रिया रायचंद आणि अर्जुन रायचंद बिझनेस वर्ल्ड मधले नावाजलेले जोडपे.दोघांनी खूप कष्टाने आपला बिझनेस वाढवला होता.खूप सदन असे कुटुंब.दोघे नवरा बायको आणि एक मुलगा शौर्य आणि एक मुलगी सिया.असे चौघांचे सुखी कुटुंब.घरात पैश्यांची,वस्तूंची अजिबात कमी नव्हती.हाताशी नोकरचाकर काही काम करायचिभोगराज नाही फक्त सुख आणि सुख, सगळं व्यवस्थित सुरू होते.जसे जसे मुलं मोठी व्हायला लागलीत तसे तसे त्यांना आधुनिक वस्तू मिळायला लागल्यात.त्यांना सांभाळायला एक दीदी एक मावशी अशा दोघी त्यांची पण खूप चैन होती.
मुलगी 12 वर्षाची आणि मुलगा 15 वर्षाचा,आत्ता पर्यंत ह्या दोघांचे आयुष्य छान आरामात त्यांना हवे तसेच सुरू होते.आई वडिलांना कधी काही मागितले की लगेच मिळायचे,नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता कारण रिया आणि अर्जुन ला वाटायचे आपण त्या दोघांना पैसा आणि सुखसोयी देतो आहोत त्यामुळे आपण खूप काही करतो आहोत.त्यांना ह्या गोष्टी द्यायला प्रोब्लेम नव्हता प्रश्न होता तो वेळेचा रिया आणि अर्जुन कडे मुलांना द्यायला वेळच नसायचा सतत मीटिंग,बिझनेस ट्रिप, किटी पार्टी,बिझनेस पार्टी आणि सतत मीडिया त्यांना घेरून असायचा.ह्या सगळ्यात मुलं कधी त्यांच्या पासून दूर झालेत त्यांना कळलेच नाही.
शौर्य आणि सिया आपल्याच मोबाईल जगात रमले होते.त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांचे प्लॅन्स,पार्टी आणि चील आऊट ह्यातच वेळ जायचा अश्यातच शौर्य वाईट सवयीच्या आहारी गेला.रिया आणि अर्जुन ला ह्या गोष्टींची काहीच माहिती नव्हती कारण ते मुलांना वेळच देत नव्हते.
एक दिवस शौर्य रियाला सांगून पार्टी करायला गेला.रिया आणि सिया दोघीच घरी होत्या.अर्जुन बिझनेस मीटिंगसाठी परदेशी गेला होता.रात्री 2 वाजता शौर्य घरी आला तेव्हा तो ड्रिंक्स करून आलेला त्याच्या मित्रांनी कसंबसं त्याला घरी सोडलं.ह्या आधी पण त्याने ड्रिंक्स घेतले होते पण ह्या वेळेस तो खूप प्यायला होता त्यामुळे त्याला स्वतःला सावरता सुद्धा जमत नव्हते.त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला घरी सोडले तेव्हा त्याची अवस्था बघून रिया सुन्न झाली.तिला अजिबात विश्वास बसत नव्हता.तिने शौर्यला घरात घेतले आणि त्याच्या बेडरूम मध्ये झोपवले.
रिया रूम मधून बाहेर आली आणि विचार करू लागली की हे असे कसे घडले?शौर्यला ह्या सवयी कधी आणि कशा लागल्यात?रिया ला काही सुचत नव्हते तिने तेव्हाच अर्जुन ला फोन केला,फोनवर त्याचे नाव बघून अर्जुनने लगेच फोन रिसिव्ह केला आणि म्हणाला,
“हॅलो रिया”अर्जुन
“अ….अर्जुन ते ते शौर्य”रियाला काय बोलावे ते पण सुचत नव्हते
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा