Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

(चौकट) जाळ्यातिल कोळी

Read Later
(चौकट) जाळ्यातिल कोळी

*जाळ्यातिल कोळी *
अंजली ने पर्स मध्ये लंच बॉक्स व रुमाल ठेवत घड्याळ पाहिले, सकाळचे नऊ वाजले होते अजून दहा मिनिटे हातात आहे असे पाहून तिने आईकडे फोन लावला
.
बराच वेळ रिंग वाजत होती. खरेतर तिकडेही घाईचीच वेळ असते. दादा , वहिनीऑफिस ला तर मधुरा मनीष ची शाळा त्यातून आईची गुडघेदुखी.
बऱ्याच वेळाने हॅलो --असा आईचा आवाज आला.
"आई मी अंजू...".
"अग पुण्याहून केव्हा आलात?
तुझ्या दिरा कडची वास्तु कशी झाली, भाऊजी आणि वहिनी कसे आहेत"?
आईला सर्वच ऐकायची घाई.
अगं "आम्ही काल रात्री च आलो, मी आत्ता ऑफिसला निघते आहे आज माझा हाफ -डे आहे, तेव्हा मी तीन वाजेपर्यंत घरी पोहोचेन तेव्हा तूम्ही च इकडे या, मग आपण निवांत बोलू."
ठीक आहे न-- म्हणत अंजलीने फोन कट केला, नाहीतर --आईने आत्ताच सगळ्या चौकशा केल्या असत्या.

दुपारी अडीच वाजेपर्यंत मान वर करून पाहिला उसंत नव्हती. 4 -5 दिवसाचे पेंडिंग काम होते घराचेही असेच हालआहे पण-- उद्या रविवार तेव्हा होईलच--
घरी येताना तिने आईच्या आवडीचे बेक समोसे घेतले.
दारा ची बेल वाजताच अंजलीने दार उघडून आईला आत घेत विचारले" बाबा नाही आले?
अगं" नेमकी आज त्यांच्यी सोसायटीची मीटिंग, सेक्रेटरी ते, सगळी जबाबदारी जणू यांचिच पण जाऊ दे, त्यांचे ते नेहमीच ग. तू सांग वास्तुशांत कशी झाली दिराचे घर कसे आहे"?

कार्यक्रम तर खूपच छान झाला ग आणि घर ही खूप छान आहे. नंतर आम्ही एक दिवस भर काकूंकडे ही गेलो होतो.
अग आई -"-काकूने काय मस्त बाग फुलवली आहे, पुण्याच्या हवेत फुलली ही छान", जणूकाही--
\"माहित आहे ग, अंजलीला मध्येच अडवत आई बडबडली" त्यांना काय ग वेळ च वेळ, पैशांचा प्रश्नच नाही आणि जागेची कमतरता नाही , इथे आपल्याकडे एक तुळशीची कुंडी ठेवायची तरीही पाणी खालच्या ब्लॉकला न जाईल असे पाहावे लागते."

आईचे नेहमीचे पुराण सुरू झालेले पाहून मग अंजलीने गरम समोसे ,मिल्क केक, चहा असा आईचा आवडता फराळ काढला व काकूने दिलेली साडी वगैरे दाखवत विषय बदलला.

रात्री अजित आईला पोचवायला कार ने गेले..
अंजली कपडे घर आवरता आवरता विचार करत होती, आईला काकूचा हेवा वाटतो की काय? काकू ची दोन्ही मुले भारताबाहेर .एक यु -एस तर दुसरा जपानमध्ये असल्याने काका व काकू दोघेच पुण्यात राहतात त्यामुळे त्यांना मिळणारा निवांत वेळ ,त्यांचे बाहेर फिरणे, मधून मधून विदेश प्रवास या त्यांच्या आनंदाच्या गोष्टी आईला दिसतात, पण --मुलांशिवाय येणारे एकटेपण, नातवंडांच्या बाललीला, बोबडे बोल ऐकायला आसुसलेले मन किती कातर होते ते तिने कधी अनुभवले?
मागे अंजली चे शिक्षण पूर्ण होताच, लग्नाच्या आधी ती काका कडे राहायला गेली होती तेव्हा नुकतेच काकाची दोन्ही मुले अरुण- वरूण परदेशी गेले होते. काकूला बरे नव्हते वरून वरून छान दिसायची पण, मधूनच अपसेट व्हायची .
काका अंजली जवळ बोलले-- मुले सुना सर्व बाहेर गेल्याने तिला आपण एकटे पडलो या भावनेने आलेले तिचे हे मानसिक व त्यामुळे आलेल शारीरिक आजार पण आहे.

