ओ रंगरेज..!

रंगपंचमी निमित्त विशेष सिरीज. ओ रंगरेज..! अजिंक्य च्या नजरेतून विविध रंगांची उधळण. वाचा आणि रंगा

                    ०.१. आयुष्याची परिक्रमा

#ओ रंगरेज...!
          "आयुष्यात बाबांना रंग खेळण्याचा सर्वात जास्त राग होता. स्वतः ही कधी खेळले नाहीत. आम्हालाही कधीच खेळू दिलं नाही. इच्छा व्हायची. पण बाबांच्या कडक शिस्तीपुढे आम्ही आमचं मन मारतच जगत आलो. " निलम तिच्या मुलाला सारंगला अश्रू पुसत सांगत होती.
   -त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी "होली सेलिब्रेशन" केलं होतं. सर्वच रूग्णांना गुलाल लावला होता. अनकॉन्शीयस स्टेटमधील सारंगच्या आजोबांना सुद्धा आज पहिल्यांदाच रंग लागला होता.
-अजिंक्य देशमुख ©
#अजिंक्यच्या कलरफुल शॉर्ट स्टोरीज

🎭 Series Post

View all