०.७ रंग विश्वासाचा...!
#ओ रंगरेज...!
मला चांगलंच आठवत आहे, तुला तुझ्या मित्रांनी डेअर दिलं होतं कि माझ्या चेहऱ्याला रंग लावून ये म्हणून. माझ्यापुढे येऊन उभा राहिला. पण तुझी हिंमत नव्हती होत. दरदरून घाम फुटला होता चेहऱ्यावर तुझ्या. प्रचंड घाबरून गेला होता, स्पष्टच दिसत होतं. शेवटी मीच पुढाकार घेतला होता. मीच तुला रंग लावला होता. खरंतर मलाही वाटत होतं कि माझ्या चेहऱ्याला सर्वात आधी रंग तुच लावावा. म्हणूनच मी हा प्लॅन अविनाशला सांगितला होता. त्यादिवशीची तुझी अवस्था आठवली कि आजही मला हसायला येते. जगाच्या वेगळी लव्ह स्टोरी होती आपली. कारण स्टोरीची सुरूवात मला करावी लागली होती. पण तुझ्याशिवाय बेरंग राहिली असती आपली स्टोरी. थँक्यू सो मच डीयर माझ्या आयुष्यात प्रेमाच्या रंगांची उधळण करून माझं आयुष्य रंगीबेरंगी केल्याबद्दल.
-तुझीच
विशाखा
-आज विशाखा-विशाल यांची पाचवी वेडिंग अॅनिवर्सरी होती. विशाखाने सरप्राइज म्हणून हे पत्र लिहिलं होतं.
-अजिंक्य देशमुख ©
#अजिंक्यच्या कलरफुल शॉर्ट स्टोरीज..!
# ओ रंगरेज..!
#अपने ही रंग मे मुझ को रंग दे...!