सिंड्रेलाची गोष्ट - भाग ११

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

" सुमित्रा… सुमित्रा… मला खरंच काय बोलू ते सुचत नाही आहे.. म्हणजे हे असं काही होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मैथिली जर हे असं वागत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.. मला तिच्याशी बोलल पाहिजे…" विलास राव चिंतातुर होऊन म्हणाले.

" नाही.. अहो असं काय करताय.. जर खरंच तिला काही मानसिक धक्का बसला असेल, तिचं मानसिक आरोग्य ठीक नसेल तर आपण तिच्याशी असं जाऊन बोललो तर ते योग्य नाही ठरणार. आणि जर ती मुद्दाम असं काही करत असेल तर तुम्ही तिला कितीही विचारलं , काहीही झालं तरी ती खरं बोलणार नाही.. आपल्याला हे सर्व खूप शांतपणे हातळल पाहिजे. मला तर कधी कधी वाटतं मीच निघून जावं इथून.. म्हणजे सर्व सुरळीत होईल.. माझ्या आयुष्याचं काहीही झालं तरी चालेल… पण माझ्यामुळे तुम्हाला आणि मुलींना त्रास नाही झाला पाहिजे.. " असे बोलून सुमित्रा खूप रडू लागली.


सुमित्राला रडताना पाहून आणि आपण नसताना अजून काय काय होत असेल हिच्या सोबत तरीही ही आपला आणि मुलींचा किती विचार करते आहे, हा विचार करून विलास रावांना अपराध्या सारखं वाटू लागलं.. 


" सुमित्रा मला माफ कर.. हे असं सर्व होतं असेल मी नसताना असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी समजू शकतो तू त्यांच्यावर इतकी माया करून सुद्धा जर त्या तुझ्याशी असं वागत असतील आणि सारखं तुला सावत्र म्हणत असतील तर तुला कसं वाटतं असेल ते. पण मी माझ्या बाजूने तुला कधीही अंतर नाही देणार. प्लिज रडू नकोस..सध्या खरंच मला काही सुचत नाही आहे. मी नक्की काय करावं ते कळत नाही आहे.. मैथिलीशी बोललं पाहीजे असं मला मनापासून वाटतंय.. तिच्या मनात काय सुरु आहे हे सुद्धा कळलं पाहिजे तरच तोडगा निघेल यावर…" विलास राव म्हणाले.


मैथिलीशी बोलले तर ह्यांना सर्व कळेल , ह्या विचाराने सुमित्रा थोडी घाबरली आणि तिने अजून मोठं मोठ्याने रडायला सुरुवात केली..


" हो तुमचं अगदी बरोबर आहे.. तुम्ही बोलाच तिच्याशी.. असंही माझ्या बोलण्याला , माझ्या मताला या घरात काही किंमत नाही आहे.. मी आहे तरी कोण.. मी विचार करतेय की मी कायमच निघून जावं या घरातून.. निदान तुम्ही तरी सुखी व्हाल.. फक्त जाण्या आधी माझी एक इच्छा आहे.. मला आपलं बाळ हवं आहे.. निदान त्याच्या आधारे मी जगेन. माझ्या जगण्याला काही तरी अर्थ मिळेल.. " सुमित्रा रडत रडत बोलत होती.


" अगं असं काहीतरीच काय बोलते आहेस. तू कुठे ही जाणार नाही आहेस. तू आहेस म्हणुन तर या घराला घरपण आहे. तू नसशील तर या घराचं काय होईल.. माझं काय होईल.. " विलास राव म्हणाले.


" माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.. आणि नेहमी राहील.. पण मी हे असं कधी पर्यंत सहन करू ते कळत नाही .. आता तरी कळलं का मला स्वतः च मुलं का हवं आहे ते.. का महत्त्वाचं आहे माझ्यासाठी माझं बाळ.. आपलं बाळ.. मैथिली आणि चैताली माझ्यासाठी माझ्या मुली आहेतच.. पण मला सुद्धा मनापासून स्वीकारणार, मला आई म्हणणार कोणीतरी हवं आहे. माझ्या हक्काचं… तुम्हाला माझ्या हेतू बद्दल संशय आला तेव्हाच खरंतर मी हे घर सोडून जायचं ठरवलं होत.पण थांबले.. कारण माझा सुद्धा जीव गुंतला आहे आता या घरामधे, तुमच्यामध्ये, मुलींमध्ये.. आता पर्यंत मी तुम्हाला कधीच माझी व्यथा सांगितली नाही.. आजही सांगणार नव्हते.. कारण मला तुम्हा बाप लेकी मध्ये यायचं नाही. माझ्यामुळे तुमच्यात कधीच कुठलीही कटुता नको. पण आज तुम्ही जखम पाहिली. आणि तुम्हाला हे कळलं. " सुमित्रा हुंदके देत बोलत होती.


" सुमित्रा.. प्लिज असा काहीही विचार नको मनात आणू.. सर्व ठीक होईल.. आणि बाळा साठी आपण प्रयत्न करतो आहोतच ना.. होईल सर्व ठीक.. मैथिली आणि चैताली सुद्धा तुला स्वीकारतील.. तू नको काळजी करुस.. फक्त हे घर सोडून जायचं डोक्यातून काढून टाक.. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे ना, आपल्या दोघानाही स्ट्रेस फ्री राहायचं आहे.. होईल सर्व ठीक.. हे सर्व ऐकून मीच गडबडलो आहे , पण तू तर हे सहन करते आहेस , मी तुला समजू शकतो हे बोलणं सुद्धा चुकीचं आहे.. फक्त थोडा वेळ जाऊ देत. या पुढे तू म्हणशील तसचं सर्व होईल… अगं माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.. कधी व्यक्त झालो नाही.. पण खरंच आहे.. चल आता डोळे पुस.." विलास राव सुमित्रा ला म्हणाले..


डोळे पुसत पुसत सुमित्रा बेड वरून उठली… आणि थोडी दूर जाऊन मान खाली घालून म्हणाली, " मी खरंच उद्या निघून जायचा विचार केला होता.. पण जाण्या आधी ही रात्र खूप खास असावी यासाठी काही तरी केलं आहे मी… आजचा दिवस सुद्धा खास आहे.. मला माहित आहे तुमच्या लक्षात सुद्धा नसेल आज काय आहे ते…" 


" आज..? काय आहे…? खरंच नाही माझ्या लक्षात.. आय एम रिअली सॉरी… " विलास राव म्हणाले.


" आज पहिल्यांदा आपण भेटलो होतो. तुम्ही मला बघायला आला होतात.." सुमित्रा थोड लाजत म्हणाली.


" ओह.. अगं खरच सॉरी.. माझ्या नाही लक्षात राहत तारखा.. प्लिज आता रुसू नकोस.. आणि तू आता कुठेही जाणार नाही आहेस.. पण आजची रात्र खास व्हावी यासाठी काय तयारी केली होतीस ते सांगितलं तरी चालेल मला.." विलास राव म्हणाले.


सुमित्राने अंगावरील सॅटिनचा कोट काढला. आता ती विलास रावां समोर पारदर्शक पांढऱ्या रंगाच्या गाऊन मध्ये उभी होती. तिच्या शरीराचे उंचवटे अगदी योग्य प्रकारे दिसतील आणि त्यांना आकर्षित करतील अशा प्रकारे ती उभी राहिली. थोडी लाजली.. आणि म्हणाली, " ही तयारी केली होती मी.. म्हणून खूप आतुरतेने वाट पाहत होते तुमची. पण आपल्या मिलना आधी हे असं सर्व होईल.. असं नव्हतं वाटलं.. त्यामुळे आता मी हे असं येणं, योग्य की अयोग्य हे सुद्धा कळतं नाही आहे.." सुमित्रा म्हणाली.


विलास राव खुर्ची वरून उठून उभे राहिले.. ते सुमित्राच्या त्या मादक रुपावर भाळले होते. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी ही अशी फॅंटसी अनुभवली नव्हती. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे छान होतं. अनुराधा सोबतही आणि सुमित्रा सोबतही.. पण त्यात असा वाऊ फॅक्टर नव्हता. काही वेगळेपणा, थ्रीलिंग असं काही नव्हतं.. पण आज सुमित्राने काही तरी वेगळं केलं होतु.. खास त्यांच्यासाठी.. त्यामुळे ते अधिकच उत्साहित झाले होते. काही वेळा पूर्वी झालेलं बोलणं.. मैथिली , चैतालीच टेन्शन हे सारं काही ते जणू विसरलेच होते. ते आवसून सुमित्रा कडे बघत होते. 


" अहो काय बघताय.. ? बोला ना काही तरी.. नाही आवडलं का..? चेंज करू का..?" सुमित्राने विचारेल.


" नाही नाही.. मुळीच चेंज नको करू.. कसली भारी दिसते आहेस.. मादक.. तुझं हे रूप मी पहिल्यांदाच पाहतो आहे.. खरंतर असं काही तरी मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात अनुभवतो आहे.. त्यामळे मी निशब्द झालो आहे.. " विलास राव म्हणाले.


" तुम्हाला आवडणार असेल तर तुमच्यासाठी मला हे करायला आवडेल.. माझं तुमच्या वरचं प्रेम व्यक्त करण्याचा माझा हा एक प्रयत्न होता.. तो तुम्हाला आवडला हे पाहून बरं वाटतंय.." सुमित्रा विलास रावांच्या दिशेनं येत म्हणाली.


तिने त्यांना हलकासा धक्का दिला आणि ते बेड वर बसले. ती जाऊन त्याच्या मांडीवर बसली..


**********


मैथिलीने डोळे बंद केले.. तिने टर्न घेतला.. आणि ती धावतच तिच्या खोलीत गेली.. खोलीचा दरवाजा तिने बंद केला.. आणि ती तिथे कसळली.. कोणीतरी उंच कड्यावरून खाली ढकलून दिल्या सारखं तिला वाटत होत.. ती घामाघूम झाली होती.. आपण काहीतरी चूक केली आहे ही भावना तिच्या मनात होती. तिचं स्वतः शीच द्वंद सुरू झालं.. एकी कडे वाटतं होत की,' हे लपून जे काही आपण पाहिलं ते चुकीचं आहे.. त्यांची पर्सनल स्पेस आहे.. असं लपून पाहायला नको होतं.. सुमित्रा आईला अशा अवतारात पाहूनच मागे फिरायला हवं होत.. ' तर दुसरी कडे वाटतं होत, ' हे ऐकलं नसतं तर तिचे मनसुबे कळले नसते. त्यामुळे हे लपून ऐकणं गरजेचं होत. ' एकीकडे वाटतं होतं, ' बाबा आई शिवाय दुसऱ्या स्त्री वर कसं प्रेम करू शकतात.. बाबा असे कसे वागू शकतात.. बाबांना एकदाही आमचा विचार नाही का आला.. आणि बाळ.. बाबा आणि सुमित्रा आई बाळा साठी प्रयत्न करत आहेत.. आता.. या वयात.. असं झालं तर शाळेत मला सर्व चिडवतील.. सर्व हसतील माझ्यावर.. आणि सुमित्रा आई आताच अशी वागते आहे , मग तिचं बाळ आल्यावर काय करेल ती आमच्या सोबत.. ' तर दुसरी कडे, ' हा त्यांचा प्रश्न आहे.. बाबा कधीच आपली साथ सोडणार नाहीत.. ' असे सर्व समिश्र विचार तिच्या डोक्यात सुरू होत.. काय करावं ते तिला सुचत नव्हतं. आजी आई का सोडून गेले आपल्याला .. असं तिला सारखं वाटतं होत.. खूप रडू येत होत.. पण जवळ घेणार कोणीच नव्हतं. रडत रडत ती तिथेच जमिनीवर तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही.


**********


इथे सुमित्रा ने बाजी मारली होती.. विलास रावांच्या मनावर आणि मेंदूवर अधिराज्य गाजवण्याचा मार्ग तिला सापडला होता. विलास रावांना आपल्या जाळ्यात ओढायला आता ती पूर्णपणे तयार झाली होती. 


**********


क्रमशः


( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )


फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.






🎭 Series Post

View all