कॉलेज कट्टा... भाग 11 अंतिम

Kshnatach Kavya kay zal tu ashi ka radtes Arpita Ag mi swati aahe

कॉलेज कट्टा... भाग 11 (अंतिम)


 आधीच्या भागात,


 इन्स्पेक्टर मोहितेंनी रोहित आणि अरहानला अटक केली... संकेतनी अर्पिता बद्दल इन्स्पेक्टर मोहितेंना सगळ  सांगितले, त्यावेळी केस कशी बंद झाली होती, आणि इन्स्पेक्टर शिव्हरे ची ट्रान्सफर झाली होती,  हे सगळं संकेतनी इन्स्पेक्टर मोहिते ला सांगितलं , याहीवेळी रोहितच्या बाबांचे रोहितला सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते पण त्याच्या आईबाबांनी एफ आय आर नोंद केली असल्यामुळे केस कोर्टात गेली होती....
 काव्याला भेटायला स्वाती आली होती, काव्या : तू अर्पिता आहेस, आहेस ना अस बोलून काव्या अर्पिताला बिलगली आणि दोघी ढसाढसा रडल्या.....

 आता पुढे,
 क्षणातच....
“ काव्या काय झालं?, तू अशी का रडतेस....
 “अर्पिता......
“ अगं मी स्वाती आहे..... स्वाती..... काव्या तिच्याकडे बघतच राहिली...
“स्वाती... मला आता अर्पिता.......स्वाती अग मला तुझ्यात अर्पिताचाच चेहरा दिसतो, पहिल्या दिवशी जेव्हा तू मला भेटायला आली होतीस तेव्हाही मला.... तुझा चेहरा....आणि मी इन्स्पेक्टर मोहितेंना ......

“स्वाती तू माझ्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये चल, दोघी पोलीस स्टेशन मध्ये गेल्या,
इन्स्पेक्टर मोहिते: “काव्या तू इथे...”
“ सर त्या दिवशी, ती फोटो पाहून मी म्हणाले होते की त्या फोटोतली च मुलगी माझ्या घरी आली होती, माझ्याकडे आलेली ही(स्वाती कडे बघून) होती.. 
 “म्हणजे ही स्वाती....”
“हो सर...”
“अच्छा, या स्वातीच्या चेहऱ्यात तुला अर्पिताचा चेहरा दिसायचा..”
“ स्वाती तू रोहितला कशी ओळखतेस?...”
“सर मी त्याची बाल मैत्रीण आहे, मी त्याला चांगल ओळखून आहे... 12 th पर्यंत आम्ही सोबत होतो त्यानंतर मी मामाकडे शिकायला गेले, पण मी होते त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉलेजमध्ये अर्पिता त्याच्या लाईफ मध्ये आली आणि अर्पितासोबत हे सगळं घडलं, त्यानंतर काव्या आली... आता काव्यासोबत हे सगळं घडू नये असं कदाचित तिला वाटत असेल,  तिच्या आत्म्याला अजूनही शांति मिळालेली नसावी, तिच्याकडूनच मला हे संकेत मिळाले असावेत, हवतर  अस समजा.... 
 इन्स्पेक्टर मोहिते:  म्हणजे आता आपण हे समजूया, स्वाती ही निमित्त होती आणि आता अर्पिताला न्याय मिळणार.....
 दोन दिवसानंतर रोहितला कोर्टात हजर करण्यात आलं.... पुरावे आणि साक्षीदार नसल्यामुळे कोर्टाने  रोहित आणि अरहानला आठ दिवस पोलिस कस्टडी मध्ये ठेवण्याचे आदेश दिले, पोलिसांना त्यांच्याकडून सर्व माहिती काढून ती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले.... पोलिसांनी थर्ड डिग्री चा वापर करून रोहित आणि अरहानकडून सगळी माहिती मिळवली... रोहितनी बोलायला सुरुवात केली, त्या रात्री...
 मी एकटाच नव्हतो माझ्यासोबत माझे मित्रही होते, आम्ही गार्डनमध्ये बसलो होतो म्हणजे मी आणि अर्पिता,  आमच्या गप्पा सुरू असताना तेथे अरहान, राजीव आणि समीर हे तिघे आले, माझ्या मनात काही वाईट नव्हतं पण या तिघांची नजर फिसलली, आणि यांनी तिच्यावर..........
“ तू तेव्हा कुठे होतास?..
“ मी तिथेच समोर उभा होतो....
“ तमाशा बघत?...
“ नाही सर, मी तिला नाही वाचवु शकलो... त्यांनी मला बांधून ठेवलं होतं..... 
“तू खोट बोलतोस.....
“ नाही साहेब...
“खर सांग.... आता तरी खरं खरं बोल...
 रोहित रडायला लागला....
“ साहेब आम्हीच सगळ केल, आम्हीच सगळं केलं साहेब.....
“मारून का टाकलत?....
“सर, घाबरलो होतो आम्ही, ती कुणाजवळ काही बोलेल याची भीती वाटली आणि म्हणून........
“ म्हणून मारून टाकलत तुम्ही तिला... तिच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी होती ती.....

“ बॉडी कॉलेजच्या मागे कशी गेली?....
“ तिला मारून तिची बॉडी तिथे नेऊन टाकली ,कोणाला काही संशय येऊ नये म्हणून..... आम्हाला माफ करा साहेब, आम्हाला माफ करा....?
“ माफी..... तुम्हाला तर चांगली शिक्षा होईल, कठोर शिक्षा......

 आठ दिवसानंतर दोघांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं, वकीलाद्वारे   रोहितने दिलेली बयाना ची कॉपी  जज ला दाखवण्यात आली,  जज नी संपूर्ण माहिती वाचली आणि काहीही  वेळ न घालवता निकाल लावण्यात आला, रोहितच्या बाबांनी समोरची तारीखेची मुदत मागितली  पण जज ने ते फेटाळून लावल,    अरहान आणि रोहितला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.... 
केस हाय कोर्टातून सुप्रीमकोर्टात गेली, रोहितच्या बाबांचे प्रयत्न सुरूच होते, सुप्रीम कोर्टानेही त्याच शिक्षेला मंजुरी दिली....

 सगळ्यांना खूप आनंद झाला, तीन वर्षांनंतर का होईना रोहितला शिक्षा मिळाली, अर्पिताच्या आत्म्याला शांती मिळाली आणि मुख्य म्हणजे दुसरी आणखी एक अर्पिता होण्यापासून वाचली...... काव्याला खूप आनंद झाला पण दुखही तेवढच झालं कारण रोहित सारख्या मुलावर प्रेम केले याची खंत तिच्या मनात घर करून गेली .......
काव्या अर्पिताच्या घरी, तिच्या फोटोला हार घालून थँक्यू अर्पिता तु मला वाचवलस ,आज जर हे झालं नसतं तर कदाचित एक दोन वर्षांनी माझा असाच भिंतीला फोटो लागलेला असता..... थँक यु थँक यु सो मच .....

अशा कितीतरी अर्पिता आज या जगात आहेत, कितीतरीजनांची जीवन उध्वस्त झालीत ..... हे सगळं झाल्यानंतर काव्यानी मनात निश्चय केला,  यानंतर कुणाशीही मैत्री करायची नाही.... प्रेम तर नाहीच नाही.....काव्या आज अनमॅरीड आहे आणि एका संस्थेत काम करते....अशी संस्था जिथे अश्याच टाकून दिलेल्या स्त्रियांना शेवटचा उपाय ‘मरण’ हा दिसतो अशा स्त्रियांना ही संस्था जीवन जगण्याची नवी उमेद देते ..... ज्या स्त्रियांवर अशी परिस्थिती आली तर त्यांनी न डगमगता नवीन जीवनाची सुरवात करावी, या विषयावर या संस्थेत मार्गदर्शन केले जाते... काव्या नी 100 पेक्षा जास्त मुलींना नवीन जीवनदान दिले आहेत, तिने तिच आयुष्य  संस्थेला अर्पण केल,  आता पुन्हा कुणीही नवीन अर्पिता निर्माण होऊ नये हाच तिचा एकमेव उद्देश......

समाप्त...

तुम्हाला माझी संपूर्ण कथा कशी वाटली नक्की कळवा...आणि आवडल्यास लाईक, कंमेंट्स आणि शेअर कारायला विसरू नका....
धन्यवाद....