लहानपणी शाळेत ढग कसे तयार होतात हे आपण सगळेच शिकलोय.आपल्याला निळ्या निळ्या आकाशातले पांढरे शुभ्र मऊ मऊ कापसाच्या गादीसारखे दिसणारे ढग माहीत आहेत. पावसाळ्यात काळे होऊन दाटणारेही ढग माहीत आहेत. ईतकच नाही तर चंद्रासारखच ढगही आपल्यासोबत चालतात असही वाटतं. वेगवेगळ्या आकारात म्हणजे कधी कृष्णाचा रथ तर कधी वेगवान धावणारा घोडा अशा विविध प्रकारच्या आकारात ते दिसतात. आणि जेव्हा आकाश रंग बदलते तेव्हा तर ढगांना वेगळाच ढंग चढतो.हो कधीतरी खूप छान वाटत या ढगांकडे पाहून... पण कधीतरी खूप बैचेन व्हायला होतं.तेव्हा तर आपण हेही विसरतो की ढग कसे तयार होतात...?
आकाशातले ढग सगळेच जाणतात पण मग मनातल्या ढगांच काय....???आकाशाएवढ विस्तीर्ण आपलं मन आणि त्यात त्या ढगांच अचानक दाटून येणं.....काय या मनात दाटणाऱ्या ढगांचा कधी खोल जाऊन अभ्यास केला का...??ते कसे तयार होतात? त्यांचा आकार, रंग, रूप कसं आहे..?तर,फार फार तर आपण काही खोलात शिरत नाही. अचानक दाटून आलं तर पावसासारख बरसतो....नाहीतर मग "गरजते बादल बरसते नहीं"...असं समजून दाटलेल मनातच साठवून ठेवतो....आणि मग उगाच ते मन एका कोपऱ्यात रडत कुढत बसतं.
म्हणूनच म्हणते ,जरा मनातल्या ढगांचाही अभ्यास करा...कारण कितीतरी जणांच्या मनातील ढग केवळ काळे आहेत.... दाटून आलेले आहेत..... नवा रंग कधी त्यांनी ल्यालाच नाही......
शाळेत फक्त आकाशातला ढग शिकवतात.मनातल्या ढगाला आपल्यालाच शोधायच असतं ,वाचायच असतं ,समजून घ्यायचं असतं......मनातला ढग इंटीग्रेशन मध्ये नाही शिकवला जात हो........!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा