चिरुमाला (भाग ११)

पो.स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने..........


पो. स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने मी थोडा नर्व्हस होतो. गेलो तेव्हा इन्स्पे. कानविंदे मोहंती साहेबांशी बोलत होते. मला मोहंती साहेबांचं आश्चर्य वाटलं एवढा मोठा धक्का बसूनही ते थंडपणे घेत होते. फक्त उठताना मात्र ते धमकीवजा म्हणाले, " ऑफिसर ध्यानमे रखना अगर मेरी बेटी नही मिली या उसके साथ कुछ हुवा तो तुम तुम्हारे कुर्सीकी फिकर करना चालू करो, समझे " हे बोलणं अर्थातच कानविंदेंना आवडलं नाही. " सर हम पूरी कोशिश करेंगे, आप फिकर नही करना " मग मोहंती म्हणाले, " फिकर मुझे नही आपको करनी है. " असं म्हणून मोहंती गेले. कानविंदेंची चर्या उतरली. त्यावर त्यांनी राग माझ्यावर काढायला सुरुवात केली. मला दरडावून म्हणाले, " बोला सबनीस लवकर बोला, तुम्ही मुलीला कशी गायब केलीत, का तुमचा कुणावर संशय आहे ? " मी शांतपणे म्हणालो, " हे पाहा साहेब , सगळे लोक पार्टीला होते. त्यामुळे कोणाचाच संशय घेता येत नाही. मग मात्र ते उसळून म्हणाले, " याचाच अर्थ असा, की तुम्ही मुलीच्या अपहरण कर्त्याला सामिल आहात. असा कसा तुम्हाला संशय येत नाही ? " आता मात्र मी गप्प बसणं पसंत केलं. मला माहित होतं की त्यांच्या जवळ कोणताच पुरावा नसल्याने ते भडकले होते. मी काहीच बोलत नाही असे पाहून ते म्हणाले, " चला , आपण परत तुमच्या वाड्यावर जाऊ. मला आत्ता दिवसाउजेडी वाडा पाह्यला पाहिजे. " ; त्यावर मी त्यांना म्हंटले, " अहो मला ऑफिसला जाणं भाग आहे. आज मिटिंग आहे. " त्यावर त्यांनी उत्तरादाखल उठून दोन कॉन्स्टेबल बरोबर घेत ते गाडीकडे निघाले. गाडीत बसता बसता मला म्हणाले, " तुम्हाला काय वाटलं तुमच्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही ? " असं म्हणून गाडी चालू केली. तितक्यात मला तिथे हरिदास येताना दिसला. मी पटकन त्यांना म्हंटलं, " साहेब तो पाहा हरिदास एजंट. " त्याबरोबर ते खाली उतरले. आणि मला जायला सांगून ते त्याला घेऊन आत गेले. माझं काम झालं होतं. लीना घाबरली होती. मला आज तरी पोलिस माझ्या घरी यायला नको होते. एकूण प्रकरणावर नीट विचार करून मी काही सापडतंय का ते पाहणार होतो. त्यासाठी मला वेळ हवा होता. शिवाय मला रसिकाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. मी तसाच बँकेत गेलो. जुडेकर आला होता . पण गोळे आला नव्हता. बाकी स्टाफ होता. त्यांना याची थोडी कुणकुण लागली होती. पण मी कालचा विषय काढला नाही. तरी संध्याकाळी पै त्याबद्दल बोललेच. " सर , मला वाटतं, कालच्या विधींमुळे तर असं झालं नाही. ? " मी त्यावर त्यांना म्हणालो, " पै साहेब माझा असल्या विधींवर काडीमात्र विश्वास नाही, केवळ माझ्या बायकोच्या समाधानासाठी मी हे सगळं केलं. नक्कीच याच्या मागे कोणितरी आहे. ते शोधावं लागेल. मलाही आणि पोलिसांनाही. " असं म्हणून मी गाडी काढून घरी निघालो. मी चांगलाच उत्तेजित झालो होतो.


