ओजस आणि साळवी कमिशनर यांचा निरोप घेऊन बाहेर पडले.
"सर आपण एकदा त्या मंदिराच्या जवळ गेलो तर.... कदाचित काही माहिती मिळेल साळवी म्हणाले."
"साळवी ती जुनी गोष्ट आहे खूप आधी आपण दुसरे पुरावे शोधू त्या मंदिरात भेट देऊन काय होणार आहे का? जिथे गुन्हा घडला तिथे शोध घ्यायला हवा आपण चला ओजस म्हणाला."
"ठीक आहे सर तिथेच जाऊ आपण साळवी म्हणाले."
"साळवी माझा या अशा गोष्टींवर विश्वास अजिबात नाही त्यामुळे निदान मला वाटतं की आपण जो खरा या मागचा मास्टर माईंड आहे त्याला लवकरात लवकर शोधलं तर कुठे हे गुन्हे संपतील इथले स्थानिक आणि आपण मुक्त होऊ ओजस म्हणाला."
"हे खरंय! पण आपण जाणार तरी कुठे आहोत सर ? गुन्ह्याची ठिकाणे तर खूप आहेत मग गुन्हेगारच मूळ शोधणार कसं साळवी म्हणाले."
'कालबरीआ', "इथे जात आहोत आपण... सगळ्यात संवेदनशील भाग आहे सध्या, उद्या खूप काही घडण्याची शक्यता आहे मला कळाले म्हणूनच तिथे जात आहोत आपण. ती घटना घडायच्या बंदोबस्त होईल आणि गुन्हेगार च्या जवळ जाण्याची दाट शक्यता आहे आपल्यासाठी ओजस म्हणाला."
"पण सर गुन्हेगार च वर्णन नसताना आपण ओळखू कसं त्याला आणि त्याच्या भितीने कोणी तिथला स्थानिक रहिवासी मदत करेल असं वाटतं नाही मला साळवी म्हणाले."
"पण आपली टीम मधील काही तिथं सक्रिय आहेत त्यामुळे चिंता नाही तिथेच काहीतरी लीड मिळेल आपल्याला ओजस म्हणाला."
"असच होईल सर!! ( कदाचित) हा शब्द मात्र ते खूप हळू म्हणाले."
काही तासांनी गाडी त्याची कालबरीआ इथे पोहचली. ड्रायव्हर ला ही सोबत त्यांनी घेतल.वातावरण इथले हिंसक होत आणि काही होऊ नये आपल्या पैकी एकाही सोबत्याला यांची काळजी ओजस घ्यायचा.
एका अपार्टमेंट मध्ये ते आत गेले. ओजस ने दरवाजा वाजवला आणि काही सेकंदात एकाने दरवाजा उघडला.
सर म्हणून त्याने सॅल्युट केला.
"संजीत काही लीड मिळाली का? आत येऊन तो म्हणाला."
"नाही सर पण आपली बाकी टीम अजून शोध घेत आहे आणि आजच कळेल माहिती त्या व्यक्ती बद्दल नाही पण उद्या नेमकं काय होणार याची संजीत म्हणाला."
"संजीत मी आज इथेच मुक्काम करतोय, साळवी तुम्ही ड्रायव्हर सोबत घरी जा आणि जाताना माझ्या बायकोला निरोप द्या मी इथेच थांबणार आहे आजची रात्र. उद्या काय होणार ते थांबवता येईल पण गुन्हेगार ला मला पकडायला हवं आणि सकाळी जास्तीची कुमक उद्या पाठवून द्या ऑर्डर देत ओजस म्हणाला."
"ठीक आहे सर येतो मी" असे म्हणून साळवी बाहेर पडले.
साळवी घरी जाताना ओजस च्या घरी गेले.
"पल्लवी मॅम सर आज घरी न येता उदया दुपार नंतर येतील हा निरोप मला तुम्हाला सांगायला सांगितले आहे साळवी म्हणाले."
"का काय झाले? काही गंभीर घटना घडली आहे पल्लवी काळजीने म्हणाली."
"नाही पण उद्या काहीतरी 'कालबरीआ' इथे काही तरी होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून सर तिथेच थांबलेत आणि त्यांच्या सोबत काही सहकारी आहेत त्यामुळे काळजी करू नका मॅम साळवी आश्वासन देत म्हणाले."
"काळजीच कारण नाही पण काही घडण्याची शक्यता तर आहे ना साळवी आणि ओजस कोणत्या ना कोणत्या संकटात सापडतो त्यामुळे मला नेहमी भिती वाटते.... काका पल्लवी चिंतेने म्हणाली."
"काळजी नका करू उद्या जास्तीची कुमक मीच घेऊन जाणार आहे आणि मी असेल सोबत त्यांच्या त्यामुळे त्यांना सुखरूप आणेल मी मॅम साळवी विश्वास देऊन म्हणाले."
"खूप धन्यवाद काका आणि मला मुलगी च समजून पल्लवी म्हणा, मॅम नको पल्लवी म्हणाली."
"ठीक आहे पल्लवी, बाळा मी येतो आणि काळजी करू नकोस असे बोलून साळवी बाहेर पडले."
तेवढ्यात शुभ तिथे येतो.
"आई, बाबा कधी येणार आहेत आज तरी ते माझ्या सोबत वेळ घालवतील ना? मला त्यांच्या सोबत खेळायचे आहे शुभ म्हणाला."
