Oct 31, 2020
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा पार्ट 4)

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा पार्ट 4)


पार्ट 4

मयुरेश : ये तो बघ अजित तिकडे गार्डन मध्ये...

ध्रुवी : सोबत करुणा पण आहे

(सगळे जण एकत्र गार्डन मध्ये पोहोचतात)

ध्रुवी : ये करुणा तुला बरं वाटतंय ना आता

करुणा : हो ग... ते सवई नाहीये ना मला एव्हडया मोठ्या आवाजाची म्हणुन...

नंदु : अजित तू इकडे काय करतोयस(अजितच्या डोळ्यासमोरून सगळा घडलेला प्रसंग आठवतो)

अजित : ते अरे मला कंटाळा आलेला म्हणुन मी बाहेर आलो

अभिषेक : बरंय तुमच्या दोघांचा एकाला आवाजचा त्रास तर एकाला कंटाळा येतो....

नंदु : तुला का एवढा त्रास होतोय पण...नसेन एखाद्याला बरं वाटतं...
अच्छा ते सगळ सोडा जरा पोटापाण्याच्या पण विचार करा... मला जाम भुक लागलीये ...वेळ बघा ... परत घरी पण जायचं आहे...

(सगळे जन एकत्र हॉल च्या ठिकाणी निघाले...आणि इकडे रिचा सगळ्यांना शोधत असते...तेवढ्यात तिला सगळे येताना दिसतात)

रिचा : हे गायझ कुठे होता तुम्ही सगळे... मी किती वेळची शोधते तुम्हाला सगळ्यांना.....होतात कुठे तुम्ही सगळे?

अभिषेक : ते आम्ही सगळे लॉंग ड्राईव्ह ला गेलेलो ( मुद्दाम चिडवत)

रिचा : ( रागातच) मला सोडुन

करुणा : अग तस काही नाहीये तो तुझी मस्करी करतोय... बाहेरच होतो आम्ही सगळे...चला अता जाऊया पेटपुजेसाठी

(सगळे जण जेवणासाठी निघतात...तेवढ्यात हळुच अजित अभिषेक ला मागे खेचतो)

अजित : तुला काही काम धंदे नाहीयेत का ( हलक्या रागातच)कश्याला तिच्या मागे लागतोस

अभिषेक : ( हसतच )अरे... मज्जा येते मला तिला चिडलेली पाहुन... म्हणुन... तू कशाला टेन्शन घेतोस... में हू ना ...बॉस ...चल... पाव भाजी एन्जॉय करूया
( सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत जेवण संपवलं आणि आप आपल्या घरी जाण्यासाठी निघाले...सगळे खुप दंमले होते)

अभिषेकने नंदुला त्याच्या बाईक ने घरी सोडलं
इकडे मयुरेश वॉक करतच घरी निघाला करण त्याच घर जवळ होतं

रिचा तिच्या स्वतःच्या कार ने घरी गेली
आणि अजित ने संगीता,ध्रुवी आणि करुणाला ज्याच्या त्याच्या घरी सोडण्याचा जिम्मा उचला....

अजितची स्वतःची कार होती... रॉयल्स रॉय...असणारच कारण तो होताच अमीर... कार मध्ये मस्त चंदनाचा सुगंध दरवळत होता...हळुच त्याच लक्ष्य समोरच्या मिरर मध्ये गेलं... त्यातुन त्याला करुणा स्पष्ट दिसत होती...तिचे ते निरागस डोळे...मसुम चेहरा... हलकिच केसांच्या बटांबरोबर खेळताना दिसली

....आपल्याला कोणी तरी पाहताय ह्याचा भास करुणाला झाला... म्हणुन तीनेपन चटकन मिरर मध्ये पाहिले... तिच्या अश्या पहाण्याने अजितला सुद्धा कसं तरी वाटला...म्हणून त्याने पटकन त्याची नजर चोरली... करुणा सुद्धा मनातल्या मनात हसली

...अजितने सगळयांना सेफ घरी सोडलं
@@@@@@@@@@@@@@@

इकडे करुणा घरीं येऊन थोडी फ्रेश झाकी आणि आज काय काय केलं कॉलेज मध्ये...कसा कसा एन्जॉय केला...हे सगळं ती आनंदात...सांगत होती...तिच्या सांगण्यात एक वेगळाच आनंद होता... जो तिच्या वडिलांनी हेरला

इथे अजित सुद्धा त्याच्या घरी पोहोचलो

मेहता विला... जे अजितच एक आलिशान बंगला... बंगला नाही तर त्याला आपण महल बोलू शकतो...ब्रँडेड कार्स...नाकोतेव्हढे नोकर चाकर...स्वीमिंगपुल... जिम... गार्डेन...असे बरेच काही होते त्याच्याकडे...जे त्याच्या स्टेटस ला शोभुन दिसेणं...शेवटी तो एक फॅशन डिझायनर चा मुलगा जो आहे...परंतु अजितला त्या श्रीमंतीचा जरा पण गर्व नव्हता...

अजित : आई...आई ...आई

मिस्टर मेहता: अरे आई म्हणुन काय आवाज देतोयस....मॉम बोल

अजित: ओ फो dad... तुम्हाला महितीयेणा... आईला ही असकी इंग्लिश नावे नाही आवडत...आणि मलासुद्धा.. dad.. आई बोलते ना ते अगदी योग्य आहे ... जी आपुलकी आपल्या मराठी भाषेत आहे ना ...ती इंग्लिश मध्ये...ना...नेव्हर...डॅड एक काम करतो मी.. मी पण तुम्हाला आज पासुन बाबा बोलतो...बघान किती स्पर्शता आहे शब्दात

मिस्टर मेहता : नको...नको...तू मला डॅड च बोल...तुझं चालु राहूदे आई...आई(हसतच म्हणाले)आणि हो आई किचन मध्ये आहे

अजित : ओक डॅड

अजित : आई... ये ...आई

कल्पना : (अगदी माणुस कल्पना करेन तशीच... साधी सरळ...शांत स्वभावाची..तिच्या स्वभावमध्ये मोठेपण कधी दिसुन येणारच नाही...टिपिकल मराठी लुक... कपाळावर मोठं कुंकु... हातात हिरव्या बांगड्या...साधं सरळ राहणीमान)अरे हळु.. किती हाका मारशील... जरा श्वास तर घे(आई हसतच बोलते)

अजित :आई मी आज जाम खुश आहे...खुप मज्जा केली... खुप म्हणजे खुप

कल्पना(अजितची आई) : क्या बात हे...आज साब बडे खुश हे...ह्म्म...

अजित:( आई पासुन नजर चोरून)अग आई तस काही नाही ते सहज बोलो.. आज फंकशन होता ना म्हणुन

कल्पना: अच्छा अच्छा ठिके... बोल काय काय केलंस

(अजितने सुद्धा सारी धमाल मस्ती सांगितली...त्याच्या पण नजरेतील भाव आईने हेरले...अजित खुप थकला होता म्हणुन तो झोपायला गेला... आणि आई (कल्पना) एकटक विचार करत रहायली... किती साधा आहे माझा अजित...माझ्या एका शब्दावर्ती त्याने M D कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतला..का तर मी त्याला एवढंच बोली..माणसाला जर शिकायचं असेल तर तो कुठे पण शिकू शकतो...त्या साठी मोठ्या मोठ्या कॉलेज ची गरज नये... आपण शिक्षण आपल्या बुद्धिप्रामाणे करतो... पैसे तर कुठेही भरायचेत... हा फक्त बुद्धीचा खेल आहे...(कल्पना आपल्या नोकरांना काही सुचना देताच रूम मध्ये गेली)

अजित पण खुप थकल्यामुळे झोपी गेला

(तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा भाग नक्की कळवा मला तुमच्या कंमेंट द्वारे...)