रंग पवित्र नात्याचा...!

#ओ रंगरेज...! #अजिंक्यच्या कलरफुल शॉर्ट स्टोरीज...!

                   ०.६  रंग पवित्र नात्यांचा..!

#ओ रंगरेज..!
       "ए दादा, मला पण तुमच्यासोबत खेळू दे ना. मला पण, रंग लावा ना."
"ये गप गं शुभ्रा. तु अजून कच्चा लिंबू आहेस. जा घरात खेळ तु..!"  असं बोलल्यावर तु आईजवळ मुळूमुळू रडायची. मग आई तुला खूप समजावून सांगायची. डेअरी मिल्क द्यायची तेव्हा तु हसायची.
    -अविष्कारने जुनी आठवण काढली. दोघंही खळखळून हसत होते. शुभ्राला आज हळद लागली होती. आपला कच्चा लिंबू उद्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार असा विचार अविष्कारच्या मनात आला. नकळत डोळ्यातून अश्रूंची धार लागली. पण कच्चा लिंबूच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अविष्कारने तिच्या नकळत अश्रू पुसले.

-अजिंक्य देशमुख ©
#अजिंक्यच्या कलरफुल शॉर्ट स्टोरीज...!
# ओ रंगरेज..!

🎭 Series Post

View all