बंधनच्या सर्व वाचकांसाठी

Social Love

बंधन च्या सर्व वाचकांसाठी:


नमस्कार,

 तुम्हा सर्वांना,  खरं तर मी हल्ली मनोगत वगैरे काही लिहीत नाही पण गेल्या भागाच्या कमेंट्स वाचून राहवलं नाही म्हणून हे आजचं छोटस मनोगत. तुमच्यापैकी बर्‍याच वाचकांना वाटते की कथा रेंगाळते किंवा भरकटते की काय!  तर मुळात 60-70 भागानंतरही कोणी लिहित असतं तेव्हा काहीतरी ठोस विचार घेऊनच तो पुढे लिहीत असतो आणि महत्त्वाची गोष्ट मी फक्त भाग लिहिते. कोणत्या भागात काय घडणार, कोण कसं वागणार, कोणते टर्न कधी येणार, मध्य, कथेचा शेवट सगळंच कथा मार्चमध्ये सुरू होण्याआधीच पेपर वरती तयार होतं. फक्त पार्ट लिहिणे सद्या सुरू आहे. त्यामुळे सगळी कथा फेब्रुवारीमध्ये ठरली होती.

 दुसरी महत्त्वाची गोष्ट सर्व कथा Stream of Consciousness  या प्रकारात आहे. It's a method that attempts to give the written equivalent of the character's thought process or in connection to his or her actions. वरवरच्या कथेपेक्षा ही मानसिक स्थित्यंतरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत . त्यामुळे प्रत्येक घटना, प्रसंग यांची रचना व त्यामागची कारणमीमांसा आधी मी पार्ट खाली एक्सप्लेन करायचे पण प्रत्येक वेळी सगळं सांगणं नाही शक्य.

 रक्षाबंधनचा 111 वा भाग. त्या घटनांची रचना मुद्दामून Positive, Negative, Positive, Negative, Positive केली होती जे एका वाचकांच्या करेक्ट लक्षात आलं. परवाही  लिओनार्दो द व्हिन्सी चं ते पेंन्टिंग तिथे मोनालिसाचं त्याचं चित्रही दाखवता आलं असतं पण तिथे येशुशी संबंधित चित्र होतं. कारण मागे गोव्यात विक्रम चर्चला तिला नेतो नी तिथे माफी मागतो असा सिन होता. चर्च, मंदिर, कुंकु, फुलं अश्या गोष्टींचा उल्लेख हा good vibes तयार करण्यासाठी असतो. सतत  त्या दोघांच्या बंधनाचं पावित्र्य दर्शवण्याचा तो प्रयत्न असतो. आताही कथेत ऑक्टोबर सुरू होईल आणि काही दृश्य ही नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर यायला हवी होती मला. ज्याला अॉबजेक्टिव कोरिलेटिव्ह टेक्निक म्हणतात.....  आता जून-जुलैमध्ये तर नवरात्र येत नाही म्हणून मोठ्या घटनांसाठी थोडा वेळ लागतोय. आता 116 भागामध्ये विक्रम पूर्णपणे बदललेला आहे. त्या घटनेनंतर मधले दोन भाग मुद्दामहून त्याची रिअॅक्शन किंवा त्याचं असणं नव्हतं कारण आता मानसिक पातळीवरती उद्वस्त तो पाहायला मिळेल आणि त्याची तिव्रता जाणवण्यासाठी म्हणून 116 मध्ये ते दोघ भेटतात तेव्हा तो फक्त तिला मिठीत घेतो त्याचं फार बोलणं नाहीय 116 मध्ये........  त्यातून त्याचं मेन्टली कॉलॅप्स होणं दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे.  त्यामुळे  प्रत्येक प्रसंगावरती बोलण्यासारखं खुप आहे पण वेळे अभावी ते शक्य नाही. इतरही बरंच काही ना काही सध्या सुरू आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी कंटाळले असतील, बोरिंग वाटत असेल तर खरच कळकळीची विनंती जस्ट लिव इट. प्रत्येक गोष्ट उलगडून दाखवण नाही शक्य. तुम्हा सर्वांच्या इथ वरच्या सोबतीसाठी धन्यवाद. खूप आभार आणि खरच तुम्ही कथा म्हणून वाचता. एक छानशी प्रेमकथा आहे त्यामुळे काहीच घडत नाहीय,कंटाळा वाटणं सहाजिकच आहे म्हणून कुणी बोअर झालं  तर खरच तुम्ही इतर कथा वाचायला सुरुवात करू शकता. वाचनाचा आनंद घ्या. पुन्हा आभार थँक्यू सर्वांना.

116 लवकरच

🎭 Series Post

View all