"शुभ आज तुझे बाबा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आहेत पण उद्या मात्र तुझ्या सोबत असतील खेळायला तर नाराज होऊ नकोस तु तुझ्या मित्रांना घरी का नाही बोलवत आज, मी फोन करून सांगते त्यांना पल्लवी म्हणाली."
"नको आई, आज नको मी जातो आणि पुस्तक वाचत बसतो" असे बोलून तो आत निघून गेला.
शुभ नाराज झाला आहे तिला कळत पण या परिस्थितीत ती काही करू शकत नव्हती. ओजस ला आपली ड्युटी, त्यांची कर्तव्ये आपल्या कुटुंबापेक्षा महत्वाची वाटतात हे तिला माहीत होते म्हणून ती कधीच त्याला सांगू शकत नव्हती हा जॉब सोडून दे. तिने दरवाजा बंद केला आणि आत गेली.
ओजस तिकडे आपल्या सहकाऱ्यांसोबत खूप वेळ चर्चा करुन ठरवले की तो रात्रीच संघा बरोबर बाहेर पडेल आणि गुन्हेगार ला पकडले कारण जर उदया काही होणार असेल तर ते आज रात्रीच प्लॅनिंग करत असणार आणि त्यांना कल्पना ही नसणार की पोलीस येतील, म्हणून आज रात्रीच तो बाहेर पडणार होता.
ओजस संघा सोबत अपार्टमेंटच्या बाहेर पडला. संघाने त्याला जिथे जिथे संशयास्पद जागा होत्या त्या दाखवल्या. ते एक एक जागा हेरत पुढे जात होते पण त्यांना संशयास्पद काही आढळून आले नाही तरी ओजस हार मानायला तयार नव्हता.
एका दाट झाडी झुडपाच्या भागात ते आले. आत किती दाट झाडा - झुडपांनी हा भाग वेढला गेला असावी यांची अंधारात कल्पना येत नव्हती.
"सर आपण आत जावे असे मला वाटते कारण अशा वर्दळ असलेल्या भागात आपण शोधले पण इथेही शोधून काढल तर सापडू शकतात कदाचित संजीत म्हणाला."
"मलाही तेच वाटत आहे! संजीत आणि आत जनावरे नसणार कदाचित व ही जागा दाट असली झाडा झुडपांनी वेढलेली असल्याने जास्त संधी आहे अशा धूर्त लोकांना उत्पात माजवणारा प्लॅन करायला ही जागा योग्य च वाटणार... ओजस म्हणाला."
"खरंय सर ! मग आत जाऊ आपण जर यांना पकडलं तर या गुन्हया मागचा सूत्रधार ही मिळेल संजीत म्हणाला."
"चल पण तु सावध रहा आणि रिव्हॉल्व्हर लोड करून ठेव गरज पडलीच तर लगेच शूट कर पण आपल्याला दोन जणांना जिवंत ठेवायच आहे हे लक्षात ठेव ओजस म्हणाला."
"हो सर संजीत म्हणाला."
दोघांनी आत प्रवेश केला आणि सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत होते.
. त्या परिसरात काही छोट्या प्राण्यांचा आवाज सोडला तर त्या परिसरात निरव शांतता होती. मनावर भितीचा प्रचंड पगडा असलेल्या व्यक्ती अशा भयाण शांतता असलेल्या भागात पाऊल टाकण्यास धजावला नसता. दोघे पुढे जात राहिले पण मानवाच अस्तित्वाची चाहूल कुठेच दिसत नव्हती.
काही जंगलाचा भाग तुडवत ते आत गेल्यावर त्यांना एका मंदिराचा कळस दिसला.
एवढ्या घनदाट भागात एक मंदिर असेल याची शक्यता त्यांना नव्हती. ते मंदिर एवढ्या घनदाट भागात म्हणजे निर्मनुष्य असाव, या भागातील रहिवाशांना यांची माहिती ही नसावी अस त्यांना वाटल. पण एक क्षणिक कुजबुज त्यांना ऐकू आली आणि ते दोघे सावध झाले. गनच्या नळीचा पॉइंट समोर ठेवून ते दोघे दक्षतेने पुढे जाऊ लागले. त्या कुजबजुचा स्वर हा एकटा ऐकू येत असल्याने त्यांना कळत नव्हतं ही एकच व्यक्ती असावी की समूह. त्या दोघांनी आपल्याकडे किती बुलेट्स आहेत हे चेक केले , त्या भरपूर आहेत हे पाहून दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला नाहीतर त्या मंदिरात भरपूर हत्यार असतील आणि हे दोघेच आणि बुलेट्स कमी असत्या तर त्यांना कठीण झाले असते त्या लोकांचा सामना करताना... कदाचित जख्मी होण्याची शक्यता जास्त होती. तेवढ्यात एक जोरदार किंकाळी घुमली आणि दोघे प्रचंड दचकले. ती किंकाळी मंदिरातूनच आली यांची दोघांना खात्री पटली. ते दोघे तसेच कुठला विचार न करता पुढे गेले.
अंधार असल्याने व तिथे असलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना काही दिसत नव्हते. संजीत ने मोबाईल चा टॉर्च पेटविला आणि दोघे तिथे मनुष्याच पडलेले प्रेत पाहून दंग झाले. समोर एक धारदार सुरा पडला होता. तो माणूस पालथा पडला होता आणि त्याच्या शरीरा खालून रक्त वाहत होते. ओजस ने त्या मूर्तींवर प्रकाश टाकला स्वतःच्या मोबाईल मध्ये आणि त्यात दिसली जोकर ची मूर्ती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा