बंधन आणि त्यातील ' गुन्हेगार ' नायक

Social, Love

बंधन आणि त्यातील ' गुन्हेगार ' नायक

नमस्कार सर्व रसिकहो,
कसे आहात सगळे? अर्थात कथा एन्जॉय करत आहात आणि तुमच्या आवडीचे गोड भाग सद्या सुरु आहेत म्हणून तुम्ही खूश आहात याची पूर्ण कल्पना आहे. गोव्याचे भाग झाल्यानंतर तुम्ही त्यांचं फुललेलं नातं पाहायला खूप उत्सुक होतात खरं तर गोव्याच्या ट्रीपमध्येच त्यांच्यातलं ' बंधन ' फुलेल अशी तुमची आशा होती पण तिला सावरायला पुरेसा वेळ देऊन तिचं तिला रिअलाईज होणं गरजेचं होतं आणि बरेच भाग विक्रम पश्चात्तापापायी सगळं छान वागतोय का ते प्रेम आहे हे त्याचं त्यालाच समजत नव्हतं आणि शेवटी त्याने राजेशसमोर ते कबूल केलं आणि तिथून ते पुढे नातं फुललं. त्यांच्यात बोन्डींग लग्नाआधीपासूनच हळूहळू तयार झालं होतं फक्त त्यांनी ते एक्सप्रेस केलं नव्हतं एकमेकांसमोर जे साधारणतः सत्तराव्या भागापासून झालं. दर दहा भागानंतर कथेत नव वळण येतंय. सत्तर ते ऐंशी भागात त्यांच्यात घट्ट मैत्री झाली, नात्यात मोकळेपणा निर्माण झाला आणि ऐंशी पासून पुढे त्यांच्यातल तनामनाचं अंतर कमी होऊ लागलं आणि त्या नात्यामुळे तिला सावरायला अजून सोप झालं आणि हळूहळू ती स्वतःला पुन्हा आदर देऊ लागली. स्त्री म्हणून उभी राहिली आणि प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यातला छान क्षण म्हणजे आई होणं. त्या निर्णयापर्यंत ती येऊन पोचली आणि अश्या नाजूक टप्प्यावरती त्यांचं नातं उभं आहे जिथे पुढे जायचं असेल तर विक्रमला त्याचा अपराधीपणा आता बोलावा लागणार आहे त्यामुळे खरं सांगणं ही त्याला त्याच्या प्रेमाची गरज वाटतेय. 
          आता तुम्हालाही वाटतय की विक्रमच्या तोंडून तिला सत्य समजावं आणि राजेशच्या कारवायांविरूद्ध त्यांनी दोघांनी एकत्र उभं राहावं.......तर महत्त्वाचा मुद्दा कथेतले जे प्रेमाचे भाग होते ते कथेची गरज होती पण तुम्हाला माहीत आहे त्यांचं नातं आणि प्रेम हा कथेचा मुख्य मुद्दा नव्हे त्यामुळे आता कथा पुन्हा सामाजिक बाबींकडे जाईल.....अनघा - विक्रम एकत्र विरूद्ध राजेशचा खलनायिकी स्वभाव अस काहीही होणार नाही.......कारण गोष्ट नातेसंबंधावरती जाईल आणि विक्रमची शिक्षा हा मुद्दा बाजूलाच राहिल. अर्थात अनघाबाबत जे घडलं त्यात कोणतेच पुरावे नाहीयत फक्त लॉकेट जे कोणाचही असू शकतं आणि मुळात या घटनेलाही वर्ष होऊन गेलय त्यामुळे त्याला फाशी जन्मठेप अशी कायद्याची शिक्षा होणार नाही पण मागे म्हटल्याप्रमाणे 'पोएटीक जस्टीज ' चा वापर होईल आणि पुढचे भाग हे त्यासंबंधीचे असतील. त्यामुळे सगळं छान दाखवलत आणि मध्येच का अस असही तुम्हाला येत्या भागात वाटू शकतं तर त्याला आता पर्याय नाही कारण गुन्हा म्हटलं की शिक्षा आलीच. दुसरं अस कि, नताशा, समिहा, अरुंधती, नितू ही पात्र अजूनही स्थिर आहेत रादर त्यांना फार फुलवलेलं नाही पण आता जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा प्रत्येक पात्र आणि त्यांचे स्वभाव, त्यांच्या भूमिका हे महत्वाचं असेल आणि नताशाचं पात्र प्रचंड महत्त्वाचं आहे....जे पुढच्या भागांमध्ये समजेल पण कोणत्याही प्रकारे हा लव्ह ट्रँगल नसेल.  ते दोघं विरूद्ध राजेश असा संघर्ष नसेल कारण विक्रम हा ' गुड हिरो ' नव्हे त्यामुळे राजेश हा फक्त काही घटनांसाठी कारणीभूत असेल पण विक्रमने आधी जे काही चुकीचं केलय त्याचीच या ना त्या प्रकारे आता त्याला शिक्षा मिळत जाईल......काहीही झालं तरी ही चूक नव्हे आपण एका गुन्ह्याविषयी बोलतो आहोत त्यामुळे त्याच्या वागण्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न अजिबात नसेल.....कोणत्याही प्रकारे त्याच्या वागण्याचं समर्थन आणि  तिने शरणागती पत्करणं अस चित्र येणार नाही....कुठल्याही बाबीतून काहीही चुकीचा मेसेज जाणार नाही याची दक्षता घेऊन पुढे लिहिलं जाईल. त्यामुळे चिंता नको आणि कडू असले तरी पुढचे भाग वाचत रहा.
थोडी मनाची तयारी ठेवा. बरीचशी उलथापालथ पुढे होऊ शकते. पॅनिक होऊ नका. शांत रहा. भेटूया एका नव्या वळणावर. हे सगळं वाचून बरेचसे हळवे वाचक नाराज होणार आहेत याची कल्पना आहे पण आताच काही ओपन करता येणार नाही एकच लक्षात ठेवा,कथेच्या नावातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत........
Thank You 

Happy Reading

🎭 Series Post

View all