पण मग मात्र हळूहळू काकूने एकटेपणा ची चौकट मोडून काढली व स्वतःला सावरले. बाह्य गोष्टींमध्ये रस घेऊ लागली .बागवानी हा त्यातलाच भाग.
रिकामे राहणे नको कारण घरात रिकामे राहिले की मग आठवणींचा भुंगा मन कुतरतो. म्हणून मग लेडीज क्लब जिम गाण्याचे कार्यक्रम बाल, वृद्धाश्रमाला भेटी देणे असे करत स्वतःला सावरले.
अंजली चा लग्नात काकू ने तब्येत व मन दोन्ही सावरले. तरी दादा, वहिनी ,मधुरा, मनीष ला पाहून तिचे मन परत हेलावले त्या आठ दिवसात मग तिने या नातवंडांचे कौतुक करून आपली भूक भागवली .
लग्नात सर्वांना भरपूर भेटीही दिल्या आईला हे सर्व प्रदर्शन वाटत होते.
अहो- दोन-चार दिवस छानच वाटेल असे तिने काकूला सुनावले.
आईला स्वतःजवळ असलेली मायेची संपत्ती कवडीमोल वाटते व काकूच्या गारगोट्या हिरे माणकं वाटतात.
अंजलीने अनेकदा आईला समजावून पाहिले, अग तू ही काकू सारखी थोडी मोकळी होना.जरा बाहेरच्या जगाचा अनुभव घे.
बाबा आणि तू चार दिवस बाहेर फिरायला कुठे तरी गावाला, देवदर्शनाला जाऊन ये
पण ते तिला जमत नव्हते, तिने स्वतःला एका चौकटीत बांधून घेतले होते आणि त्यामुळे ती थोडी चिडचिडी झाली होती म्हणतात ना" सुख वाटे जवा पाई दुःख डोंगराएवढे "तसेच काहीसे होते.
अंजलीच्या लग्नात झालेल्या दगदगीने आईची तब्येत बिघडली. आठ दिवस वहिनीने सुट्टी घेतली,
सर्व घरच आईच्या सेवेस हजर होते .नातवंड पण आजीचे औषध-पाणी पहात तिच्याजवळ बसत.
अंजली ही सासरहून परत आली, तीही रोज एक चक्कर लावत होती .आईला थोडे बरे वाटल्यावर अंजली हट्टाने आई ला आपल्या घरी घेऊन आली. आता आठ दिवस इथेच आराम कर माझी कामवाली बाई ही आहे.
पण चार दिवस झाले आणि आईने घरी परतण्याचा हट्ट सुरू केला.
अंजलीने कसेबसे आईचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
आता तर तुला थोडे बरे वाटते आहे मलाही तुझी थोडी सेवा करू दे आणि वहिनी लाही स्वतंत्र पणे आपले आपण मॅनेज करू दे., मी तुला इतक्यात घरी जाऊ देणार नाही. तेव्हा कसेबसे दोन दिवस आईने आणखीन दम धरला पण मग अगं-- मला आता करमत नाही ग, तिकडे सुनबाई ला पण ऑफिस आणि घर दोन्ही संभाळणे जड जात असेल मधुरा अजून लहान आहे ती घरी एकटी वगैरे वगैरे अशी बरीच कारण पुढे करत आईने घरी जाण्याचा हटृ धरला तेव्हा नाईलाजाने अंजलीने दादाला फोन केला.
हे सर्व मागच झालेले आठवून अंजलीला वाटले आईची ही नेहमीची कुरबुर वरवरची आहे, मनातून मात्र ती त्यासर्वातच सुखी आहे. सततएका चौकटी त राहून स्वतः नवीन बदल स्वीकारायला तयार नाही . स्वतःभोवती जाळं विणून जग हे एवढेच आहे व सुरक्षित आहे असे मानणारी जाळ्यातली कोळी जणू.
-----------------------------------------
लेखन.. सौ.प्रतिभा परांजपे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//