चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा पार्ट 2)

Chukia mafi nahi part 2


पार्ट : 2

करुणा इथे कॉलेज ला पोहोचली...आज तर ती जाम खुश होती..दिवस पण तसाच होता...तिचा फेव्हरेट डे जो होता....साडी डे

संगीता:(आजच्या फंक्शनची मेन लिडर....सगळा कारभार आज जो तिच्या अंगावर होता...काय करणार बिचारी... किती प्रयत्न केला होता तिने नाय म्हणायचा... पण प्रिन्सिपल समोर कुणाचं चालत... कारण त्यांना पण माहीत होतं...हिच्या शिवाय कोणीच नाही जो प्रोग्राम चांगला अरेंज करेन....गेली दोन वर्ष तिनेच केलं होतं सगळं... परंतु ह्या लास्ट 3rd इयरला तिला एन्जॉय करायचा होता ...म्हणून नाय म्हणत होती...बिचारी....

संगीता:आवो काका तो फुगा तिकडे नाय तर मागच्या दरवाज्या जवळ लावायचा होता...आणि ही फुले कोणी इकडे आणली....अरे ये ...त्या पणत्या आन इकडे। ... सोबत समई सुद्धा आन....बापरे किती गोंधळ.... काय करू मी आता...प्रिन्सिपल मॅडम काय विचार करतील माझ्या बद्दल.... आणि त्यात माझी आजुन स्वतःची तयारी सुद्धा नाय झाली....(संगीता...जर राडकुंडीला येऊनच मनात बोलत होती...तेवढ्यात तिला कोणाचा तरी पडल्याचा आवाज आला)

संगीता:आता कोणी काय गडबड केली(जरा टेंशन मध्ये येऊनच बोली)

अजित:ये संगीता तुला दिसतंय ना मी पडलोय ह्या फुलांमध्ये... तरीपण रागावणं गरजेचा आहेका

संगीता:(जोरात हसतं)
कोणी सांगितल्या नको त्या उचापत्या करायला... जे काम सांगते ते तर करतच नाय...उगाच नको तिकडे शायनिंग मारायची

अजित:ये ये ये ....एक मिनिट... मागासपासुन बघतोय तुझी धावपळ... म्हणुन आलो तूझी मदत करायला... आणि त्यात तु मलाच बोलतेस...(अजित जरा नखरे दाखवतच बोलतो)

संगीता:अच्छा ठीके...सॉरी... मला माफ कर...आता जेवढी मदत केलीस तेवढी पुरी आहे....फक्त गेस्ट आलेत का ते चेक करणं प्लिज...(मुद्दाम नाक उडवत बोलते)

अजित: अच्छा ठिक...तु बोलतेस म्हणुन बघतो.... नायतर....(असा बोलताच अजित मागे न बघता चालतो आणि परत जाऊन कोणाला तरी धडकतो)

करुणा:अरे...ए... डोळे आहे का नाही तुम्हाला... mr...(करुणा सुद्धा स्वतःची साडी सांभाळत वर न बघता बोलुन गेली)

अजित: ओ...मॅडम...मला जर मागे डोळे असते तर तुम्हाला येऊन धडकलो असतो का...(अजित हे बोलुन जोरजोरात हसायला लागला)

करुणा: अजितच्या ह्या अश्या बोलण्याने ती त्याला बघते...मग काय त्याचा तो डॅशिंग लुक बघुन तर कोणी पण घायाळ होईल...(अजित होताच असा...गोरा पाण....अक्षरश्या एखाद्या राजकुमारला सुद्धा लाजवेल असा रंग...त्या रंगावर शोभेल असेच डोळे देवाने त्याला गिफ्ट दिले होते...हलकेसे हिरवेगार पाणीदार डोळे...6 फीट 1 इंच हाईट ... जिम मध्ये जाऊन केलेली त्या शरीराची आकृती तर ....ओ हो हो हो...(बस झाला आता ह्याच्या पुढे काही सांगु शकत नाही...तुम्हीच समजुन घ्या...कसा दिसत असेंन)

पण इकडे अजितची पण हालत काही वेगळी नव्हती

करुणाने सुद्धा गडद रंगाची जांभळी पैठणी घातली होती....त्यावर कोल्हापुरी साज ...कानात झुमके....ओठांवर शोभेल अशी हलकी गुलाबी लिपस्टिक... त्यावर मॅचिंग अश्या बांगड्या.... केसामध्ये मोगऱ्याचा गजरा.... जो ति आजुबाजुला असल्याचा भास करून देत होती.... तिचे ते टपोरे टपोरे डोळे...तिची नाजुक कंबर...करुणा फक्त रंगाने हलकी सावली होती....बाकी सगळ तर देवाने तिला दिलेच होते....

(थोड्या वेळ तर ते दोघे कुठे आहे हे विसरलेच होते) ते दोघे पण काय करणार... वेळच तशी होती...हा हा हा हा

संगीता:आता तुमच्या दोघांच एकमेकांकडे बघुन झालं असेंन तर आपण आपली पुढची काम करूयात का ?(संगीता जरा चिडवतच त्या दोघांना बोली)

करुणा: मी...आणि ह्याच्याकडे बघत होती...नो व्हेज..

अजित: मग काय मी बघत होतो....

(परत ते दोघे सुरू होणार म्हणुन संगीता मधी बोली)

संगीता:एक ... एक ...एक ... मिनीट गायझ...-प्लिज हा... आता परत नाका सुरू होऊ ... प्लिज...ऑलरेडी सगळी कामे बाकी आहे...माझी सुद्धा तयारी बाकी आहे...ये अजित तू जा बरं... बघ जरा गेस्ट आलेत का...आणि करुणा तु चल माझ्या बरोबर मला तयारीला हेल्प कर

(संगीता त्या दोघांनापण समजाऊन कारुणा ला सोबत घेऊन निघुन गेली)

परत तिला अजित लांबुन आवाज देतो... ये संगीता... आग आपली धडगुस गॅंग कुठे ...

संगीता: (लांबुनच)...मी प्रत्येकाला काम वाटुन दिली आहे...बघ बाहेर जाऊन कोण कोणत्या बिळामध्ये आहे...हहहहहहह

अजित: (मनातच बोलतो... बापरे बिळात...आजच्या दिवस सगळे उंदीर...बापरे... हा..हा..हा..हा....

@@@@@@@@@@@@@@@

कारुणा: बघितलना कसा आहे तो... म्हणुन मला नाय आवडत....तो

संगीता:(जरा हलक्या रागातच)अंग बाई बस्स झालं... एवढा पण वाईट नाहीये तो...

कारुणा: तुला बारी त्याची दया येते बघावा तेव्हा...हा हा हा हा

@@@@@@@@@@@@@@@

इकडे अजित गेस्ट ची विचारपुस करून त्याच्या मित्रांची शोध घ्यायला बाहेर येतो... तेवढ्यात त्याला मागुन कोणी तरी हग करता... ) अजित मागे वलुन बघतो...तो समोरच्या व्यक्तीला बघुन नाराज होतो... पण तसे दाखवत नाही

रिचा : हाय ... हँडसम... कसा आहेस...बघ मी कशी दिसते...(रिचा...रीच्याने ब्लॅक रंगाची सिल्क साडी घातली होती...त्यावर डायमंडच नक्षीदार काम केलं होतं..बॅक लेस ब्लाउज... हलकासा शोभेल असा मेकअप... रेड रोज रंगाची लिपस्टिक... मोठ्या हिल्स ची सॅंडल... तस ते सगळं तीला शोभत पण होताच..तिची लाइफस्टाइल पण तशीच होती...शेवटी डिझायनर ची मुलगी ...एक दम भनांट कॅरेक्टर. .दररोज नवीन कपडे...सहा महिन्यातुन... एकदा नवीन कार घ्यायची... पब...ड्रिंक्स.... उशीरा पर्यन्तर बाहेर फिरणं...लोकांशी उद्धट पणे बोलणं...अजुन बराच काही...हे सगळं तर आहेच...

अजित : (रीच्याच्या आशा बोलन्याने अजित ला थोडा विचित्रच वाटलं...कारण त्याला तिचा वागणं कधी आवडेलच नाय...आख्खा कॉलेज रिचा च्या मागे...परंतु ती अजितच्या मागे...पण तो तिला घास पण टाकत नव्हता)

अजित: ओ... हाय(जर नाराजगीतच)

रिचा : हेय... AJ ... तु बोला नाहीस मी काशी दिसते...आज मी फक्त तुझ्या साठीच साडी नेसुन आलीये...

