गुणी सुना - भाग ४

प्रस्तुत कथेत मी सासूबाई आपल्या सुनांना गुणी असण्याचीखरी परिभाषा काय असते हे कसे शिकवतात याचा उलगडा केला आहे.
        मागील भागात आपण पाहिले की वहिनींच्या मुलाचा अभ्यास तेजल छान घेते.सिलिंडर बुकिंग करते.बँकेची कामे,मुलांचे स्कॉलर शिप फॉर्म भरणे,घरातील वीजबिल,पणीबिल,टीव्ही रिचार्ज,इंटरनेट रिचार्ज सारे काही शिताफीने करते. पण एक गुणी सून होण्यासाठी सर्वच यायला हवं हे तिला माहीत होते म्हणून स्वयंपाक तेवढा तिला एवढा जमत नव्हता ; आणि हीच खंत तिच्या मनात सलत होती.पण तरीही जे जमते ते काम व्यवस्थित करून घरच्यांना खुश करण्याचा ती प्रयत्न करत असते.
पण वर वर तिच्यावर खुश असण्याचा दिखावा करत तिच्यावर जळणारी एक व्यक्ती घरात असते ती म्हणजे सुजाता वहिनी. आता पाहूया पुढे..

वहिनी मनोमन विचार करतात,

  ' तेजल बाहेरची कामे तर अगदी हातसफाई ने करते. फक्त हिला आता भाज्या येत नाहीत.मी नाहीच माझा हा ताबा सोडणार स्वयंपाकघराचा. ही बया अख्ख घर ताब्यात घेईल,माणसे हीचेच ऐकतील,मलाही ही एक दिवस हुकूम करेल.मग माझी किमंत कवडीमोल ठरली तर? इतक्या वर्षांपासून आपण कोणाला काय हवे नको ते पाहत आलो.मग ही कालची मुलगी,म्हणजे हिला जर आपण अशीच अती सूट दिली तर माझ्याच डोक्यावर बसून मिरे वाटेल .त्यापेक्षा हिच्यासोबत थोरलेपणाचा रुबाब गाजवलाच हवा.थोडी हिडीस फिडीस करायला हवी म्हणजे ही माझ्या ताब्यात राहील,अन् हळूहळू घरातील माणसेही माझ्या इशाऱ्यावर नाचतील.'
एक दिवस स्वयंपाकघरात घरात कोणी नाही असे बघून सुजाता वहिनी म्हणतात,
" तेजल जरा इकडे ये."
" काय हो वहिनी?"
" अगं तुला सांगितलं ना, स्वयंपाकघरात कामे झाल्यावर सर्व आवरून ठेवायचं लगेच म्हणून.काय हा पसारा?"
" अहो वहिनी मी आता आवरणारच होते.मी ना ऑनलाईन शॉपिंग कशी करायची असते हे छोट्या देवला सांगत होते.तो खूप मागे लागला होता,मला सांग कसे करतात हे शॉपिंग म्हणून."
" अगं नुसत बाहेरच्या कामांत तरबेज असून चालत नाही.बाईला सारीच कामे परफेक्ट यायला हवी."
" हो वहिनी मी शिकण्याचा प्रयत्न करतेय."
" हो ना मग शिक लवकर!"
तेजल जरा घाबरतेच. वहिनी याआधी कधीही तिच्याशी असे बोलल्या नव्हत्या.मग आज काय झाले? तरीही तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.
थोड्या वेळाने पुन्हा वहिनी म्हणतात,
" तेजल, अगं निदान घर झाडायला तर शिक व्यवस्थित.काय हे इथे टेबल खाली किती चिवडा सांडला आहे.."
" वहिनी,अहो देवने तिथे चिवडा खाल्ला.झाडते मी तिथे लगेच ."
तेजल आता मात्र विचार करू लागते,
' वहिनींना झालं तरी काय आज? मी जरा म्हणून बसले की हे केले नाही,ते केले नाही असा पाढा लावलाय त्यांनी! काय झालंय त्यांना काय माहित! चुकतंय का माझं काही?'
 
आता पुढे काय होईल? एवढ्या भावनिक गदारोळात तेजल करू शकेल तिचा निभाव? की वहिनींच्या जाचात फसून पडेल ती कामे त्यांच्या म्हणण्यानुसार करेल? सासूबाई आता तरी या दोघींमध्ये पडतील का? गुणी सूना बनू शकतील का सुजतावाहिनी आणि तेजल?

पाहूया पुढील भागात..
भाग ४ समाप्त.
फोटो: साभार गुगल 

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all