घरी गेलो आणि लीनाला विचारलं , " चल रसिकाला डॉक्टरांकडे नेऊन आणू. " त्यावर ती म्हणाली, " मी नेऊन आणल्ये. तुमची गरज नाही. " आणि ती अबोला धरून बसली. रसिका नुकतीच झोपली होती. मी लीनाला म्हंटलं, " जे झालं त्याला मीच जबाबदार आहे अशी तू का वागतेस ? " तिने त्यावर काहीच उत्तर न देता माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवला. आणि ती जाऊ लागली . आता मात्र मी पुढे होऊन तिचा हात धरून तिला जबरदस्तीने सोफ्यावर बसवून म्हंटले, " लीना हा काय वेडेपणा आहे ? अगं या सगळ्याला मी जबाबदार नाही . " तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ......... " हे पाहा आज सकाळपासून बाजूच्या बंद खोलीतून वेगवेगळे आवाज येतायतं. समजलं, विचारा पाहिजे तर भावजींना. पोलिसही येऊन गेल्येत. त्यांच्या परत परत त्याच प्रश्नांनी मला भंडावून सोडलं. त्यांना काहीही सापडलं नाही म्हणून ते वैतागून निघून गेले. ..... " थोडावेळ थांबून ती म्हणाली, " मी इथे राहणार नाही मुलांच्या परीक्षा झाल्या की या शाळेतला दाखला काढून घेऊन मी मुंबईला निघून जाईन. " मी काही बोलणार तेवढ्यात माझा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावरून उतरत खाली आले आणि त्यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला. .... "अरे विकास , वास्तुशांत झाली , म्हणजे सगळं संपायला हवं की सुरुवात व्हायला हवी. लीना म्हणत्ये ते खरं आहे. आणि हो आम्हीही उद्या सकाळी निघतोय. " आता मात्र मला राग आला. सध्या मी लीनाला काहीच बोलू शकत नव्हतो. की त्या खोल्यांमध्ये जाऊन पुन्हा शोधाशोध करू शकत नव्हतो. जेवणाच्या टेबलावर कोणीच बोलायला तयार नव्हते. .......ती रात्र अशीच गेली. रात्रीत एक दोन वेळा मी लीनाला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. तिने माझा हात जोरात बाजूला सारला. ती उठून हॉलमध्ये झोपायला निघून गेली. मला कोणतेही आवाज ऐकू आले नाहीत की कोणता भास झाला. दुसरा दिवस मंदपणे आणि मरगळलेला उगवला. मनावर एक प्रकारचं हारल्यासारखं सावट राहिलं. त्याही अवस्थेत, मी मुलांना शाळेत सोडून आणि बंधूंना एस टी स्टँडला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिले. बंधू फारसं काही बोलले नाहीत . फक्त " तू ही नोकरी सोड , म्हणजे सगळं काही ठीक होईल, " असे मात्र म्हणाले. मी काहीच बोललो नाही. घरी आलो तेव्हा साडेनऊ वाजत होते. मला सकाळचा दुसरा चहा लीनाने न बोलता आणून दिला. थोड्यावेळाने तिने दिलेला डबा घेऊन मी ऑफिसला गेलो. आजकाल घरातला संवाद संपला होता. पुन्हा एकदा वाडा मौनव्रत स्वीकारतो की काय असे मला वाटू लागले. अचानक लाभलेला इतक्या दिवसांचा आनंद नाहीसा झाला. ....... ऑफिसला गेल्या गेल्या हेड ऑफिसचा फोन आला. त्यावर मला कालच्या मिटिंगला गैरहजर राहिल्याबद्दल चांगल्याच कानपिचक्या दिल्यागेल्या. माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत मी असे प्रथमच ऐकत होतो . अर्थातच , मी त्याच्यावर पो. स्टेशनला जाणं कसं जरूरीचं होतं ते पटवायचा प्रयत्न केला . पण मी ऑफिसची परवानगी न घेता पोलिस स्टेशनला का गेलो ते विचारलं गेलं . त्याचप्रमाणे मला पो. स्टेशनला संध्याकाळीही जाता आलं असतं हे सांगितलं गेलं . माझी मनः स्थिती चांगलीच बिघडली. तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला कशाला सांगता ? वाड्याचं पुढे काय झालं ते सांगा. तुमचंही बरोबर आहे. संध्याकाळी घरी गेलो. मुलं बाहेर खेळत होती. लीनाचा अबोला चालूच होता. तरीही मी मुलांना घेऊन बाहेर गेलो. त्यांच्या मनोरंजनात काही कमी करित नव्हतो. लीना मात्र बरोबर यायला तयार नव्हती. मग मात्र मुलं हट्ट धरून बसली. " मम्मी , तू पण चल ना ग. " रसिका म्हणाली. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मीच म्हंटलं , " अगं काही काही लोकांना ना आपल्याबरोबरयायला आवडत नाही. चला आपणच जाऊ या. " पण आता रसिका हटत नव्हती. ती मागेच लागल्यामुळे लीना तयार होऊन आली . मग आम्ही गावातल्या पार्कमध्ये गेलो. मुलं खूश होती. त्यांना खाऊही मिळाला होता. इतर मुलांमध्ये ती रमली. लीना आणि मी एकाच बाकावर घटस्फोट घेतल्यासारखे बसलो होतो. तेवढयात तिथे अचानक गोळे आला. त्याची बायकोही बरोबर होती. आज तिने अबोली रंगाचा ड्रेस घातला होता. आता ती जास्तच आकर्षक दिसत होती. मी गोळेशी जुजबी बोललो. तोही तुटक उत्तरे देत होता. त्याची बायको मात्र लीनाशी चांगलं बोलत होती. दोघींचं अचानक कसं काय जमलं कुणास ठाऊक. मला तर गोळे कधी जातो असं झालं होतं. त्यात त्याच्या बायकोची फिगर माझ्या डोळ्यात खुपत होती. ती अधून मधून माझ्याकडे पाहत होती. की मीच तिच्याकडे पाहत होतो म्ह्णून मला तसं वाटत होतं, कोण जाणे. थोड्याच वेळात ते दोघे गेले. मी सहज म्ह्णून लीनाला म्हंटलं.. " यांना मुलं नाहीत हे खरं वाटत नाही , नाही का ? " लीनाने उत्तरादाखल फक्त रसिका आणि राहुलला चलण्याची आठवण केली. ते तयार नव्हते, पण कुरकुरत तयार झाले. रसिकाची " आत्ताच तर आलो आपण शी ! काय हे ........ " अशी सारखी कुरबुर चालू होती. घरी पोहोचलो. घराचा दरवाज्या उघडला. आणि अचानक ऊद जाळल्यासारखा वास आला. पण कोणी जाळला असेल ? त्याचा काहीही मागमूस लागेना. म्हणून ज्या कोनाड्यात फकीर बाबांनी दिलेला ऊद ठेवला होता तिथे पाहिले तर उदाची पुडीच नाहीशी झालेली दिसली. उदाचा वास हळू हळू कमी झाला. लीनाने माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले . जणूकाही तिला म्हणायचे होते, की पाहिलंत ना हे असं होतंय, म्हणून तर मी जाणार आहे. अर्थात ती काहीच बोलली नाही स्वैपाकघरात जाऊन ती जेवणाच्या तयारीला लागली. जेवणं झाली. माझं कोडं अजून सुटत नव्हतं. उदाची पुडी गेली कुठे ? आणि मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतक्या दिवसात ऊद जाळला असता तर काही तरी वेगळं झालं असतं . पुढचे पंधरा दिवस काहीच घडलं नाही. अधून मधून सारखे कानविंदे बोलवायचे , पुन्हा पुन्हा स्टेटमेंट घ्यायचे. नवीन काहीच घडत नव्हतं की सापडत नव्हतं. मलाही आणि पोलिसांनाही. एकदाचा जानेवारी महिना संपला. आता हेडऑफिस मधून आमच्या लोन डिपार्टमेंटचे असि. चीफ मॅनेजर पिंटो यांच्यासोबत प्रत्येक ब्रांच हेडची मिटिंग ठरली. जी मुंबईला होती. त्या निमित्तने मला दोन दिवस मुंबईला जायची वेळ आली. लीना मात्र वाड्यात मुलांना घेऊन एकट्याने राहायला तयार नव्हती. म्हणून तिलाही बरोबर घेऊन जावे लागले. मुलांच्या शाळेत आजारपणाची खोटी चिठ्ठी पाठवून ती त्यांना घेऊन निघाली. आमचं घर होतंच. बरोबर या वेळेला जुडेकर होता. फाईली सांभाळणं आणि तो हुशार असल्याने कोणत्या अर्जदाराबद्दल आम्ही काय कारवाई केली हे त्याला चांगलंच माहित असल्याने तो मला माहिती फीड करणार होता.

   मिटिंग ठीक अकरा वाजता चालू झाली. मॅनेजर पिंटो यांनी बँकेची पॉलिसी आणि प्रत्येक ब्रांचला लोन देण्यासाठी सुपूर्त केलेली रक्कम याबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी महिना असल्याने प्रत्येकाच्या जवळ जवळ फायनल फिगर तयार होत्या.

एक फक्त मी सोडून . तशी माझीही फिगर तयार होती. पण ती अगदीच नगण्य वाटत होती . अर्थात त्याला कारणं होती. मि. मोहंती यांच्या हाताखाली एकूण पाच ब्रांचेस होत्या. त्या सगळ्यांमध्ये माझी फिगर सर्वात कमी होती. माझ्या ब्रांचचे नाव पुकारण्यात आल्यावर मी माझी फिगर
सांगितली , त्याबरोबर पिंटो साहेब मोहंतीना म्हणाले, " मि. मोहंती हे काय चाललय ? तुम्ही सबनिसांवर कारवाई का केली नाही. निदान इन्स्पेक्शन घेऊन त्यांना ताकीद तरी द्यायला हवी होतीत. " त्यावर मोहंती काहीच बोलले नाहीत. मग मला मी " प्रत्येकाची सिक्युरिटी आणि
स्टॉक पडताळून मगच लोन्स दिलेली नाहीत . बँकेला त्यामुळे भविष्यात वसुलीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला. " असे सांगितले. मग मात्र पिंटी भडकले, " अहो , पण सध्या पाच लाखाच्या आतल्या कर्जांना सिक्युरिटीवर जास्त जोर देऊ नये असा सरकारचा आदेश आहे. मग तो आपण धाब्यावर बसवायचा का ? तुम्हाला दिलेल्या परिपत्रकात सगळं विस्तृत दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास करीत नाही का ? "मग मोहंतींकडे वळून ते म्हणाले, " काय हे , काय चाललंय काय तुमच्या राज्यात ? हे असं . " मोहंती पुन्हा काही बोलले नाहीत. ते पाहून पिंटो साहेबांनी बरोबर आणलेल्या स्टाफला ताबडतोब सूचना देऊन मोहंतींनाच मेमो दिला आणि " मला याचं स्पष्टिकरण एका आठवड्याच्यात पाहिजे " अशी तंबीही दिली. मग मिटिंग संपली. मला मोहंतींची दया आली. आपणच आता काहितरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. एकीकडे मुलगी नाहीशी होणं हा ताण त्यांच्या डोक्यावर होता. आमच्या नंतर पिंटो साहेबांसमवेत उद्योजकांची मिटिंग होती. आम्ही कॉंफरन्स हॉलच्या बाहेर आलो. नेमका शितोडीकर भेटला. त्याच्या नजरेत कृद्धपणा भरलेला होता. आता तर त्याला संधी मिळाली. हेच खरं. मी बाहेर आल्या आल्या मोहंतींची माफी मागितली. आणि अजून एक महिना बाकी आहे त्यात मी जेवढा बॅकलॉग भरून काढता येईल तेवढा भरून काढीन असे आश्वासन त्यांना दिले. ते फार काही बोलले नाहीत. पण निघून गेले. माझ्याबद्दलचं इंप्रेशन बिघडलेलं दिसलं. जुडेकरला मी शोधू लागलो. तेव्हा तो श्रिवास्तव बरोबर बोलत असलेला आढळला. श्रीवास्तवला बरे वाटल्याचे दिसत होते. मी जुडेकरला खडसावून विचारले, तेव्हा त्याने श्रीवास्तवलाही वैयक्तिक स्वरूपाचे लोन हवे असल्याबद्दल तो बोलत होता असे म्हणाला. माझा विश्वास बसला नाही. मी नंतर बोलण्याचे ठरवले. आम्ही दोघेही माझ्या घरी आलो. आजच्या दिवस राहून रामनूरला दुसऱ्यादिवशी जाण्याचे ठरवले. त्यावर लीना म्हणाली, " मी दोन दिवस इथेच राहणार आहें, नंतर येईन. " मी मान्य केले. आम्ही मात्र दुसऱ्यादिवशीच निघालो. तो शनिवार होता. थेट बँकेत गेलो. तालुक्याची ब्रांच असल्याने एक प्रकारचा मंदपणा होता शहरामध्ये ब्रांच कशी भरलेली असते. इथेही स्टाफ कामात गर्क होता. पण का कोण जाणे मिटिंग ठीक अकरा वाजता चालू झाली. मॅनेजर पिंटो यांनी बँकेची पॉलिसी आणि प्रत्येक ब्रांचला लोन देण्यासाठी सुपूर्त केलेली रक्कम याबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी महिना असल्याने प्रत्येकाच्या जवळ जवळ फायनल फिगर तयार होत्या.
एक फक्त मी सोडून . तशी माझीही फिगर तयार होती. पण ती अगदीच नगण्य वाटत होती . अर्थात त्याला कारणं होती. मि. मोहंती यांच्या हाताखाली एकूण पाच ब्रांचेस होत्या. त्या सगळ्यांमध्ये माझी फिगर सर्वात कमी होती. माझ्या ब्रांचचे नाव पुकारण्यात आल्यावर मी माझी फिगर
सांगितली , त्याबरोबर पिंटो साहेब मोहंतीना म्हणाले, " मि. मोहंती हे काय चाललय ? तुम्ही सबनिसांवर कारवाई का केली नाही. निदान इन्स्पेक्शन घेऊन त्यांना ताकीद तरी द्यायला हवी होतीत. " त्यावर मोहंती काहीच बोलले नाहीत. मग मला मी " प्रत्येकाची सिक्युरिटी आणि
स्टॉक पडताळून मगच लोन्स दिलेली नाहीत . बँकेला त्यामुळे भविष्यात वसुलीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला. " असे सांगितले. मग मात्र पिंटी भडकले, " अहो , पण सध्या पाच लाखाच्या आतल्या कर्जांना सिक्युरिटीवर जास्त जोर देऊ नये असा सरकारचा आदेश आहे. मग तो आपण धाब्यावर बसवायचा का ? तुम्हाला दिलेल्या परिपत्रकात सगळं विस्तृत दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास करीत नाही का ? "मग मोहंतींकडे वळून ते म्हणाले, " काय हे , काय चाललंय काय तुमच्या राज्यात ? हे असं . " मोहंती पुन्हा काही बोलले नाहीत. ते पाहून पिंटो साहेबांनी बरोबर आणलेल्या स्टाफला ताबडतोब सूचना देऊन मोहंतींनाच मेमो दिला आणि " मला याचं स्पष्टिकरण एका आठवड्याच्यात पाहिजे " अशी तंबीही दिली. मग मिटिंग संपली. मला मोहंतींची दया आली. आपणच आता काहितरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. एकीकडे मुलगी नाहीशी होणं हा ताण त्यांच्या डोक्यावर होता. आमच्या नंतर पिंटो साहेबांसमवेत उद्योजकांची मिटिंग होती. आम्ही कॉंफरन्स हॉलच्या बाहेर आलो. नेमका शितोडीकर भेटला. त्याच्या नजरेत कृद्धपणा भरलेला होता. आता तर त्याला संधी मिळाली. हेच खरं. मी बाहेर आल्या आल्या मोहंतींची माफी मागितली. आणि अजून एक महिना बाकी आहे त्यात मी जेवढा बॅकलॉग भरून काढता येईल तेवढा भरून काढीन असे आश्वासन त्यांना दिले. ते फार काही बोलले नाहीत. पण निघून गेले. माझ्याबद्दलचं इंप्रेशन बिघडलेलं दिसलं. जुडेकरला मी शोधू लागलो. तेव्हा तो श्रिवास्तव बरोबर बोलत असलेला आढळला. श्रीवास्तवला बरे वाटल्याचे दिसत होते. मी जुडेकरला खडसावून विचारले, तेव्हा त्याने श्रीवास्तवलाही वैयक्तिक स्वरूपाचे लोन हवे असल्याबद्दल तो बोलत होता असे म्हणाला. माझा विश्वास बसला नाही. मी नंतर बोलण्याचे ठरवले. आम्ही दोघेही माझ्या घरी आलो. आजच्या दिवस राहून रामनूरला दुसऱ्यादिवशी जाण्याचे ठरवले. त्यावर लीना म्हणाली, " मी दोन दिवस इथेच राहणार आहें, नंतर येईन. " मी मान्य केले. आम्ही मात्र दुसऱ्यादिवशीच निघालो. तो शनिवार होता. थेट बँकेत गेलो. तालुक्याची ब्रांच असल्याने एक प्रकारचा मंदपणा होता शहरामध्ये ब्रांच कशी भरलेली असते. इथेही स्टाफ कामात गर्क होता. पण का कोण जाणे, कामाला