कॉलेज कट्टा... भाग 8

Inspector mohite yanni rohitchya college madhe jaun chaukashi karayache tharavale, dusrya divashi sakali inspector mohite college madhe gele

कॉलेज कट्टा... भाग 8
 आधीच्या भागात, 

समीरच्या एक्सीडेंट नंतर काही दिवसातच राजीवच्या संशयास्पद मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले..... इन्स्पेक्टर मोहितेंना संशय होता की समीरचा अकॅसिडेंट, राजीवचा खून आणि ते लॉकेट याचा रोहितशी काहीतरी संबंध आहे.... ते काव्याकडे चौकशीला गेले पण तिच्याकडून काहीच माहिती मिळाली नव्हती....
 आता पुढे,

इन्स्पेक्टर मोहिते यांनी रोहितच्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करायचे ठरवले, दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स पेक्टर मोहिते कॉलेजमध्ये गेले, तिथे गेल्यावर चपराश्याला ,

“ये, इथे प्रिन्सिपलची केबिन कुठे आहे?..
“ सर इकडून डावीकडून समोर जा, तिथे पाटी लावली आहे,”...
ओके, थँक्यू यु.....
 इन्स्पेक्टर मोहिते प्रिन्सिपलच्या केबिनचा दरवाजा उघडून,
“ येऊ का आत...
 प्रिन्सिपल: इन्स्पेक्टर साहेब या ना..
इन्स्पेक्टर आत गेले, प्रिन्सिपल सरांच्या पाटीवरच नाव वाचलं पी.वी पवार.....
“ मी काय मदत करू शकतो तुमची...” 
“मला काही माहिती हवी होती पवार साहेब....”
“ बोला....
“ या कॉलेजमध्ये काही वर्षांपूर्वी रोहित मुजुमदार नावाचा विद्यार्थी शिकायचा.....”
“ रोहित....मुजुमदार....हो...हो.. बोला त्याचं काय?...
“ मला त्याच्याबद्दल माहिती हवी होती...”
“साहेब, पाच वर्षे झालेत याच कॉलेजमध्ये आहे, अजून पर्यंत पास आऊट झालेला नाही... “बडे बाप की बिगडी औलाद “ माफ करा मला असं बोलणं शोभत नाही माहिती आहे, पण त्याच वर्णन असचं आहे ....”
“ नाही.. नाही .. साहेब...तुम्ही बोला, तुम्हाला त्याच्या बद्दल काही माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा..
“कधीच त्याच अभ्यासात लक्ष नसायचं, क्लास बंक करून कॅन्टीन मध्ये बसायचा, बसायचा नाही बसायचे..…”
“म्हणजे?..
“म्हणजे, टोळी होती मुलामुलींची...”
“साहेब, तुम्ही बाकीच्याबद्दल काही सांगू शकाल...
“हो चार पाच जणांची नावे आहेत माझ्या लक्षात...ती मी सांगतो, आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही प्रोफेसर अवस्थीना भेटा, ते तुम्हाला योग्य ती माहिती देतील.... त्यांच्या ग्रुपमध्ये रोहित,संकेत, राजीव, समीर, अरहान, अर्पिता, वेदिका इतके जण होते, हे सातही जण नेहमी सोबत असायचे, त्यातला संकेत चांगल्या नोकरीला लागली, वेदिकाच लग्न झालं म्हणजे ती कार्ड घेऊन आली होती कॉलेजमध्ये म्हणून कळलं, बाकीच्यांचा तर काही थांगपत्ताच नाही, रोहितनी अजून पर्यंत कॉलेज सोडलेलं नाही....
“ ठीक आहे, मी प्रोफेसर अवस्थीना भेटतो....”
 थँक्यू म्हणून इन्स्पेक्टर मोहिते त्यांच्या केबिनमधून निघाले त्यानंतर प्रोफेसर अवस्थीना भेटले, त्यांच्याकडून सगळ्यांची माहिती घेऊन , त्यांच्या घराचे ऍड्रेस घेतले.....

इकडे रोहित अरहानला भेटायला गेला होता, अरहानच्या घरी.....दोघे खूप वेळ एकत्र होते, संध्याकाळी रोहित घरी परत गेला.... बाहेर पाय मोकळे करावे म्हणून अरहान बाहेर पडला, थोड्या अंतरावर गेल्यावर अरहानला एक मुलगी भेटली, तिने अरहानचा हात पकडला आणि समोर काही अंतरावर एक तलाव होते तिथे घेऊन गेली,तलावाच्या काठाला एक टी पॉईंट होत, संध्याकाळी तिथे जोडपी फिरायला यायची....अरहान निशब्द होता म्हणजे त्याने काहीच रिऍक्ट नाही केलं, तो फक्त तिच्या सुंदर चेहर्‍याकडे आणि मोहक देहाकडे बघत होता.... ती त्याला तलावात घेऊन गेली... ती समोर तो मागे, ती समोर समोर गेली....पाणी गुडघ्या पर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत आणि मग मानेपर्यंत आलं तरीही अरहान निशब्द......
 तो भानावर आला जेव्हा त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागल, तो भानावर आला... हात पाय हलवू लागला... आजूबाजूला पाहिलं तर त्याला दूर दूर पर्यंत कोणीच दिसलं नव्हतं चारही दिशा अंधारानी काळोखल्या होत्या...अरहान घाबरला रपरप हात पाय चालवत कसातरी किनाऱ्यापर्यंत पोहोचला, किनारीच्या पायरीवर दोन्ही हात मागे टेकून, वर मान करून, डोळे बंद करून बसला होता आणि दीर्घ श्वास घेणार तितक्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याने वळुन पाहिलं तर तिथे कुणीही नव्हतं... आता अरहान खूप घाबरला तिथून उठला,रपरप रस्ता कापत कसाबसा घरापर्यंत पोहोचला... अंगाला भिनलेले ते कपडे, चेहऱ्यावरच्या घामाच्या धारा,तो फुललेला श्वास, सगळं नकोस झालं होतं त्याला... घरी आल्याआल्या अंगातले कपडे काढून फेकले, ज्या हाताला हात धरून तिनी नेलं होत तो हात दहा वेळा धूतला, त्याला त्या हातांची सुद्धा चिढ यायला लागली... खूप विचित्र फील करत होता तो, रात्री न जेवता झोपला, झोप लागते कुठे रात्रभर कूस बदलत जागा होता.... सकाळी उठल्या उठल्या रोहितला फोन करून घरी बोलावून घेतलं, रोहित गेला “काय झालं अरहान?....
अरहान थोडा घाबरला होता, तो काहीच न बोलता स्तब्ध बसला होता,
“ तू काही बोलणार आहेस का?...
अरहान नी रोहितला संपूर्ण प्रसंगाचे वर्णन सांगितले, रोहित ही थोडा घाबरला.... समीर आणि राजीवच्या मृत्यूचे गूढ अजून उलघडले नव्हते आणि हे आता अरहान सोबत जे घडलं ते बघता सगळं खूप भयंकर घडतं असल्याचे दोघांनाही जाणवलं.... रोहितला वाटलं शहराबाहेर जाव पण त्याला तशी परमिशन नव्हती, रोहित अरहानला कसाबसा सावरून त्याच्या घरी गेला, आता रोहित घरा बाहेर निघतच नव्हता......

 इन्स्पेक्टर मोहिते संकेतच्या घरी गेले,संकेतच्या आईने दार उघडला....
“संकेत आहे?...
“ हो आहे....
 संकेत... पोलिस आलेत दारात... संकेत आतून आला... काय केलस रे बाबा पोलीस आलेत दारात... 
“आई तू काळजी करू नकोस ते चौकशीसाठी आले असतील .....
“या ना.. सर.. बसा..
“संकेत, तू रोहितचा बेस्ट फ्रेंड आहेस ना....”
“ होय सर.....”
“ मग तू समीर आणि राजीवला ओळखत असशील....”
“ हो ओळखतो म्हणजे ओळखत होतो....”
“ त्या दोघांबद्दल तूला सगळी माहिती आहे ना...”
“ हो सर....
“ तुझं काय मत आहे यावर...
“ नाही सर मला याबद्दल जास्त काही  सांगता येणार नाही, मी फक्त कॉलेजच्या वेळेतच त्यांच्यासोबत असायचो, बाकी वेळ नाही... ते नेहमी सोबत असायचे, त्यांना जास्तच वाईट सवयी होत्या म्हणून मी त्यांच्यासोबत जास्त नाही राहायचो, फक्त कॉलेजपुरतीच आमची भेट असायची....
“अच्छा, ही अर्पिता कुठे राहते..... ? काही माहिती आहे तुला...
“ नाही सर, तिचं लग्न झालं असेल बहुतेक...
.संकेतच्या बोलण्यात आता अवघडलेपणा आला ,बहुतेक तो खोटं बोलत असावा, असा संशय इन्स्पेक्टर मोहितेंना आला...
“तू काही लपवतोस का?
“ नाही सर, त्यात काय लपवण्यासारखं साहेब मला जे माहिती होते ते मी तुम्हाला सांगितलं ...
“अच्छा, ठीक आहे मी निघतो.. गरज पडली तर तुला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावण्यात येईल....

 दुसऱ्या दिवशी अरहान रोहितकडे जायला निघाला, दुपारची वेळ असल्यामुळे रस्ते थोडे सामसूम होते, अरहान बाईक वरून निघाला होता, अर्ध्या रस्त्यात त्याला एक मनमोहक देहाची सुंदर तरुणी दिसली , तिने दुरून लिफ्ट चा इशारा केला अरहान नी बाईक थांबवली आणि तिला लिफ्ट दिली... अरहान नी मस्त सुसाट बाईक चालवायला सुरुवात केली, अरहान बेभान झाला होता, बाईकच्या समोरच्या मिरर मध्ये तिच्या चेहऱ्याकडे त्याचे लक्ष होतं, तीन ते चार किलोमीटर सुसाट बाईक  धावली, नंतर अरहानच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या रस्त्यावर आलो... त्यानी त्या मुलीला विचारलं,
“ तुम्हाला कुठे जायचे आहे?
 ती म्हणाली , तुम्ही जिथे जाल तिथे...
 “हे बघा मी रस्ता भरकटलोय, तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे सोडून देतो, तुम्ही सांगा”
 ती पुन्हा तेच बोलली तुम्ही जिथे जाल तिथे....
अरहानची बाईक सुसाट होती , तो कुठे चालला त्यालाही कळत नव्हते, बाईक थांबली ती रोहितच्या फार्महाऊसवर ....
ती उतरली... तिच्या मनमोहक देहाकडे बघून अरहान भान विसरला.....   

 क्रमशः