कॉलेज कट्टा... भाग 2

Exam sampalyanantar kavya ani tiche friends rohitchya gadine, rohitchya farmhausevar gele,

कॉलेज कट्टा... भाग 2
आधीच्या भागात ,
काव्या आणि तिचे फ्रेंड्स फार्महाउस वरून धम्माल करून आले, परीक्षा जवळ आली असल्यामुळे काव्याच्या आईने तिला थोड अभ्यास करण्याबद्दल सांगितले,
"काऊ, अभ्यासाकडे जरा लक्ष दे... फिरणं, हुंदळन होतच राहील अभ्यास महत्वाचा ...एक महिन्यावर एक्झाम आली होती काव्या अभ्यासाला लागली ... परीक्षा संपल्यानंतर सगळ्यांनी फार्महाउस वर जाऊन धमाल करण्याचा प्लॅनिंग केलं...

आता पुढे,

एक्झाम संपल्यानंतर काव्या आणि तिचे फ्रेंड्स रोहितच्या गाडीने, रोहितच्या फार्महाऊसवर गेले ,तिथे पोहोचल्यानंतर फार्महाऊसवर रामुकाकांनी सगळ्यांना पाणी , नाश्ता वगैरे दिला ....रामुकाका फार्महाऊसच्या बाजूला एका छोट्या खोलीत राहायचे , रामुकाकाचं फार्महाऊसची देखरेख करायचे ..रामुकाका सोबत त्यांचा पुतण्या बंड्या राहायचा तो बागेची देखरेख करायचा... संध्याकाळी बाहेर सगळे फिरायला निघाले फार्महाऊसच्या बाजूला अर्धा किलोमीटरवर एक तलाव होत,  तलावाकिनारची हिरवळ,  किनारी लागलेली छोटी छोटी फुले मन मोहित करणारी होती ...रोहितने सोबत बंड्याला पण पकडले होते,  सगळ्यांची धम्माल सुरू होती म्युझिक ऑन करून सगळ्यांनी डान्स सुरू केला ... बंड्या एका साईडला बसलेला होता,  काव्याच लक्ष साईडला बसलेल्या बंड्याकडे गेलं,ती बंड्या जवळ जाऊन,

"  बंड्या दादा.... (त्याचं लक्ष वेधण्यासाठी तिने आवाज दिला)

" ताई,  काही हवय का तुम्हाला ? काही आणून देऊ का? तुम्ही सांगा फक्त ...मी यु गेलो आणि यु आलो...."

" नाही दादा, मला काहीच नको...

" मग काय झालं ताई ?तुम्ही असे नाचता नाचता का आलात?

" बंड्या दादा, मला काही विचारायचं आहे... तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा...

" काय ताई?

" त्या फार्म हाऊसच्या समोरच्या बगिच्यात काही घडलंय का ?

"  नाही ताई, असं का विचारताय ...

"नाही , काही नाही ....तुम्ही चला माझ्यासोबत तिथे.. मला तुम्हाला काही दाखवायच आहे.."

काव्या त्याला घेऊन बगिच्यात गेली, तिथे इकडे तिकडे सगळीकडे खूप शोधाशोध करत होती ...त्याला काहीच कळलं नाही तो विचार करून,
" ताई ,तुम्ही काय करताय...

" बंड्या , त्यादिवशी मी इथे आले होते तेव्हा मला इथे कपड्याच खेळणं दिसल, टेडीबिअर.... टेडीबिअर माहिती आहे तुम्हाला....

" कुत्र्याच्या पिल्ल्या सारखं ना , पाहिले मी.... आमच्या शेजारच्या ताईच्या मुलीकडे होतं तसं.....

" तसं तुम्हाला इथे कधी दिसलं ?.गुलाबी कलरच?
" नाहीतर, मला तर कधीच दिसलं नाही .....

"बंड्या दादा, आम्ही जेव्हा आधी इथे आलो होतो ना... तेव्हा मला या बागेत टेडीबिअर दिसल होत, मी बागेत आले होते चालता चालता माझा त्याच्यावर पाय पडला होता...

"पण मी तर इथे रोज साफसफाई करतो, मला तर कधीच दिसला नाही...

" पक्का बंड्या दादा...."

" हो ताई , मी खोटं कशाला बोलेन...."

" नाही दादा, तसं नाही....

" ताई काय झाल?  तुम्ही काळजीत दिसताय...

" नाही.. काही नाही,  तुम्ही जा...

