चॉकलेटी आठवण @राधिका कुलकर्णी.

थोडेसे वैचारिक...

चॉकलेटी आठवण ....

(©®राधिका कुलकर्णी)

एकदा मी एका गेट टुगेदरला गेले.तसे बऱ्याच वर्षांनी भेटणार होतो त्यात काहींना मी पहिल्यांदाच तर काहींची थोडी जास्त ओळख अशा कॅटॅगिरीज होत्या.
मग जाताना मी सर्वांना चॉकलेट घेवून गेले.
नेहमी सारखेच पहिल्यांदा आेळख सत्र पार पडले.मग मी सगळ्यांना एक एक चॉकलेट दिले.आळखीच्या मित्र/मैत्रीणींनी छानसे मीठी मारून स्विकारले काही हसून थँक्यू सारखी औपचारिकता केली.

दिलेले चॉकलेट सर्वांनीच बायकांनी पर्समधे तर पुरूषांनी खिशात टाकले.
चॉकलेट वाटण्याची औपचारीकता पार पडल्यावर मी पून्हा सगळ्यांच्या समोर स्टेजवर ऊभी राहीले.
सगळ्यांना उद्देशून म्हणाले,"मित्रहो, मला दोन मिनीट तुम्हा सर्वांशी बोलायचेय,बोलू का?
सगळ्यांना वाटले आता ही नक्की कोणती तरी स्वरचीत कवीता वाचन वगैरे करणार पण मी त्यांना लगेच क्लियर केले, "नाही नाही, मी इकडे कोणतेही काव्य वाचन करणार नाहिये फक्त मनातले थोडेसे बोलायचेय तुमची परवानगी घेवून बोलू का!?"
सगळ्यांनीच माना हलवल्या.
मी दोन मिनीट पॉझ घेतला.
मग म्हणाले.
"मित्रहो आज इतक्या वर्षांनी आपण भेटतोय.आनंद,उत्सुकता सगळेच आहे.ते दिसतेही आहे सर्वांच्या नजरेत पणऽऽऽ

आता मी पून्हा पॉज मोडवर..
सगळे नजरेतूनच पूढे काय अशा प्रश्नार्थक नजरेने मलाच बघत होते.
मी पूढे सूरू केले.
मी नुकतेच ह्या भेटीची आठवण गोड व्हावी म्हणून एक एक चॉकलेट सर्वांना दिले.
तुम्ही सर्वांनी काय केले त्याचे.?!
कोणी आपल्या मुलाबाळांसाठी किंवा मग कुणाला आवडत नाही/शुगरला चालत नाही/अॅलर्जी अशा किंवा इतर काही कारणास्तव ठेवून दिले
म्हणजे खाल्लेच नाही.

मित्रहो आनंद हा जगायचा असतो.आपण नेहमीच असे अालेले कित्येक आनंदाचे गोड क्षण स्वत:च पर्समधे बंद करून जगायचे विसरून जातो.
त्यामुळे एका गोड आठवणीला मुकतोच नाही का!!!
आता मी अजून एक मोठ्ठे चॉकलेट आणलेय आणि हे आपण सगळे मिळून खाणार आहोत,चालेल ना!!!

अरे वर्षातले 365 दिवस तर आपण आपल्या कर्तव्य आणि दुखण्या बहाण्यांना गोंजारत जगतच असतो की पण मग एक दिवस त्या सगळ्याला विसरून आनंदाचा सोहोळा करायला आणि मनसोक्त जगायला काय हरकत आहे!!
पटतेय ना! !
सगळेच जरासे भावूक झालेले मान डोलावून मला मूक संम्मती देत होते.
चला तर मग ह्या क्षणाला सोहोळ्यात रूपांतरीत करूया.
लगेच मी मोठ्ठे चॉकलेट रॅपर टराटर फाडून चॉकलेटचे तुकडे केले. ह्यावेळी सगळ्यांनी मात्र उत्साहात ते लगेच मटकावले आणि मलाही अर्धे दिले.नवीन ओळखीच्यांनी ही गळा भेट घेवून माझ्या बोलण्याला पोहोच पावती दिली. आता सगळेच एकमेकांना गळा-भेट हस्तांदोलन करून स्पर्शातून प्रेमाचे वाटप करत होते.
आता सगळे वातावरण आनंदसोहोळ्यात बदलून गेले.
क्षणापूर्वीचा आैपचारिकतेचा बुरखा कुठेतरी कोपऱ्यात गळून पडलेला होता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
चला तर मग असेच आपणही करूया. कोणीही दिलेल्या भेटीचा मान ठेवूया.त्यामागील प्रेमाचा, मायेचा मान ठेवू.
आनंद हा जगायचा असतो त्याला टॅग वरून तोलायचे नसते एवढे तर नक्कीच करू शकतो, नाही का!!!
माझ्या सर्व गोड मित्र-मैत्रीणींना
Chocolateमय गोड शुभेच्छा!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी

🎭 Series Post

View all