कॉलेज कट्टा... भाग 7

Hello hello rohit ektos na hello hello Rohitne phone uchlun h sanket bol Are kal ratri samircha accident zala

कॉलेज कट्टा...भाग 7

आधीच्या भागात,

काव्यानी रोहितशी जमलेलं लग्न मोडलं, इन्स्पेक्टर मोहितेंनी लॉकेट ची माहिती काढली होती,रोहित त्याच्या मित्रांसोबत डिनर ला गेला होता तिथे त्याच्या मोबाईल वर एक फोन आला , “ रोहित मला वाचव, ती मला मारून टाकेल...मला वाचव रोहित......एवढं बोलल्यानंतर फोन बंद झाला, रोहितने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच कळले नव्हते...दुसऱ्या दिवशी सकाळी संकेत चा फोन आला, त्याने सांगितल ,समीर इज नो मोर , हे ऐकताच रोहितच्या हातून मोबाईल खाली पडला.....

आता पुढे,

हॅलो....हॅलो रोहित ऐकतोस ना....हॅलो...हॅलो...

रोहितने फोन उचलून,”ह..संकेत बोल...”

“अरे, काल रात्री समीरचा ट्रकखाली येऊन अकॅसिडेंट झाला...(समीर गायकवाड हा रोहितचा मित्र होता) आता रोहित आतून हादरला, आतापर्यंत जे काही घडलं त्याला ते सगळं सहज वाटत होतं , पण या अकॅसिडेंट नी त्याला घाबरायला भाग पाडल....त्याच दिवशी दुपारी इन्स्पेक्टर मोहिते रोहितच्या घरी गेले..रोहित घरातच होता, रामुकाकांनी इन्स्पेक्टर ला बसवलं आणि रोहितला बोलवायला त्याच्या रूम मध्ये गेले, रोहित आला, इन्स्पेक्टर ला बघून रोहितच्या चेहऱ्यावर चे हावभाव बदलले....त्याला घाम फुटला...

“बोला ना इन्स्पेक्टर साहेब...”

“हे दोन्ही लॉकेट तुझेच आहेत ना....

“नाही सर त्यातला एक माझा आहे दुसरा माहिती नाही....” “पण दुकानदारानी तर आम्हाला सांगितलं की हे दोन्ही लॉकेट तूच त्यांच्याजवळून घेतले होतेस ...”

“नाही सर, खोट बोलत असेल तो..

“ अच्छा तो खोट बोलत असेल, नाही का.... ठीक आहे आपण मानून चलू की तो खोटं बोलतोय, मग तू सांग हा लॉकेट तू कुठून घेतलास....

“सर मला आता आठवत नाही, खूप वर्षं झाली याला.....

ओके...इन्स्पेक्टर नी खिशातून लॉकेट काढुन रोहितला विचारले,

“ह्या लॉकेटमध्ये दोन अल्फाबेट आहेत, R म्हणजे रोहित आणि A म्हणजे...कोण आहे..

“सर ते मी....रोहित बोलता बोलता अडखडला...तितक्यात रोहितचे बाबा तिथे आले,

“नमस्कार सर, आज इकडे कसं काय येण केलतं...”

“काही नाही थोडी चौकशी करायची होती म्हणून आलो होतो... इन्स्पेक्टर रोहित कडे बघून,

”रोहित तू समीर ला ओळखतोस?..

“समीर...कोण समीर, मी नाही ओळखत कोणत्या समीरला...

“पण त्याच्या मोबाईल मध्ये लास्ट डायल कॉल वर तुझाच नंबर आहे.... 42 सेकंड बोलणं झालय त्यात...

“नाही सर,तो दुसऱ्या कुणाचा नंबर असेल..मी नाही ओळखत...

“ओके, इन्स्पेक्टर सोफ्यावरून उठून,” मी निघतो गरज पडली तर पुन्हा येईल... समीर ची बॉडी पोस्टमार्टेम ला पाठवण्यात आली, पोस्टमार्टेम च्या रिपोर्ट मध्ये दम घुटून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं, आता इन्स्पेक्टर मोहितेंसमोर एक आव्हान होत, हा अकॅसिडेंट , की मर्डर.....

इन्स्पेक्टरला संशय होता की त्या लॉकेटचा, रोहितचा आणि त्या अकॅसिडेंट चा काहीतरी कनेक्शन आहे..त्या दिशेने तपासणी सुरू झाली, समीर कुठे राहायचा, काय करायचा, त्याच्या घरी कोण कोण आहेत, त्याचे मित्र कोण आहेत, कुठे जायचा, कोणासोबत जायचा या सगळ्यांची माहिती काढण्यात आली, इन्स्पेक्टर मोहितेंना समीरच्या घरचा पत्ता मिळाला, त्यांनी कॉन्स्टेबल ला समीरच्या घरी पाठवलं, त्याच घर एका चाळीत होत, घरी गेल्यावर, कॉन्स्टेबल नी आवाज दिला दरवाजा एका म्हाताऱ्या आजीबाईनी उघडला,

“ आजी समीर इथेच राहतो ना...

आजीच्या कमी ऐकू येत असल्यामुळे त्यांनी पुन्हा विचारलं, कोण पाहिजे? कॉन्स्टेबल जोरात,

” आजी हे समीरचच घर आहे ना...

“हो..हो..म्हणत आजी रडायला लागल्या...

“काय झालं आजी....?

“माझा नातू 3 वर्षापूर्वी घरच्यांसोबत भांडण करून निघून गेला...तो अजूनही आलेला नाही...

आजी रडू नका, घरात कुणी आहे का अजून, आजी काही बोलणार तितक्यात एक बाई माणूस तिथे आले,

“आम्ही त्याचे आई वडील आहोत, बोला काय विचारायचं तुम्हाला, ह..काहीतरी घोळ केला असेल त्यानी अजून काय...

“समीरचा अकॅसिडेंट झालाय... समीरची बातमी ऐकल्यावरही त्यांना फारसे फरक पडलेला दिसला नाही.. कॉन्स्टेबल ने सांगितलं की ,

“ मुलाचा खून झाल्याची शक्यता आहे, तुम्ही त्याच्या बद्दल काही माहिती देऊ शकाल का?... त्यांनी चक्क नकार दिला,

” आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, जेव्हा होता तेव्हा ही सुख दिलं नाही आता मेला तरी सुख नाही, त्यांनी कॉन्स्टेबलच्या तोंडावर दार लावलं... आजूबाजूला चौकशी केली असता असं माहित पडलं की समीरला वाईट सवयी लागल्या होत्या... दारू, सिगारेट ,जुआ या सवयीने तो ग्रासला होता, त्याच्या मित्रां बद्दल माहिती काढता अशी माहिती मिळाली की राजीव नावाचा मित्र नेहमी त्याच्या सोबत असायचा, दोघेही नेहमी सोबत असायचे दोघांनाही सारख्या सवयी होत्या पोलिसांनी राजीवचा तपास करायला सुरुवात केली..... समीरच्या चाळीच्या समोरच्या चाळीतच राजीव राहात होता... पोलीस राजीव च्या घरी गेले तेव्हा माहिती पडलं की चार महिन्यांपासून आजोळी गेला होता.....