बंड्या तिथून निघून गेला , काव्या थोडावेळ बगीच्यात बाकावर एकटीच बसलेली होती , डोक्यात विचारांचे काहूर माजलेले होते,  डोक्यातून काहीच बाहेर जायला तयार नव्हते, ती डोके वर करून डोळे मिटून शांत पडली होती ....अचानक डोळ्यासमोर एक चेहरा आला.... काव्या  दचकली आणि तिने डोळे उघडले तर समोर कुणीच नव्हतं.... काव्या खूप  घाबरली...आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं.... ती पुन्हा बाकावर बसली... डोळे मिटले... मागेहून रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवला काव्या जोरात किंचाळली...

" काय झालं काऊ..?..अग मी आहे....

" सॉरी.....

" अग घाबरलीस का?  आणि इथे काय करतेस?  सगळे तिकडे तलावा किनारी आहेत आणि तू इकडे एकटीच? 

"एकटीच नाही आले ..बंड्या दादा सोबत आले.. मला थकवा वाटत होता म्हणून विचार केला थोडा वेळ बसाव, म्हणून आले.. बाकी काही नाही..

" तू आत जा, मी सगळ्यांना बोलावून घे येतो...
रात्री जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले, गौरी झोपली पण काव्याला काही झोप येत नव्हती तिच्या डोक्यात ते विचार गिरक्या घालत होते तिला काहीच कळत नव्हतं काय होतंय कसाबसा तिचा डोळा लागला सकाळी जाग आली ती रोहिचा सुंदर गुड मॉर्निंग विष नी

" गुड मॉर्निंग काऊ.....

(काव्या अंगडाई घेत) ..गुड मॉर्निंग.....  काव्या बाजूला बघून ,
"गौरी उठली पण....

" हो उठली आणि फ्रेश पण झाली , सगळे उठले ...

"सॉरी मला रात्री खूप वेळ झोपच आली नव्हती....

" अच्छा...( रोहित लाडात येऊन, थोडा जवळ जाऊन)  मग आली का नाही माझ्याजवळ .....

काव्या त्याला ढकलत " रोहित प्लीज.....

" चल फ्रेश हो, आपल्याला मंदिरात जायचं आहे....

इथे मंदिर पण आहे ? काव्या आश्चर्याने...

"हो हो,  खूप प्राचीन मंदिर आहे ...तिथे आपल्या सगळ्या  इच्छा पूर्ण होतात , तिथे आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळतं , आपल्याला समाधान मिळतं...

" अच्छा...

" चल तू तयार हो,  मी खाली वाट बघतो...

काव्या तयार होऊन खाली गेली सगळे मंदिरात जायला निघाले मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व दर्शन घेऊन निघाले... काव्या मात्र विठ्ठलाच्या मूर्ती समोर हात जोडून उभी होती जणू देवाशी संवाद साधत होती तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मागत होती परतीच्या वेळी गाडीत चढताना रोहितच्या बॅगमधून काहीतरी पडलं , काव्यानी ते बघितल.. त्यावर दोन हार्ट जोडलेले होते एका हार्ट वर कॅपिटल लेटर मध्ये R होत आणि दुसऱ्यात A कोरलेलं होत...तिने रोहितला न सांगता स्वतःच्या मध्ये ठेवून घेतलं सगळे आपापल्या घरी परतले.....


दुसर्‍या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये काव्यानी संकेतला बोलावून घेतलं (संकेत रोहितचा जुना मित्र)  काव्या त्याला एकदोनदा भेटली होती,  काव्याकडे त्याचा नंबर होता... संकेत कॉलेजमध्ये पोहोचला..

" हाय.... काव्या....

काव्या छोटीशी स्माईल देत,  हाय ....

काय ग,  इथे का बोलवुन घेतलंस?  काही काम होतं.?

हो... चल ना आपण कॅन्टीनमध्ये बसुया...

दोघेही कॅन्टीनमध्ये गेले,  काव्याने बॅगमधून लॉकेट काढून संकेत समोर ठेवलं,

" संकेत तू या लॉकेट ला ओळखतोस,  नीट बघ.... आणि सांग....

"( संकेत हसून) नीट नाही बघितलं तरी मी सांगू शकतो हा रोहितचा लॉकेट आहे...

रोहितचा लॉकेट आहे हे मलाही माहिती आहे , R  अल्फाबेट रोहितचा हे दिसलं मला मी या दुसऱ्या अल्फाबेटचा अर्थ काय?.. काय आहे A चा अर्थ? काव्याने विचारल्या वर संकेतच्या चेहर्‍यावरचे हावभाव उडाले.....


क्रमश: