Login

चूक कुणाची भाग २

लघुकथा
रिया काय झाले?तु इतक्या रात्री फोन केलास आणि अशी का बोलते आहेस?काय झाले शौर्यला?तुम्ही सगळे ठीक आहात ना?”अर्जुन घाबरून विचारत होता


“अर्जुन आम्ही ठीक आहोत पण शौर्य ठीक नाही आहे.”रियाने स्वतःला सावरत बोलायला सुरुवात केली.


“शौर्य?काय झाले त्याला?रिया काय बोलते आहेस?”अर्जुन पॅनिक होत बोलला


“अर्जुन शौर्य ड्रिंक्स करून आलाय आणि त्याला काहीच शुध्द नाही आहे.तो…तो…कधी कसा आणि असा करूच कसा शकतो अर्जुन”रिया म्हणाली


“रिया..रिया तू शांत हो आधी”अर्जुन म्हणाला


“कशी शांत होऊ अर्जुन आपला मुलगा ह्या अवस्थेत घरी आलाय आणि तू मला सांगतो आहेस शांत हो”रिया जरा वैतागत बोलली


“रिया मी उद्या येतो आहे तोपर्यंत तू शांत रहा मी आल्यावर बोलू आपण शौर्य सोबत”अर्जुन म्हणाला


“ठीक आहे” म्हणत रिया ने फोन बंद केला.


रिया पुन्हा शौर्यच्या रूम मध्ये गेली आणि त्याच्या जवळ जाऊन बसली.ती त्याला बघून ती विचार करायला लागली,


“का शौर्य काय कमी राहिली आम्ही संस्कार देण्यात कधी कुठल्या गोष्टीसाठी टोकले नाही की मनाई केली नाही पण त्याच्या बदल्यात हे असे काही बघायला मिळेल हा तर मी कधी विचारच केला नव्हता.”


शौर्यला तर अजिबात शुद्ध नव्हती.रिया थोडावेळ तिथे थांबून नंतर आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि विचार करता करता तिला झोप लागली.


दुसऱ्या दिवशी शौर्यला जग आली तेव्हा त्याचे डोके जड झाले होते त्याला काल पार्टी मध्ये काय झाले ते फारसे आठवत नव्हते.ते घरी कसा आला त्याला घरात कोणी घेतले हे काहीच आठवत नव्हते.तो विचार करत होता तेव्हढ्यात रिया रूम मध्ये आली आणि शौर्य समोर लिंबू पाण्याचा ग्लास पकडत बोलली,

“हे घे बरं वाटेल तुला”रिया


शौर्य ने नुसतं तिच्याकडे बघितले आणि ग्लास तिच्या हातातून काढून घेतला.


“आज डॅड पोहचणार आहेत संध्याकाळी घरी थांब कुठलाच प्लॅन बनवू नकोस”रिया म्हणाली


“ओके मॉम”म्हणत शौर्य ने लिंबू पाणी घेतले आणि फ्रेश व्हायला निघून गेला.


रियाला जाणवले की कालच्या गोष्टीमुळे शौर्यला तिच्याशी बोलायला जमत नव्हते.तिने पण विचार केला की अर्जुन आल्यावरच बोलुयात.


संध्याकाळी अर्जुन परत आला. घरात वातावरण जरा शांत आणि ताणलेले होते. रिया दरवाज्यापाशी उभी होती. अर्जुन आत येताच तिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून त्याने तिला जवळ घेतले.
"रिया, सॉरी... आपण हे कधीच अपेक्षित केलं नव्हतं. पण आता चूक शोधायची नाही, बदल घडवायचा आहे."अर्जुन

🎭 Series Post

View all