आठ दिवस तपासणीत गेले, पोलीस राजीवच्या शोधात त्याच्या आजोळी गेले तेव्हा त्यांना माहिती झालं की राजीव चार पाच दिवसापासून तेथे नाहीत त्याला कुणाचा तरी फोन आला आणि तो तिथून निघून गेला, असं त्याच्या मामाने सांगितले .... दोन दिवसानंतर पोलिसाला निनावी फोन आला, समोरच्याने सांगितलं की गावालगतच्या नाल्याजवळ एक माणूस मृतावस्थेत पडून आहे इन्स्पेक्टर मोहितेंनी गाडी काढली आणि ते त्या घटनास्थळी पोहोचले बॉडी चे निरीक्षण करता असे आढळून आले की त्या व्यक्तीच्या मानेवर वळ होते, हातापायावर नखाचे निशान होते, सगळ्या पाहणी वरून हेच लक्षात आलं होतं की त्या व्यक्तीची हत्या झालेली होती, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली..... पण हा व्यक्ती कोण आहे ?..हा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता.....याचा तपास करणे सुरू झालं, गावातल्या काही लोकांकडून त्याची ओळख पटली राजीव बोस असं त्याचं नाव होत, त्याच्या मामाच्या ओळखीच्या लोकांनी पोलिसाला माहिती दिली होती रोहितच्या कानावर ही गोष्ट आली रोहित आणखीनच घाबरला....

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले समीरच्या लास्ट डायल कॉल मध्ये रोहित चा मोबाईल नंबर असल्यामुळे पोलिसांनी रोहितला चौकशीसाठी बोलावले, पण रोहितच्या बाबांची वरपर्यंत ओळख असल्यामुळे रोहितला चौकशी न करताच सोडून देण्यात आले, पण त्याला शहराच्या बाहेर जाण्याची परमिशन नव्हती.... पोलिसांच्या आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही काही सुगावा लागत नव्हता.... पोलिसांनी सगळीकडे तपास केला, समीर आणि राजीवच्या चाळीतही तपास केला, त्यांच्याबद्दलची सगळी चौकशी केली.. चौकशीमध्ये असे निदर्शनास आले की रोहित या चाळीत नेहमी जायचा.... रोहित, समीर ,राजीव आणि अरहान हे चौघे मित्र सोबत असायचे, चौघांनाही वाईट सवयी होत्या, एकापाठोपाठ दोन हत्या झाल्यामुळे कुठले धागेदोरे जुळेना रोहितला विचारपूस करता त्याच्याकडून काहीच माहिती मिळाली नव्हती.....

इन्स्पेक्टर मोहिते काव्याला भेटायला गेले, काव्या आणि रोहित बेस्ट फ्रेंड होते त्यांना वाटलं काव्या कडून काहीतरी माहिती मिळेल ....मोहिते काव्याच्या घरी गेले ,

“कशी आहे काव्या बेटा ?

“मी बरी आहे.... आज ईकडे कसं येणे केलं....

“ थोडी चौकशी करायची होती....

“बसा.. “बोला, काय माहिती हवी आहे तुम्हाला....

“ तू रोहितला किती वर्षा पासून ओळखतेस....

“ मी त्याला कॉलेज पासून ओळखते जवळजवळ दीडवर्ष झालीत....

“फक्त दीड वर्ष...

“हो..का...

“दीड वर्षात काय ओळखलस तू?... तुमचं लग्न होणार होत, हो ना...

“हो...पण आता मी ते मोडलं...

“का?.... काव्या गप्प होती..इन्स्पेक्टर मोहिते ते जाऊदे तू मला सांग

“तू त्याच्या मित्रांना ओळखतेस...?

“हो ओळखते....

“तू समीर आणि राजीव ला ओळखतेस....”

काव्या प्रश्नार्थक चिन्हाने,

”समीर आणि राजीव...... मी कधी ही नावे ऐकली नाही, मी कुणाच्याच तोंडून कधी हे नाव ऐकलं नाही...पण तुम्ही हे सगळं का विचारताय... समीर नावाच्या मुलाचा अकॅसिडेंट झाला आणि त्याच्या मोबाईल मध्ये लास्ट डायल कॉल वर रोहितच नाव आहे... 42 सेकंद बोलणं होत त्यांच, अकॅसिडेंट च्या आधी..... आता रोहितचा त्याच्याशी काय संबंध आहे, हे तपासायला हवं....

क्रमशः

समोर आता काय घडणार आहे,  हे बघूया पुढील भागात ...तुम्हाला हा भाग कसा वाटला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा..

©® ऋतुजा