Login

सिंडरेला एक गोष्ट.

स्टोरी
एक गुलाबी नावाचं शहर होतं, शहर फार मोठं नव्हतं. त्याशहरात एक गरीब मोलकरीण होती तिला एक मुलगी होती. मोलकरीण एका महालात मोलकरणीच काम करायची, ती जिथे जाईल तिथे मुलीला घेऊन जायची.
असंच एकदा काय होतं, ती मुलीला सोबतीला घेऊन जाते पण त्या मुलीला खुप भूक लागलेली असते.

ती ज्या महालात काम करते तिथे एक चाकर माणुस असतो, त्याच्याकडे तिची आई खायला मागते. पण तो माणुस तिचा पान उतारा करतो. मोलकरीणला खुप वाईट वाटतं, ती मुलीला समजावते पण त्याचा काहीच उपयोग नसतो.

तेवढ्यात तिच्या मुलीची नजर टेबलवर ठेवलेल्या फळांवर जाते. ती हळूच चोरून ते फळ खायला जाणार, तेवढ्यात तिचा हात कोणी तरी पकडतो. ती दचकते आणि घट्ट डोळे बंद करते. पण नाईलाजाने ती डोळे उघडते सामोर तिच्या त्या महालातली राजकुमारी असते.
" हम्म्म्म चोरून फळ खातेस काय, थांब तुला शिक्षाच करते. " ती राजकुमारी बोलते.

ती मुलगी तिचे पटकन घट्ट पाय पकडते, " नाही नाही मला शिक्षा करू नका, मला खुप भूक लागलेली म्हणुन मि हे केल.. "

राजकुमारी मनातल्या मनात बोलते, "आज आपण हिला शिक्षा म्हणुन माझी सगळी कामे करायला लावूयात.."

राजकुमारी बोलते, " बरं बरं तुला शिक्षा नाही देत पण तुला एका अटीवर ह्यातली फळे मिळतील. "

ती मुलगी बोलते, " कोणते..? "

ती राजकुमारी तिला स्वतःच्या रूम मध्ये घेऊन जाते, हा अवाढव्य महाल आणि त्यात राजकुमारीची रूम ती सुद्धा तितकीच मोठी. ती खोली पाहून त्या मुलीचे डोळे चमकतात.

तिच्या डोळ्यात असलेली चमक ही वेगळीच असते, तिला भुकेची चमक असते.

ती राजकुमारी तिला स्वतःचे कपडे देते धुवायला, स्वतःच्या चपला सुद्धा धुवायला देते.

काही वेळाने त्या मुलीने कामे आटपून घेतलेली असतात, ती राजकुमारी जवळ जाते आणि काम झाल्याचे सांगते.
राजकुमारी तिला फळे देते, ती मुलगी खुप खुश होते.

" हिला आपली सर्वे कामे सांगूया, ती उद्या ही करून देईल आणि तसंही उद्या मला भेटायला राजकुमार येणार आहे. त्याच्या पुढ्यात मि मस्त तयार होईन.. " आणि राजकुमारी मनोमणी हसते.

" तु उद्या ही महालात ये, उद्या खुप खास दिवस आहे. आणि काम झालं कि तुला त्याचा मोबदला सुद्धा मिळेल. " राजकुमारी बोलते.

" मोबदला म्हणजे खायला खुप सार भेटेल.. " ती मुलगी मनोमणी खुश होते आणि पटकन जाऊन आईला मिठी मारते.
तिला भेटलेली फळे ही दाखवते, आई सुद्धा खुश होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी तयार होऊन, महालात येते.
ती राजकुमारीच्या खोलीत जाते, राजकुमारी झोपलेली असते.

बराच वेळ ती राजकुमारी उठण्याची वाट पाहत असते, तेवढ्यात तिचं लक्ष राजकुमारीच्या कपाटावर जातं. तिथे एक छानसा गुलाबी रंगाचा चमकता ड्रेस लावलेला असतो. जणू कोणत्या तरी अप्सरेचा आहे तो, पण राजकुमारी थोडी अप्सरा होती ना रांग ना रूप.

ती मुलगी त्या कपाटाजवळ जाते, आणि त्या ड्रेस वरून अलगद हात फिरवते. ती हळूच तो ड्रेस काढते आणि अंगाला लावून आरशात पाहते.

ती त्या ड्रेस मध्ये परी सारखी चमकत होती, तिची चमक तिच्या डोळ्यांतून दिसत होती.

तेवढ्यात राजकुमारी उठते, डोळे बंद करूनच ती त्या गरीब मुलीला हाक मारते. तशी ती मुलगी ड्रेस ठेवून देते.
मेरी नाव तिचं, मेरी पटकन राजकुमारीच्या जवळ जाते.

राजकुमारी उठत नाही तसं ती त्या मेरीला कामचं काम देते, राजकुमारी आंघोळ करून आरशाच्या सामोरं बसते. मेरीला ती स्वतःचे केस विनचारायला सांगते. मेरी राजकुमारीची छान तयारी करून देते, तेवढ्यात एक दासी राजकुमारीला बोलवायला येते.

" राजकुमार आले आहेत, तुमची वाट पाहत ते दिवाणखान्यात थांबले आहेत.. " ती दासी बोलते.

आज तो ड्रेस राजकुमारी ने घातला होता, पण कोण जाणे तो तिला शोभून दिसत नव्हता.

तरी सुद्धा राजकुमार तिला पसंत करतो ह्यात आश्चर्य होतं.

मेरी तो ड्रेस पाहून वेडी झाली होती, तिला ही वाटू लागत आपण ही तो ड्रेस घालावा. आपल्यालाही तो राजकुमार भेटेल, पण नाही स्वप्न होतं ते.

बऱ्याच वेळा नंतर राजकुमारी मेरीला आवाज देते," प्लीज माझ्यासाठी ज्युस घेऊन येशील का, खुप थकली आहे मि. "
राजकुमारी तिला रागानेच बोलते.

राजकुमार मेरीला पाहून विचारतो, " ही कोण ? "

राजकुमारी बोलते, " ही मेरी आमच्या मोलकरणीची मुलगी, खुप गरीब आहे.. " तिच्या बोलण्यात आपुलकी नव्हती.

" गरीब आहे पण दिसायला छान आहे.. " राजकुमार मनातल्या मनात बोलतो.

काही वेळाने राजकुमारी तिच्या खोलीत जाते, राजकुमार ही निघुन जातो.
मेरी बराच वेळ त्या राजकुमारीचे पाय दाबत असते, " बरं बरं बस झालं आज इतकच, पण उद्या ही तुला यायचं आहे.. " राजकुमारी बोलते.

मेरी ची नजर सारखी त्या ड्रेस वर खिळून असते, कदाचित हा आपल्याला ही काही वेळेसाठी घालायला भेटला असता.

रात्र होते, मेरिची आई मेरीला गोष्ट सांगत असते, एका परीची ती परी कशी बनते. त्या गोष्टीत तिला ती स्वतःच दिसत होती.

एक दिवस महालात पार्टी असते आणि त्यात अनेक ठिकाणचे राजकुमार येणार असतात.
राजकुमारी मेरीला तिची तयारी करायला लावते, आणि एखादा जुना ड्रेस काडून ती मेरीला घालायला सांगते.
मेरी राजकुमारीने दिलेला ड्रेस घालून खाली दिवाणखान्यात जाते.

राजकुमारी सगळ्यांशी हळू हळू भेटत होती, मेरी एका ठिकाणी कोपऱ्यात उभी होती. मेरीच्या नजरेसमोर सारखा तो ड्रेस येतं होता..

काही क्षणाने महालचे दिवे जातात, आणि त्या अंधारात काही तरी चमकल्या सगळ्या उपस्थित राजकुमारांना दिसते.

प्रत्येक जण कुजबुजू लागतो, पण प्रिन्स राजकुमारला ते नक्की कोण होतं हे पाहायचं होतं. तो तिच्या पाठी पाठी पळतो.

मेरी सगळ्यांच्या समोरून पळत असते, " हा तर माझा ड्रेस आहे.. पण ही नक्की कोण मेरी..? " राजकुमारी स्वतःशीच बोलते आणि खोली मधला ड्रेस चेक करायला एका दासीला पाठवते.

मेरी धावत असताना तिचा ड्रेस खिळ्यात अडकतो, ती काढायचा प्रयत्न करते तेवढ्यात राजकुमार पाठून येतो आणि तिचा ड्रेस हळूच खिळ्यातून काढायला मदत करतो.

" सुंदर अतिशय सुंदर.. " राजकुमार मेरीला पाहून बोलतो.

तो ड्रेस घालून मेरी सिंडरेला सारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील गरिबी ही त्या ड्रेस ने पळून गेलेली असते.
आणि तिचा चेहरा चमकून लागतो.

राजकुमार गुढग्यावर बसून तिला हात देण्यासाठी हात पुढे करतो.. आणि मेरी कायमची राजकुमारची सिंडरेला बनलेली असते..