शहरातली मी - आणि गावी गेल्यावर आलेल्या अडचणी, आणि त्यातून निघालेला मार्ग...

Difference In City And Village

मी मूळची मुंबईची, लग्न करून देवरुख - रत्नागिरी इथे स्थायिक झाले, सुरवातीला थोडे दिवस गाव ची हवा, वातावरण छान वाटत गेलं, पण नंतर थोड्याच दिवसात मुंबई च्या गजबजाटाची आठवण येऊ लागली, दिवस संपता संपेना, मे महिन्यात इकडे आल्यावर, थोड्याच दिवसात जुन मध्ये पाऊस सुरु झाला, गावचा पाऊस म्हणजे जोरजोरात गडगडाट, आणि पाऊस सुरु झाला कि 2,3 तास थांबत च नसे, विजांचा कडकडाट खूप असे, मला तर घरा बाहेर पडायला हीं खूप भीती वाटू लागली, सारखी मुंबई ची आठवण येऊ लागली, एकतर मुंबईच्या मानाने इकडे कपडे, किंवा इतर खरेदी हीं खूप महाग वाटू लागली.

आमच्या घरा समोरच मराठी शाळा आहे, तिथे सायकल वर लांबून येणारी मुलं बघितलं कि अस वाटायचं कि आपण शहरात किती सुख सोयीनी सज्ज होतो, शाळा पण किती जवळ, जवळ होत्या, हीं मुलं शिक्षणासाठी एवढे कष्ट घेतायत, ह्या सर्व गोष्टींची मी सारखी मनातल्या मनात तुलना करू लागले.

जरा पाऊस मोठा चालू झाला कि महावितरण वाले काही वायर वैगरे तुटू नये म्हणून लाइट घालवत असतं, आणि शहरात म्हणजे मुंबई ला तर लाईट जास्त जायची च नाही आणि गेली तरी लगेच पुन्हा येत असे, इथे 2,3 तास लाईट नसे त्यात पक्ष्यांचा आवाज, खूप भीती वाटू लागली होती पण एक  चांगल होत कि आमचं घर  सिटी मध्येच म्हणजे देवरुख शहरात होत आतमध्ये गावात नव्हत त्यामुळे दिवसभर घरासमोर च्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची रेलचेल असे. त्यामुळे  दिवसातला थोडा वेळ बाहेर बघून मी वेळ घालवत असे. आणि तेव्हा म्हणजे 11 वर्षांपूर्वी व्हाट्सअप किंवा फेसबुक च मला जास्त असं वेड नव्हत.

सारखं वाटे कशी इथली लोक इथे एवढे वर्ष राहू शकतात, पण म्हणतात ना काळ सर्व गोष्टीवर औषधं असतो, असच काळ पुढे सरकत राहिला, आणि मग शहर आणि गाव ह्यातलं अंतर कमी वाटू लागलं. शहर आणि गावामध्ये वाढणे, त्यातील त्रुटी, महत्व समजू लागले.. कालांतराने सगळ्या गोष्टी routine ला येऊ लागल्या,, आणि गावची भीती असणारी मी गावी सेट झाले.. आता काहीच वाटत नाही, गरजेनुसार मग इन्व्हर्टर आला, इथे चांगल्या शाळा सुरु झाल्या आहेत, हळू हळू सर्व सुख सोई होऊ लागल्या, मग शहर आणि गाव मधले अंतर कमी होत गेले.

 नमस्कार...... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.....( देवरुख - रत्नागिरी )