Jan 23, 2021
माहितीपूर्ण

कोरोना - एक नविन व्यवसाय संकल्पना!

Read Later
कोरोना - एक नविन व्यवसाय संकल्पना!

कोरोना - एक व्यवसाय!

कोरोना हा शब्द ऐकताच आपल्या अंगावर काटाच येतो, परंतू आता काटा येण्याऐवजी कोरोनची किव येते; आणि त्या किव येण्याला कारण ही तसेच आहे एवढे दिवस थांबला तो त्याला वाटले सगळे नेहमीच त्याला घाबरून रहतील परंतू तो हे विसरलाच कि आम्ही भारतात देवी ०९, गणपती १०, रमजान २९ तर श्रावण सुद्धा ३० च दिवस पाळतो तर त्याला सुद्धा तेवढेच घाबरणर... बरे असो........

 

कोरोनाचे भाकित आणि त्याचे संदर्भ आपल्याला विविध लेख, कादंबरी आणि इतर विविध ठिकाणाहुन सापडतात; त्यांपैकी काही पुढील प्रमाणे:

१. अमेरिकन लेखक Dean Koontz यांचे १९८१ साली प्रकाशित करण्यात आलेल्या "दि आय ऑफ डार्कनेस" (The Eyes of Darkness) च्या संर्दभानुसार चीन स्वतःच्या फायद्याकरिता एक विषाणु शस्त्र म्हणून वापरेल असे भाकीत केले असुन, तो विषाणु "वुहान" मधुन येईल असेही म्हटले आहे.

२. सिल्व्हीया ब्राऊन(Sylvia Browne) यांच्या एंड ऑफ डेज्: प्रेडिक्शन अ‍ॅन्ड प्रॉफसी (End of days : Predictions and Prophecies) या पुस्तकामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कहिशे वर्णन आहे. हे पुस्तक २००८ साली प्रकाशित झाले होते. ब्राऊन यांनी तर या विषाणू ने होणारे त्रास सुद्धा अधोरेखित करण्यात आले होते.

३. २०११ साली प्रदर्शित झालेली "वॉर्नर ब्रदर्स" प्रस्तुत, "स्कॉट बर्नस्" लिखित "कन्टाजिअन" हा सिनेमा फक्त कोरोनाच्या भोवती फिरतो.....

इथे थोडेसे थांबून मला एक विचारावेसे वाटते; कि खरच सर्वांनी कोरोना चे भाकित केले होते की त्यांनी फक्त मत मांडले होते व चीन ने त्या सर्वांच्या कल्पनामात्र असलेल्या गोष्टी सत्य करुन दाखवल्या?? ही बाब तर विचार करण्याजोगी आहे!!

चला आपण एक वेळेस समजू कि जे भाकित झाले होते ते खरे होते व चीन ने त्यातून काहिच बोध घेतला नाही व जे जगामध्ये घडले आणि घडत आहे तो निव्वळ योगायोगच आहे; परंतू या सर्व योगायोगात कुठे ना कुठे विचार करण्याला आणि जिज्ञासू वृत्तीला चालना देऊन जाते.

आपण ह्या लेखामध्ये याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणयाचा प्रयत्न करुयात:

त्यातील काही ठळक आधोरेखित मुद्दे:

१. चीन च्या फक्त ०२ - ०३ प्रांता मध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झाला? उर्वरित चीन ह्या मधून कसा वाचला?? -- या मधून एक गोष्ट आर्वजून लक्षात येते कि चीन ने वरील सर्व गोष्टींचा संदर्भ वापरून स्वतः चे जगावर धिराज्य गाजवायच्या स्वप्नाला जणू चालनाच मिळाली व त्यांनी कोरोणा संदर्भाचा फायदा करून घेतला. फक्त जगाला दाखवण्यासाठी वुहान मध्ये विषाणू सोडुन जगभराला त्रास दिला आणि स्वतः ६० दिवसांच्या आत पुन्हा पुर्ववत झाले.

२. हा विषाणुला खरचं वटवाघूळ कारणीभुत आहे?? --चीन मध्ये आधीपासुनच विविध प्राण्यांचा मांसाहार केला जात होता; परंतू आजपर्यंत कोरोनामुळे एवढी बिकट परिस्थिती निर्माण झालीच नव्हती. होय १९६० साली याची निर्मीती करण्यात आली व त्याला जपून ठेवण्यात देखिल आले, पण चीन त्या विषाणु बद्द्ल विसरला होता; परंतु काहींच्या डोक्यात ती कल्पना अ‍जुनही होती व ती त्यांनी खरी करून सुद्धा दाखवीली.

३. चीन पुर्णपणे कोरोनामुक्त कसा झाला?? -- हा प्रश्न कदाचित खूप कमी लोकांना पडला असावा परंतु हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि याच्या मागचे कारण सुद्धा तसेच आहे.  कारण आपण सर्वांनी पाहिलं की चीनमध्ये कोरोनाच्या सुरुवातीला काय दशा व दिशा होती आणि आपण सगळे ही गोष्टसुद्धा जाणतो की कोणाचे कोणतेही औषध सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा जगात कोणत्याही देशाकडे उपलब्ध नाही तरीही चीनने कोरोना मुक्त होण्याची कामगिरी करून दाखवली हे त्यांना कसे शक्य झाले असावे??  याच्यामागे काही गुपित तर दडले नसावे ना??  किंवा चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नसावा?? किंवा फक्त थोड्या लोकांना कोरोना झाला आणि जगाभराला घाबरवण्यासाठी त्यांनी मोठा आकडा दाखवला आणि नंतर कोरणा मुक्त होण्याची कामगिरी सुद्धा करून दाखविली.  असेही असू शकते कि चीनकडे या विषाणूचे औषध उपलब्ध आहे किंवा त्यांनी त्याची निर्मिती सुद्धा केली असेल आणि जगावर अधिराज्य गाजविण्याची हेतूने त्यांनी ते जगासमोर  आणले  नसावे; जसे आपण पाहिले की चीन स्टॉक मार्केट मध्ये काय झाले सगळ्या युरोपियन कंपनीचे शेअर घसरले, कमी किमतीचे चीनने ते खरेदी केले आणि त्यानंतर त्यांच्या किंमती वाढून  ठेवल्या आणि अशाप्रकारे बहुतांशी युरोपियन कंपनीवर शुन्य आपला मालकी हक्क गाजवला.

असे आहे म्हणूनच प्रश्न पडतो की ज्या देशात दिवसागणिक हजारो करून पीडित आपल्याला मिळत होते आणि अचानक तिथे करुणा पीडितांचा शून्यावर जातो आणि त्या आपल्या स्वताला 100% कोरणा मुक्त घोषित करतात म्हणूनच आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे.

 

परंतू आपण फक्त चीन किंवा ईतर देशांकडे पाहत राहणे व स्वतःच्या देशाची आणि राज्याची परिस्थिती वर एक नजर न टाकणे व "मेरा भारत महन" बोलत राहणे जरा अतिशयोक्तीच होईल; म्हणुनच आपण पुढिल भागात दुसऱ्याच्या ताटामध्ये न डोकावता स्वतःपुढे काय परिस्थीति आहे आणि खरचं कोरोना म्हणजे एक प्रकारचा व्यापार बनला आहे का यावर लक्ष केंद्रित करु आणि मी माझ्या शिर्षकाला आपल्या समोर विस्तारित पणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि हो सर्वांनच माझे मत पटेल असे नाही, तरीही आपण आपला मौल्यवान वेळ माझ्या लेखाचा भाग २ वाचण्यास देऊन आपली मते कळवावीत......

 

तर मग भाग २ लवकरच आपल्या समोर मांडण्यात येईल......