Oct 16, 2021
बालकथा

चुटकी..

Read Later
चुटकी..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
*चुटकी*

चंद्रनगर या छोट्याशा गावात मोरू नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. तो रोज बाजूच्या सुंदरबन जंगलातील लाकडं विकून आपल्या परिवाराची गुजराण करत होता. मोरू अतिशय प्रामाणिक व संस्कारी होता. तो फक्त सुकी लाकडे तोडायचा कधी जिवंत ओली लाकडं तोडायचा नाही. कधी त्याला सुकी लाकडे मिळाली नाही तर तो तस्साच रिकामी येई.पण जिवंत झाड तोडत नसे. त्याच्या या पर्यावरण प्रेमामुळे त्याची घरची परिस्थिती फार हलाकीची होती.त्याला चुटकी नावाची एक हुशार व समजूदार मुलगी होती.
असाच एक दिवस मोरू जंगलात लाकडे तोडायला गेला होता. लाकड तोडता तोडता त्याची कुराड तळ्यात पडली. कुराड पडल्यामुळे तो तळ्याकाठी रडत बसला. त्यांचे रडणे ऐकून तळ्यातुन एक देवी निघाली. तिने मोरूला रडण्याचे कारण विचारले.त्यावर तो म्हणाला माझी कुराड पाण्यात पडली आहे. माझ्या मिळकतीचे ते एकमेव साधन आहे. आता मी काय करू?
देवी हसुन म्हणाली अरे! मग त्यांत रडण्यासारखे काय? उडी मारून काढून घे!.. मला पोहता येत नाही मोरू पुन्हा रडत रडत म्हणाला....

ठिक आहे! ठिक आहे!!रडू नकोस देवीने पाण्यात जाऊन एक चांदीची कुराड काढली आणि विचारले ही काय तुझी कुराड? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले दुसऱ्या वेळेस सोन्याची कुराड काढली. व पुन्हा विचारले ही काय तुझी कुराड? त्याने पुन्हा नकार दिला. देवीने तिसऱ्या वेळेस त्याची कुराड काढली. व विचारले ही काय तुझी कुराड? त्यावर त्याने लगेचच होकार दिला. देवीने त्याला त्याची कुराड दिली. मोरू आपली कुराड व लाकडे घेऊन घरी आला त्याने आजची जंगलातील घटना पत्नी व चुटकीला सांगीतली.यावर चुटकी म्हणाली बाबा! तुम्ही खरं बोललात त्याबद्दल देवीने तुम्हांला बक्षिस म्हणून ती चांदीची आणि सोन्याची कुराड नाही दिली? नाही ग बेटा! मोरू चुटकीच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला.

