गुणी सुना - भाग ३

प्रस्तुत कथेत मी सासूबाई आपल्या सुनांना गुणी असण्याचीखरी परिभाषा काय असते हे कसे शिकवतात याचा उलगडा केला आहे.

 मागील भागात आपण पाहिले की सुजाता वहिनी तेजलला किचन मध्ये काहीही प्रयोग करण्यास मनाई करतात; त्यामुळे सुजाता वहिनींच्या मुडला सांभाळत,त्यांची मदत घेऊन, सर्वांसमोर विशेष करून सासूबाईं समोर आपण चांगला स्वयंपाक करून गुणी सून कशी होऊ शकू याचा विचार तेजल करत असते.

आता पाहूया पुढे..


एव्हाना तेजल किचन मध्ये बरीच कामे करण्यात तरबेज होते; पण भाज्या वहिनी करू देत नसल्याने शिकत नाही.


त्यामुळे तिला थोडे वाईट वाटत असते.


" ऐक ना तेजल ,तुझ्या पोळ्या झाल्यात ना आता?"


" हो.भाजी पण चिरून ठेवलीय."


" बर . देवचा थोडा अभ्यास घेतेस का? मी बाकीचा स्वयंपाक उरकते."


" हो घेते ना." 


देव तिच्याकडून छान अभ्यास समजावून घेतो.तो त्याच्या आईला म्हणजे सुजाता वहिनीला सांगतो,

 " मला छान समजून सांगितलं आई,काकूने!मला ती रोज शिकवेल का?"


" हो रे देव,ही तुझी तेजल काकू रोज तुला शिकवेल.पण तू पण मी सांगितलेला अभ्यास लक्षात ठेवून रिव्हीजन करायची बर का!"


" बघ देव,आता काकू तुझी ट्युशन रोज घेतील.चल जेवून घे बेटा आता.तू पण चल जेवायला तेजल."


" हो वहिनी आलेच!"


तेजल मनोमन खुश होते.चला वहिनीला आपण खुश केलं.आता त्या आपल्याला वेगवेगळ्या भाज्या न संकोचता छान शिकवतील.


तेजल शिकलेली असल्याने ती अभ्यासात,तसेच बाहेरील अनेक कामांमध्ये तरबेज असते.


" अरे बापरे ,मला नेमके शेतीच्या कामासाठी अर्जंट गावाला जायचे आणि माझी अपॉइंटमेंट पण त्याच दिवशी असणार आहे. राहून जाणार वाटतं यावेळची अपॉइंटमेंट! काय करावे रे मनीष?"


 तेजल मध्येच म्हणते,

" तात्या तुमच्या डॉक्टरची आपण ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतो."


 " तुला येईल का घेता?"


" हो.म्हणजे माझे वडील बऱ्याचदा फिरतीच्या दौ ऱ्यावर असताना ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायचे.मीच त्यांचा नंबर मोबाईल ॲपवर लावायचे."


" वाह ! मस्तच म्हणजे माझे हे काम होणार!"


तात्यांची अपॉइंटमेंट होते.तेजल व्यवस्थित सर्व हाताळते. तात्या तिच्यावर खुश होतात.


तेजल सुद्धा आपण आता हळूहळू गुणी सून बनणार आणि सासूबाईंच्या शब्दाला न्याय देणार असे स्वप्न रंगवू लागली.


      हळूहळू ती बरीच बाहेरील कामे करून घ्यायला सुरु करते .ती गॅस सिलिंडर बुकिंग मोबाईलवर सुरू करते,बँकेची कामे,मुलांचे स्कॉलरशिप फॉर्म भरणे,घरातील वीजबिल,पणीबिल,टीव्ही रिचार्ज,इंटरनेट रिचार्ज सारे काही शिताफीने करते.घरातील सर्वच तिच्यावर आता खूप खुश असतात म्हणजे सासूबाई सुद्धा !


पण फक्त एक व्यक्ती तिच्यावर आता जळत असते.कोण असेल ही व्यक्ती? 


पाहूया पुढील भागात..

भाग ३ समाप्त .

फोटो: साभार गुगल 


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all