कोरोना लेखाजोखा

Corona


" *कोरोना लेखाजोखा"*


एक विषाणू आला..
जग बदलून गेला..


मजूरांची पायपीट ....
हातावरच्या पोटाची परीस्थिती वाईट ....


कित्येक सुटले, कित्येक अडकले, कुणाचे आपले म्हणणारे तुटले..
कित्येक घरातच राहून बचावले....


सगळेच जग आले कोरोना च्या विळख्यात..
जीवाला घाबरून सगळेच घरात आणि गृहिणी अडकल्या घरकामात....


रामायण , महाभारत, जुन्या आठवणीत रमले....
घराघरात नवनवीन पदार्थाचे बेत जमले...


डाॅक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार रियल हिरोचे जगाने आभार मानले.... ??
अनेक नागरीकांनी अन्नधान्य, दानधर्म खुप पुण्य कमावले.... ??


गरीब, कामगार, शेतकरी, मजूर हवालदिल झाले....??
केंद्राने, राज्याने पॅकेज जाहीर केले.... ????
तर कुणी त्यातही राजकारण केले....


बघता बघता महिने सरले....
ब्रेकींग न्युज, आकड्यांचे प्रमाणच वाढले....?


सगळे घरात पहिल्यांदाच
घडले ....?‍?‍?‍?
सहवास लाभला, प्रेम मिळाले, भांडण तंटे यांचे प्रमाणच वाढले.... ??


परीक्षा न देता विद्यार्थी पास झाले कुणाचे फावले, कुणी मात्र अडकले....??
कोरोना पथ्यावरच पडला, असे पहिल्यांदाच घडले.... ?


ग्रीन झोन, रेड झोन, ऑरेंज झोन आले....??❤️
संचारबंदी लागू, शिथिल अनेक बंधने आले.... ???


घरीच बसून खाणारेच शहाणे ठरले.... ?
मद्यप्रेमी चक्क अर्थव्यवस्थेचा कणा बनले.... ?


सोशल मीडिया वर सगळे active झाले....
चीन नी संकट आणले आता टारगेट वर आले....


घरीच रहा, स्वच्छ साबणाने मिनीटभर हात धुवा....??
कविता पुरे कामाचा झालाय खोळंबा.. ??


*- सौ. भाग्यश्री चाटी सांबरे* ???