचे मनोमन आभार मानून ती माऊली तिच्या वासराला घ्यायला जाते.

 
मम्मा ला बघून त्याला काय करू नि काय नको असं होते. तो सारखा मम्मा मम्मा करत असतो. आई ला सारखा  पापा घेत असतो. आज चौदा दिवसांनी तिने तिच्या पिल्लाला उराशी कवटाळलेल असतं.

तिने कोरोनरुपी राक्षसाला हरवलेलं असतं........केवळ तिच्या पिलासाठी........

कथा कशी वाटली हे कमेंट द्वारे जरूर कळवा.

धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading