कॉलेज कट्टा...भाग1

Black marsidij eka mothya farmhaus var yeun thambate,gaditun kavya, gauri, rohit, aniket ani jayesh he pachahi best friend utartat....

कॉलेज कट्टा.. भाग 1

ब्लॅक मर्सिडीज एका मोठ्या फार्महाऊसवर येऊन थांबते, गाडीतून काव्या, गौरी, रोहित, अनिकेत आणि जयेश हे पाचही बेस्ट फ्रेंड्स उतरतात ...अंधार पडल्यामुळे बाहेरून नीटसं दिसतही नाही, सगळे  फार्महाऊसच्या आत जातात, जसा दार उघडल्या जातो तसे लाइट्स ऑन होतात आणि आतून आवाज येतो......

" happy birthday to you... happy birthday to you...happy birthday to dear kavya.... happy birthday to you....."

आता आल्यावर तिथे कुणीही नसतं , समोर टेबलवर हार्टशेप केक ठेवलेला असतो ,केक बघून काव्या खूप खुश होते, खरंतर आज काव्याचा वाढदिवस असतो..... काव्या आणि रोहित खूप जवळचे मित्र....रोहितची इच्छा असते की काव्याचा वाढदिवस मस्तपैकी फार्महाऊसवर सेलिब्रेट करावा म्हणून तो तिला त्याच्या फार्म हाऊस वर काही मित्रांसह घेऊन येतो..... समोर केक बघून काव्या खुप खुश होते , काव्या रोहित कडे बघून...

" रोहित, हे सगळ तू अरेंज केलस माझ्यासाठी ..... I am so happy....."

रोहित होकाराची मान हालवत...." yes,  फक्त तुझ्यासाठी......"

काव्या रोहितला बिलगुन....thank you, thank you so much..."

"तु माझा दिवस स्पेशल बनवलस.... हा माझ्या आयुष्यातला बेस्ट बर्थडे असेल...रोहित, अरे आता इथे गाणं वाजत होतं ना , पण इथे तर कोणीच नाही आहे.....

रोहित : " ते मीच अरेंज केलं होत....चल चल केक कट करूया या सर्व.....

काव्या केक कट करते... सगळे तिला विश करतात..... म्युझिक, डान्स, मस्ती सगळं होतं, ती संपूर्ण रात्र ते पाचही मित्र खूप धमाल करतात... पहाटे-पहाटे गौरी आणि काव्या एका रूम मध्ये आणि रोहीत जयेश आणि अनिकेत  दुसऱ्या रूममध्ये झोपायला जातात.... दहा अकरा च्या दरम्यान काव्याला जाग येते ती उठून रूमच्या बाहेर जाते....फॉर्महाऊस च्या बाहेर जाण्याचा मोह न आवारता आल्या मुळे काव्या फार्महाऊस च्या बाहेर जाते .....बाहेर मस्त ढगाळ वातावरण असल्यामुळे तिला समोर जाऊन थोडा फेरफटका मारायची इच्छा होते आणि ती फार्महाउस च्या समोर असलेल्या बगिच्यात जाते तिथे फळांची, फुलांची विविध प्रकारचे, इतर वनस्पतींची झाडे असतात ...काव्या मस्त प्रसन्न मनाने गाणं गुणगुणत चालली होती......

" आज मौसम बडा बेईमान है ,
बडा बेईमान है ,
आज मौसम......"

गुणगुणत चालत असताना तिचा पाय कशावर तरी पडतो, ती चालता-चालता थबकते , खाली बघते तर तिच्या पायाखाली टेडीबियर चा टॉय असतो, ती तो उचलते त्याला निरखून बघते... फेंट पिंक कलरचा टॉय बघून काव्या विचारात पडते,
"  हा टॉय मी कुठेतरी बघितला आहे ती मनाशीच पुटपुटते....."

मागेहून कुणीतरी कंबरेत हात घालून बिलगतं आणि काव्या दचकते आणि तिच्या हातातला तो टॉय खाली पडतो.…..

" रोहित , तू.... दचकले रे ..मी , आणि कमरेत काय हात घालतोस... कससं होतय.... कुणी बघितलं तर...."

" इथे कोण बघणार आहे , इथे फक्त आपण दोघे आहोत... ते तिघे तर झोपलेत आणि काय ग ? इतकी का दचकलीस ?

" काही नाही ....चालता चालता पायाखाली काहितरी आल तेच बघत होते....

रोहित: चल ..चल...तयारील लाग, आपल्याला रिटर्न निघायचंय....

सगळे तयार होऊन निघतात....संध्याकाळ पर्यंत सगळे आपापल्या घरी जातात... काव्याच्या डोळ्यासमोरुन ते टेड्डीबिअर टॉय जात नव्हतं.... का कुणास ठाऊक त्या टॉय ची आठवण आली की तिला अस्वस्थ व्हायचं.....

दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या कॉलेजला जायला निघाली , वाटेत तिला रोहित भेटतो पुढे दोघे सोबत निघतात, काव्या बिकॉमच्या फायनल इयरला होती... गौरी, जयेश ,अनिकेत सगळे फर्स्ट इयर पासून सोबत होते तर रोहित थ्री इयर बॅक होता... तीन वर्षापासून त्याची गाडी समोर जातच नव्हती... कॉलेजच्या पहिल्याच दिवशी काव्या आणि रोहित ची ओळख झाली आणि काही महिन्यातच पक्की दोस्ती.... संपूर्ण दिवस एकत्र घालवत असत.... कॉलेज मध्ये पोहोचल्यावर दोन-तीन क्लासेस झाल्यानंतर काव्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसली.. चेहऱ्यावरून अस्वस्थच वाटत होती तेवढ्यात रोहित आणि बाकीचे मित्र मैत्रीण आले...

गौरी :  "काय ग काऊ... इतकी अस्वस्थ का दिसतेस.. ( चिडवण्याचा सुरात ) कालचा थकवा गेला नाही वाटतं...

"गौरी, बस कर हं...

सगळे काव्याला रोहितच्या नावावरून चिडवायचे , ते दोघे खूप जवळचे, अगदी बेस्ट फ्रेंड होते ....

रोहित: " काय, आज आमच्या काऊ साठी काय ऑर्डर करायचं....?.

काव्या ( रुसलेल्या भावात ) : " काही नको,  आज माझा मूड नाही आहे....

गौरी : "हे काय ग, तुझ्यामुळे आम्हाला काहीतरी खायला मिळतं आणि तुझा मूड नाही आहे,  हे काय ग..?  चल फटाफट काहीतरी ऑर्डर कर.. क्लास ची वेळ होईल...

खाऊन पिऊन सगळे क्लासला जातात , कॉलेज संपल्यावर काव्या घरी पुन्हा त्याच टॉयचा विचार करत बसलेली असते ....

काव्याची आई:  काय ग काऊ..?  काय झालं .?काय विचार करतेस....?

" काही नाही....

" झोप आता,  सकाळी कॉलेज आहे ना ....काऊ जास्त वेळ मित्र मैत्रिणी सोबत हुंदळत जाऊ नकोस... अभ्यासाकडे लक्ष दे, तुझा रँक घसरायला नको... आपण मिडल क्लास चे लोक आहोत आपल्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असावा .... तो रोहित बघ,  किती वर्ष झाले बीकॉम होत नाहीये त्याच,  पण त्याला काळजी नाही ग... मोठ्या बिजनेस मॅन चा मुलगा आहे तो, शिकला.. नाही शिकला.. काही फरक पडत नाही , करोडोचा मालक आहे तो, पण आपल तसं नाही.... हो ना .....

"आई...आई... थांब जरा.. किती बोलतेस , आई माझा रँक नाही घसरणार,  मी तुझ आणि पप्पाच  मन कधीच निराश होऊ देणार नाही .... झोप आता.. चिल... goodnight....

काव्याची सेमिस्टर एक्झाम महिन्यावर आलेली असल्याने सगळे अभ्यासाला लागतात, सगळ्याचं भेटणं कमी होत आणि फोनवर बोलणेही कमी होते ....एक महिना अभ्यासात उलटतो...एक्झाम संपल्यानंतर सगळेजण रोहितच्या फॉर्महाऊसवर धमाल करायला जाण्याचा प्लॅन करतात.....

क्रमशः
28-11- 2020