वेग नसल्याचे मला जाणवले. मी मग पैं ना आत बोलावले , त्यांना थोडीफार कल्पना दिली. कामाचं गांभिर्य जाणवून तेही विचार करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी घरी गेलो. आता आजपासून लीना आणि मुलं नव्हती. मी ती संधी घेण्याचं ठरवलं. मी जेवढा कामावर असायचो तेवढं वाडा त्यातल्या सगळ्या गोष्टी विसरायचो , पण घरी आलो की पुन्हा तेच विचार येत. आज घरी आल्या आल्या, समोरच्या मोकळ्या जागेत लावलेली झाडं पाहिली. ती बरीचशी मलूल आणि सुकत चालल्या सारखी दिसली. तिथे आता हळूहळू कोरडे गवत तयार होत होते. वाडा परत पूर्वीच्याच स्थितीवर येणार का , असे मला वाटले. पोलिसांचा भरवसा नव्हता. ते केव्हाही येऊन उभे राहत असत. मी चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसलो. अजून थंडी चागलीच जाणवत होती. निदान वाड्याच्या परिसरात तरी. .
अचानक वारा सुटल्याचं मला जाणवलं. ................. वारा इतका सुटला होता की जड दरवाज्यासुद्धा थोडा हलल्यासारख मला भासला.

अंगात स्वेटर आणि खांद्यावर शाल पांघरलेला मी वाड्याच्या आतल्या रुपाकडे पाहू लागलो. रंग दिल्याने
वाडा माणसात आला असला तरी अचानक तो मला आकुंचित वाटू लागला. हे काय होतंय मला कळेना हॉल जास्तच लांबलचक वाटू लागला. हॉलची रुंदी कमी झाली आणि मी एका मोठ्या लांब बोळातील सोफ्यावर बसलो असल्याचं जाणवल. मी घाबरून दरवाज्या गाठला. बाहेर उभा राहून आत पाहू लागलो. तेवढ्यात फकीरबाबांचा आवाज आला. " बेटा तू कहां जायेगा, यहां रहना तेरे लिये ठीक नही है. औरत को लेकर निकल जा. डरना नही. ये उदी लेकर अंदर की तरफ फेक दे. आजके लिये छुटकारा पायेगा." त्यांनी माझ्या हातात तीच उदी दिली. मी त्यांना
उदी नाहीशी झाल्याबद्दल विचारणार होतो , तेवढ्यात ते धावत गेट कडे गेले आणि नदीच्या दिशेने पळत गेले. मी तसाच उदी खिशात टाकून
त्यांच्यामागोमाग धावलो. तेव्हा ते धावता धावता म्हणाले, " मेरा पीछा मत कर. तू पछाताएगा. ...... " असं म्हणून ते पडक्या चर्चच्या मागे दिसेनासे झाले. मला हे नवीन होतं मी स्वतःला चिमटा काढून पाहिले . मी शुद्धिवर होतो. मग मी घरात आलो. मगाचचाच नजारा होता. मी त्यांनी दिलेली उदी फेकली. त्याबरोबर हॉल पूर्ववत झाला. माझा विश्वासच बसेना. हे सगळं फकीरबाबा करीत नव्हते ना ? अशी शंका मला चाटून गेली. आत जावं की नाही मी विचार करीत होतो . परत असं झालं तर माझ्याजवळ आता उदीही नव्हती आणि फकीरबाबा पण आता येणार नव्हते. सात वाजून गेले होते. बाहेरचा वारा थांबण्याची चिन्हे दिसेनात. मी दरवाज्या लावून घेतला. आता मी एकटाच होतो. कधीही देव वगैरे न मानणारा मी आज देवांसमोर दिवा लावीत होतो. मला स्वतःचं आश्चर्य वाटलं. काहीही असो. माणसाबरोबर अनाकलनीय घटना घडू लागल्या की माणूस अशा गोष्टी करतो. कारण लहानपणी झालेले संस्कार त्याला आठवू लागतात. तेव्हाही अशीच भीती वाटलेली असावी .

(क्रमशः)

🎭 Series Post

View all