Login

कॉलेज कट्टा ... भाग 6

Bandyacha aawaj ekun sagale bagechya dishene jayala lagale, sarvatra andhar pasrala hota

कॉलेज कट्टा...भाग 6

आधीच्या भागात,

काव्याची मिसिंग रिपोर्ट देऊन सगळे घरी परतले, बंड्या नेहमीप्रमाणे बागेत झाडांना पाणी द्यायला गेला आणि तिथून जोरात ओरडला, साहेब.........त्याची किंचाळी संपूर्ण फार्महाऊस ला भेदून गेली...

आता पुढे,

बंड्याचा आवाज ऐकून सगळे बागेच्या दिशेने जायला लागले, सर्वत्र अंधार पसरला होता, भयाण शांतता पसरली होती, त्यात फक्त पक्ष्यांची किर्रर्रर आवाज एवढाच काय तो कानात भेदत होता....सगळे बागेत आले, बंड्या डोळे फाडून मूर्ती सारखा उभा होता,

रामुकाका: बंड्या काय झालं रे?, का ओरडलास?

रामुकाका त्याला हलवू हलवू विचारत होते, त्याने काहीही न बोलता फक्त हात वरती करून समोर इशारा केला....सगळ्यांनी त्या दिशेने पाहिले तर काव्या तिथे पडून होती, सगळे धावतच तिच्याजवळ गेले,

“काव्या, काव्या बाळा उठ, काव्या उठ....अस म्हणत काव्याची आई रडायला लागली...

रोहित जवळ गेला,

“काकू शांत व्हा आधी, तिला आत नेऊ द्या....” रोहितने तिला दोन्ही हातांनी पकडून उचललं, काव्याच्या हातून काही खाली पडलं, रोहित मागे पलटला आणि पाहिलं तर तो लॉकेट होता, “हा लॉकेट इथे कसा ?”रोहित स्वतःशीच पुटपुटला ....

“काय झाल रोहित ने तिला आत....

“हो बाबा.... रोहितने काव्याला आत नेऊन बेडवर लेटवल... आणि डॉक्टरांना फोन केला, रोहित धावत बागेत जाऊन तो लॉकेट घेऊन आला, घाईघाईत त्याने तो लॉकेट जीन्स च्या खिशात ठेवला,रोहितच्या बाबांनी इन्स्पेक्टर ला फ़ोन करून कळवलं....थोड्या वेळाने डॉक्टर येऊन चेक करून गेले,

“काव्याला संपूर्ण आरामाची गरज आहे, तिला कसलाही स्ट्रेस देऊ नका,” अस डॉक्टरांनी आवर्जून सांगितल....

थोड्या वेळाने इन्स्पेक्टर मोहिते आले,

“ येऊ का आत?...

“अरे, मोहिते सर या..या बसा....

“कुठे आहे काव्या?...

“ काव्या आत आहे, आताच डॉक्टर तपासून गेले....”

“मी भेटू शकतो तिला? ..

“हो, पण मोहीते सर ,डॉक्टरांनी सांगितलंय तिला जास्त स्ट्रेस देऊ नका....

” रिलॅक्स, तिला त्रास नाही होणार, ओके ( मोहिते स्मितहास्य देऊन ) ....इन्स्पेक्टर मोहिते काव्याच्या रूममध्ये गेले, तिच्या बेड जवळ बसून,

“कशी आहेस काव्या?...

“मी बरी आहे...”

“काव्या तुला काही प्रश्न केलेत तर चालतील का? तुला बोलता येईल ना, नाहीतर मी नंतर येतो...

“नाही नाही विचारा तुम्ही..., माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळत नाही आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीत तर बरंच होईल.....

“तू काल हॉस्पिटलमध्ये होतीस ना.....”

“हो....

“मग आज इकडे कशी आलीस तू....”

“ मला माहिती नाही सर, मला जाग आली तेव्हा आई शेजारी झोपली होती, एक मुलगी आत आली, तिने माझा हात पकडला आणि मला इकडे घेऊन आली.... त्यानंतर काय झालं मला नाही माहिती.. आणि हो तिनी माझ्या हातात एक लॉकेट दिलं होतं... ( तिने हाताकडे बघून ) “माझ्या हातात तर काहीच नाही आहे”... माझ्या हातात जसा लॉकेट होता सेम लॉकेट मी रोहित कडे बघितलं होतं आणि रोहितच लॉकेट माझ्याकडेच होत... आता हे तेच आहे का बघावं लागेल....

“तू तुझ्याजवळ चा लॉकेट कुठे ठेवला आहेस?”

“माझ्या बॅग मध्ये आहे...” आई माझ्या बॅग मधून घेऊन ये... काव्याची आई लॉकेट घेऊन आली....

काव्या : हा बघा, असाच लॉकेट तीनी मला दिला...

“तो लॉकेट कुठे आहे?

 “बगिच्यात पडला असेल बहुतेक.....

काव्याशी बोलत असताना इन्स्पेक्टर मोहितेंच लक्ष रोहितच्या जीन्स कडे गेलं...रोहितच्या जीन्सच्या खिशाच्या बाहेर चैन आलेली दिसली...इन्स्पेक्टर रोहितकडे बघून ,

“हे तुझ्या खिशात काय आहे रोहित?....

रोहित चाचपडत...,हे..हे...

“काढ ते खिशातून, दे इकडे.... रोहितने लॉकेट काढलं आणि त्यांच्या हातात दिल....इन्स्पेक्टर मोहितेंनी ते दोन्ही लॉकेट आजूबाजूला धरून बघितले तर दोन्ही सेम होते, अल्फाबेट ही सेम होते...त्यातला एक लॉकेट रोहितचा होता हे नक्की पण मग हा दुसरा लॉकेट कुणाचा?....

इन्स्पेक्टर मोहिते: रोहित हा दुसरा लॉकेट कुणाचा?

रोहित चाचपडला: “नाही मला नाही माहिती....(एका लॉकेट कडे बघून) हा तर माझा आहे, दुसरा मला नाही माहीत....

काव्याला त्रास होऊ नये म्हणून मोहितेंनी चौकशी थांबवली आणि ते निघून गेले, जातानी दोन्ही लॉकेट सोबत घेऊन गेले...पोलिसांनी लॉकेट नेल्यामुळे रोहित थोडा घाबरला, काव्या लॉकेट चा विचार करत बसली होती....

दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर दोन कॉन्स्टेबल ला सोबत घेऊन बागेची पाहणी करायला आले होते. .पण पाहणीत काहीच आढळलं नाही....दोन तीन दिवस असेच निघून गेले,सगळ्यांची मनस्थिती बिघडली होती, अर्धवट राहिलेलं लग्न अर्धवटच राहील कारण आता काव्यानीच लग्नाला नकार दिला होता, तिच्या मनात आता लग्नाची इच्छाच उरलेली नव्हती, काव्याला आतून पोखरल्या सारखं वाटत होतं..... एक आठवड्यानंतर फार्महाउस वरून सगळे आपापल्या घरी परतले, काव्या तिच्या रूममध्ये खिडकीजवळ निराश होऊन बसली होती ....रोहित आणि संपूर्ण कॉलेज फ्रेंड्सचा ग्रुप तिला भेटायला गेला, सगळे रूममध्ये गेले , काव्याची अवस्था कुणालाच बघवत नव्हती.... बाहेरून बरी दिसत असली तरी आतून पोखरली होती, काव्याच्या फ्रेंड्सनी काव्याला बरं वाटावं म्हणून तिला गार्डन मध्ये घेऊन गेले, फेरफटका मारला, थोड्या गप्पागोष्टी रंगल्या..... काव्या रोहित जवळ येऊन , “आय एम सॉरी रोहित..... मी तुला लग्नाला नकार दिला आणि तरीही तू मला भेटायला आलास, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही असं नाही मुळात मला आता लग्नच करायचं नाही, आय एम सॉरी रोहित...... रोहित काव्याच्या डोक्यावर हात फिरत

"इट्स ओके काऊ , एवढा विचार नको करूस .... मी तुझी मनस्थिती समजू शकतो....

बराच वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर काव्या घरी परतली , एक आठवडा उलटला.... काव्या थोडी नॉर्मल झाली, इन्स्पेक्टरनी त्या लॉकेट चा पत्ता लावला.... कॉलेजच्या बाजूला असलेल्या शॉप मधून रोहितने ती दोन्ही लॉकेट घेतली होती म्हणजे असा दुकानदाराचा अंदाज होता कारण असे अल्फाबेट कोरलेले लॉकेट बनवणे हे त्याच्या दुकानातच होतं होत... पण रोहीतने ते लॉकेट नक्की कधी नेले हे त्याला आठवत नव्हतं.... रोहित त्याच्या काही जुन्या मित्रांना भेटायला गेला, संकेतही त्याच्या सोबत होता, हॉटेलमध्ये डिनर चा प्लान ठरला होता, दिलेल्या वेळेत सगळे हॉटेलवर पोहोचले, डिनर झालं.... सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या...तितक्यात रोहितच्या मोबाईलवर अननोन नंबर वरून फोन आला,

“ हॅलो.....

समोरून आवाज आला “ हॅलो रोहित , मी समीर बोलतोय ....

“समीर बोल ना ,तू एवढा घाबरला का ? काय झालं?

“ रोहित ती मला मारून टाकेल, मला वाचव.... रोहित मला वाचव.... बोलता बोलता फोन बंद झाला..... रोहितनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला , पण त्याला काही कळलं नाही रोहित घरी गेला.... सकाळी रोहितला जाग आली ती त्याच्या मोबाईलनी, संकेत चा फोन आला होता,

“ हॅलो रोहित, तुला कळलं काय ?...

रोहित झोपेतच.. "काय संकेत सकाळी सकाळी काय झालं?"

रोहित जागा हो , आणि नसशील जागा झालास ना तर आता होशील...ऐक....

"समीर इज नो मोर" हे ऐकताच त्याच्या हातून फोन खाली पडला.....

क्रमश:

0