तडजोड ( Compromise)

एक वेगळी तडजोड
शर्वरी आज थोड्या घाईतच होती.घरातून निघताना घड्याळाकडे लक्ष गेले. नऊ वाजून गेले होते. ऑफिस ला जायला तिला अंमळ उशीरच झाला होता. तिने लगबगीने स्टेशन गाठले.तिची नेहमीची ट्रेन स्टेशन वरून सुटायच्या बेतात होतीच. तिने स्वतःचा वेग वाढवला. लेडीज डब्बा पकडायचा तिने खूप प्रयत्न केला.पण ती त्यात चढू शकली नाही.
ही ट्रेन गेली की पुढची ट्रेन मिळून office गाठलं की तिला नक्की लेट मार्क मिळाला असता.आणि सध्याच्या परिस्थितीत तिला तो परवडणार नव्हता.
मनाचा हिय्या करून येणाऱ्या दुसऱ्या डब्ब्यात ती चढली .एव्हाना तिला चांगलाच दम भरला होता.डोळे मिटून तिने श्वास नीयंत केला.डोळे उघडून पाहते तो काय...... तू चक्क gents डब्ब्यात चढली होती.आता तिला त्या कल्पनेनेच घाम फुटला.सगळे पुरुष तिला खावू की गिळू या नजरेने पाहत होते.अबालवृद्ध सर्वच जण ही काय येडी आहे काय...हिला पुरुषांचा डब्बा कळला नाही की काय.... या प्रश्नाकित चिन्हे चेहऱ्यावर मिरवीत तिच्याकडे पाहत होते. एकाने त्यावर मखलाशी केली " अहो काय हे महिलांचे अतिक्रमण सगळीकडे, ह्याचा स्पेशल डब्बा दिलाय ना यांना , मग इथे यांचे काय काम ? ह्या चढू देतील का ह्यांच्या राखीव डब्ब्यात आम्हाला.... , दुसरे महायुध्द होईल... " त्यावर पण एकाने विनोद केला "अहो ते झाले कधीचे आता तिसऱ्याची तयारी सुरू आहे." त्यावर खसखस पिकली डब्ब्यात... त्यावर शर्वरीने मौन धरणे पसंद केले.


सकाळची ऑफिस ची गर्दीची वेळ त्या गर्दीचा फायदा घेवून काही आंबटशौकीन  तिला स्पर्श करण्याचा  प्रयत्न करीत होते.तिच्या ते बऱ्यापैकी ध्यानी आले होते.पण बऱ्यापैकी गर्दी असल्याने परिस्थितीच अशी होती की ती काही करू शकत नव्हती.ती एका कोपऱ्यात शांत उभी होती.तेव्हड्यात नेहमी दारात राहून उनाडक्या करणारा एक तरुण फुडें सरसावला.तिच्या समोर येवून आवाजात काळजीचा सुर आणून त्याने तिला विचारले" अहो तुम्ही शिकलेल्या दिसता gent's  डब्ब्यात कश्या चढलात." त्यावर तिने कसा उशीर झाला कशी घाईत ती चढली ते सविस्तर सांगितले. त्याने काळजी करू नका मी आहे म्हणून धीर दिला.आणि तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिने तिला एकप्रकारे संरक्षणच दिले.त्यामुळे आता तिला दुसऱ्या कुणाचा स्पर्श जरी होत नव्हता.तरी तो तरुण बऱ्यापैकी गर्दीचा फायदा घेत तिला वारंवार स्पर्श करीत होता .तिला ते जाणवत होते.गर्दीतील काही पुरुष त्या मुलाच्या वागणुकीने राग प्रकट करीत होते , तर काही जण त्याचा मनातल्या मनात त्याच्याकडे असुयेने पाहत होते.
तिनेही सर्व विचार सोडून त्याच्यावर concentrate केले होते.त्याला वाटले आता ही पटली आपल्याला . ती शांत उभी होती.इतर पुरुषांपासून त्याने तिचे रक्षण केले.पण तिला धक्का मारण्याचा आणि स्पर्श करण्याचा त्याने एकही चान्स सोडला नाही.अखेर गाडी कल्याण ला थांबली.डब्ब्यात गर्दी बरोबर ती सुद्धा खाली उतरली. तो ही उतरला.उतरल्यावर त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला.त्यावर ती उत्तरली." धन्यवाद मित्रा बाकीच्या पुरुषांपासून माझे रक्षण केलेस त्याबद्दल.... आणि मला तुझ्या सारख्या उनाड मुलांची खूप चांगली सवय आहे.त्यामुळे ओळख करून घेण्याचा प्रश्नच नाही. आणि राहिला प्रश्न तू माझा स्पर्श करून फायदा घेतल्याचा.... तर तुझ्या माहिती साठी सांगते.मला कळत होते तू मला स्पर्श करीत होतास ...पण हेही माहीत होते की तू आणि तुझ्यासारखे पुरुष धक्का मारण्यापेक्षा   जास्त काही करू शकणार नाहीत या गर्दीत... आणि मी जास्तीचे काही करूही दिले नसते ....जर तू काही केले  असतेस तर तूला या गर्दीने चांगलेच चोपले असते.कारण या गर्दीतही मला मादी पेक्षा आई बहिणीच्या नजरेने बघणारे बाप आणि भाऊ पण होते . तुला वाटले मी तुला पटले तुझ्या गळाला लागले.हा काही चित्रपट नाही पाच मिनिटात पटायला.अनेक लोकांचे स्पर्श टाळण्याकरिता आणि धक्के चकवण्याकरिता मी केलेले ते compromize होते असे समज. आणि यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस..".असे बोलून अचंभित झालेल्या त्या उनाड पोराकडे वळूनही न पाहता शर्वरी चालू लागली.