चिऊ काऊची आधुनिक गोष्ट

Reality


कथा क्रमांक: १

कावळा :चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी:वर्क फ्रॉम होम चालू आहे, व्हिडीओ कॉल करू दे..

कावळा :चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी:थांब जरा पीठ मळु दे

कावळा: चिऊताई चिऊताई दार उघड 
चिमणी: थांब मला जरा भांडी घासू दे..

कावळा:चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी:थांब जरा मला स्वछता करू दे...

चिऊ ताई आजही व्यस्तच आहे, उलट चिऊताईच्या अंगावर जबाबदारी वाढली आहे...आता  ते कावळ्याच्या  लक्षात आले ,म्हणून कावळ्याने डुप्लिकेट किल्ली बनवून आणली होती,त्याने दार उघडलं पाहतो तर काय चिऊ ताई चक्कर येऊन पडली होती...दिवसभराच्या कामामुळे ती भरपूर थकली होती,लगेच कावळ्याने डॉक्टरांना फोन लावला...

 घरातल्या प्रत्येकाने थोडी जबाबदारी घेतली तर चिऊ ताईचा ताण नक्कीच कमी होईल????

कथा क्रमांक: २.
एक होती चिमणी आणि एक  होता कावळा ,.एक दिवस कावळ्याला तहान लागली,आता चिमणीला वाटलं की, कावळा माठ शोधेल आणि त्याच्यात छोटे दगड टाकेल....पण कावळ्याने तसे केले नाही,तो चिमणीला बोलला येतो मी जरा जाऊन तू थांब..... थोड्या वेळाने कावळा आला, चिमणीने त्याला माठ सापडला  का?? विचारले तर कावळा बोलला.."नाही ग , मी पाणी पिऊन आलो..येतानाच मी पाहिले होते इथे नदी आहे ..म्हणुन मी आधीच लक्षात ठेवले होते,हे घे तुझ्यासाठी पण पाणी आनले ,कावळ्याने चोचीत छोटी  पाण्याची बाटली आणली होती.....

चिमणी बोलली हुशार आहेस की तू....कावळा बोलला,माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं उडताना नेहमी निरीक्षण करायचं म्हणजे जगणं सोप्पे, सहज आणि सुंदर होते...

कथा क्रमांक: ३

छोटासा कावळा खेळत होता त्याच्या मैत्रिण चिऊ बरोबर....खेळता खेळता दोघे एका घरापाशी गेले,एक ताई कोपऱ्यात बसली होती रडत, छोटा भाऊ तिच्या अवतीभवती खेळत होता, तोच त्या मुलीची आजी आली आणि तिच्या भावाला बोलली ,ताईच्या जवळ जाऊ नको तिला कावळा शिवला आहे.......

तोच कावळा चिऊला बोलला ,ही आजी खोटं का बोलते ?मी कुठे त्या ताईला शिवलो??????

चिऊ बोलली,काउ तू नको मनावर घेऊ तुझा आणि त्याचा काही संबंध नाही पण, हे असेच बोलले जाते......बाबुच्या मनात नको ती भीती घालते आहे ती आजी ,  ...ती ताई बघ किती विव्हळत आहे तिला जवळ घ्यायचं सोडुन लांब पळत आहे.चल आपल्या उबदार घरट्यात जाऊ..आपलं घरटं बरं.

अश्विनी पाखरे ओगले...
लेख आवडल्यास लाईक,कंमेंट शेअर करा..
साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे....