Jan 22, 2021
कविता

नभ झाकोळून येता

Read Later
नभ झाकोळून येता

नभ झाकोळून येता
मन दाटुनिया आलं
सर बरसुन जाता
कसं निरभ्र झालं

वळणावरी वाटेच्या
कसं मन डुबकलं
आस्ते आस्ते जा ग पोरी
कुणी माये हाकारलं

लांब पल्ला गाठायाचा
मनी काहूर काहूर
अधेमधे थंडावते
गार वाऱ्याची झुळूक

पोचलीस की कळव
सय करिते आर्जव
मागेपुढे मागेपुढे
जीवाचिया तगमग

-----सौ.गीता गजानन गरुड.