अजित:(अजितला तिच्या आशा बोलण्याचा राग आला होता.. पण काय करणारं नाईलाज आहे)..हम्म बरी दिसते...(थोडा नाराजगीतच बोलतो)

रिचा: बरी...मी फक्त बरी दिसते...मला तर वाटलं तु मला चांगली कॉम्प्लिमेंट देशील...

अजित:अंग त्यात काय एवढा... इकडे बघ सगळ्याच मुलींनी साडी... घातलीये... सो सगळ्याच समे दिसतायत मला....आणि मला तर सर्वात जास्त माझी मम्मी साडी मध्ये आवडते...तिचा राहणीमान..तिची ती मोठी कपाळावरची टिकली...तिच्या हातातला हिरवा रंगाच्या बांगड्या...वा....कीती पण कौतुक करा तिचा कमीचे

रिचा: (अजितच्या अश्या बोलण्याने तिला राग आला आणि ती काही बोलणारच तेवढ्यात त्यांची गॅंग म्हणजे (पंटर गँग) आली...
@@@@@@@@@@@@@@

चला मग ओळख करून घेऊया सगळयांची

मयुरेश : जसे नाव तसे वागणे त्याचे...शेवटी पोलिसांचा मुलगा... आणि आईने नवस करून गणपती बाप्पा कडुन मागुन म्हणजे नवस मागुन घेतलेला मुलगा... दोन बहिणींच्या पाठीवर झालेला आहे...म्हणुन सगळ्यांचा लाडका... एकचुली त्याच्या पूर्ण खानदान मध्ये हा एकच मुलगा... त्याच्या काकाला सुद्धा तीन मुली आणि दोन्ही आत्याना सुद्धा दोन दोन मुली म्हणुन हा सगळ्यात लाडका सगळ्यांचा... पण मुलीनं पासुन दोन हात लांबच राहतो.... त्याचा एकच लक्ष्य ...मोठा पोलीस ऑफिसर व्हायचा... त्याच्या वाडीलांसारखा...खुप कष्टाळू पोर(चला मग आता वाळुया दुसऱ्या कॅरेक्टर कडे)
--------------------------------------------------

अभिषेक : नावा प्रमाणे तर बिलकुल नाय...ग्रुप तर ह्याच्या विना अधुरा... नुसता फिल्मी शोक...कुठे गाणे वाजले नाही की हा चालु नाचायला...सतत तोंडावर डायलॉग रेंगाळत असतात ह्याच्या...हा कॉलेज मध्ये एक आणि घरी एक अश्या दोन कॅरेक्टर मध्ये असतो...कारण सगळ्या आशा निराशा घरच्यांची ह्याचाच कडुन... अभिषेक च्या घरात पण बाबा (जे एका खाजगी कंपनी मध्ये कामाला आहे... आई हाऊस्वाईफ ...आणि एक मोठीं बहिण... जी आपल्या संवसारात खुश...असे ह्यांचे चौकोनी कुटुंब

नंदु : एक साधा सरळ शेतकरी कुटुंबातील मुलगा... आई वडील गावीच असतात... शेती काम करतात...ते पण दुसऱ्यांच्या शेतात...3 बहिणी होत्या त्याला...त्यातली मोठ्या बहिणीला लहान असतानाच कोणत्या तरी आजाराने देव आज्ञा झाली... आणि रहायला ह्या दोन...आई वडिलांना जमतंय तस त्या दोन्ही मुलींची शिक्षण गावीच चालु आहे... फक्त नांदुला शिक्षणासाठी मुंबईला त्याच्या काकांकडे पाठवला...तसे त्याचे काका काकी सगळेच त्याला हवी तशी मदत करतात.. त्यामुळे नंदुच पण काही टेंशन नाही...

(आता पाहुया काय घडणार पुढे...ही मित्रमंडळी कशी मदत करतील अजितला...काय लिहुन ठेवलं आहे ह्यांच्या आयुष्यात.. लवकरच भेटुया पुढच्या भागात)




🎭 Series Post

View all