अहो! ऐकलत का? घरात एक- दोन दिवस पुरेल इतकंच धान्य आहे. दोन -चार दिवसांनी दिवाळी आहे. आपल्याला नाही तरी चुटकीसाठी नवीन कपडे घ्यावे लागतील. आणि घरात काहीतरी गोडधोड करावच लागेल. आई!मला माहिती आहे आपल्या कडे पैसे नाहीत.नको मला नवीन कपडे! चुटकी म्हणाली. लेकीचा समजूदारपणा पाहुन दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. बाबा! तुम्ही उद्याही तिथेच लाकडे तोडायला जा चुटकी म्हणाली.
दुसऱ्या दिवशी मोरू त्याच सुकलेल्या झाडाची लाकडे तोडत होता. त्या दिवशी देखिल त्याची कुराड पाण्यात पडली आणि कालचाच घटनाक्रम घडला.
घरी आल्यावर आजचाही प्रसंग त्याने सांगितला. चुटकीने परत उद्या त्याच झाडाची लाकड तोडायला संगितले. आज मात्र त्याची कुराड पाण्यात पडली नाही.... मोरू लाकड घेऊन निघणार तोच तळ्यातील देवी त्याच्या समोर आली व म्हणाली मोरू! तु खूपच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे. तूझ्या घरी फार अडचणी आहेत तरी तु मात्र सोन्याची कुराड स्वीकारली नाहीस. .मी तूझ्यावर खूपच प्रसन्न आहे...... तूझ्या प्रामाणिक वृत्तीमुळे तुला बक्षिस म्हणुन ही सोन्याची कोंबडी मी तुला देते ....ही रोज एक अंड देईल हिच्या अंड्यामुळे तु श्रीमंत होशील....तथास्तु!.....मोरूच्या हातात कोंबडी देऊन देवी अंतर्धान पावली.
मोरू सोन्याची कोंबडी घेऊन आनंदाने घरी आला.आनंदाच्या भरात त्याने आज लाकडे देखिल आणली नाही. घरी आल्या- आल्या त्याने ही आनंदाची बातमी पत्नी व चुटकीला सांगीतली.ती ऐकून दोघींनाही आनंद झाला.घरात फार थोड धान्य शिल्लक होत. आजच्या रात्री थोड खाऊ उद्या अंड विकून पैसे मिळतील तेव्हा धान्य आणि इतर गरजेच्या वस्तु घेऊ.या आशेवर तिघंहीअर्धवट उपाशी राहून झोपली.
दुसऱ्या दिवशी ते सकाळीच उठुन पाहतात तर काय? कोंबडीने अंड तर दिले होते पण ते साध अंड होत जस इतर कोंबडीचे असते तसं. ते पाहुन तिघांनाही दुःख झाले. हे एक साध अंड विकून काय मिळणार? मोरूअसा विचार करत असता चुटकीने विचारले..... बाबा! कोंबडी देतांना देवी नक्की काय म्हणाली होती?... ही कोंबडी रोज एक अंड देईल त्यामुळे तु श्रीमंत होशील अस म्हणाली होती! मोरू नाराजीने म्हणाला. .अस! ठिक आहे कोंबडीने अजुन अंडे देऊ दे मग बघु काय करायचे ते! चुटकी म्हणाली.
अहो! घरात काही नाही दोन तीन दिवसांत दिवाळी येईल काय करायच?पत्नी म्हणाली. तुम्ही काळजी करू नका मी जातो जंगलात आणि लाकडे घेऊन येतो.मोरू म्हणाला.
मोरूने लाकडे आणली त्यातून तोडे पैसे मिळाले त्यामुळे तो दिवस निभावला. .....काय कराव त्याला काही सुचत नव्हते.दिवाळी कशी करायची?
दुसऱ्या दिवशी पत्नीने ती सोन्याची कोंबडी विकण्याचा सल्ला दिला. तसा मोरूला देखिल तो सल्ला पटला कारण एक एक साध अंड विकून मिळणार तरी किती? जर सोन्याची कोंबडी विकली तर चुटकीला कपडे घरात राशन थोडंफार गोडधोड सगळं होऊन चांगली बचत देखिल होईल..असा विचार करत तो सोनाराकडे निघणार इतक्यात चुटकी तेथे आली व तीने विचारले बाबा कुठे निघालात?..मोरूने कोंबडी विकण्याचा निर्णय चुटकीला सांगितला. त्यावर ती लागलीच म्हणाली.....बाबा! घाई करू नका देवीने संगितले आहे ना की, अंडयामुळे आपण श्रीमंत होऊ म्हणून. मग धीर धरा मला खात्री आहे. देवी आपली फसवणूक करणार नाही .....आणि मला दिवाळीला नवीन कपडे ,खाऊ वैगरे काही नको. फक्त तुम्ही कोंबडी विकू नका बस!... लेकीचा हट्ट पाहुन मोरूने आपला निर्णय बदलला.
व जंगलात लाकडे तोडायला निघुन गेला.
असेच पंधरा दिवस गेले दिवाळीही गेली. मात्र चुटकीने काही काही मागितले नाही. पंधरा अंडी झाली. कोंबडी अंडयावर ऊबवायला बसली.मोरूची नेहमीची मेहनत चालुच होती.
काही दिवसांनी कोंबडीने पिले काढली तर काय आश्चर्य सगळी पिले सोन्याची होती. हे पाहुन तिघांनाही फार फार आनंद झाला. त्यांनी हात जोडून देवीचे आभार मानले.......दिवस जात राहिले पिले मोठी झाली. विशेष म्हणजे ते सगळे कोंबडे होते. मोरूला ते सगळे सोन्याचे कोंबडे सोनारा कडे विकून अतिशय चांगले पैसे मिळाले.मोरूने चुटकीला जवळ घेऊन तीचे कौतुक केले. कारण तिच्याच संयम व समजूतदारी मुळे हे शक्य झाल होत.......पुन्हा एकदा त्यांनी हात जोडून देवीचे आभार मानले.....

लेखन : चंद्रकांत घाटाळ
संपर्क: ७३५०१३१४८०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक