चिरुमाला (भाग १४)

बॅंकेतलं माझं काम नीट चालूच होतं........

बँकेतलं माझं काम नीट चालूच होतं. माझी कर्ज देण्याची पद्धत इतकं होऊनही मी बदलली नाही. आता मार्च महिना संपला होता. मोहंती साहेबांनी मध्यंतरी एकदा अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यांना
हरकत घेण्यासारखं काहीही सापडलं नाही. सरकारच्या सूचनेप्रमाने मी लहान उद्योजकांना कर्ज दिले होते. त्यामुळे त्याना काही बोलता येईना. अर्थात त्यांनी मोठ्या उद्योजकांचे अर्ज योग्य ती कारवाई न केल्याबद्दल मला मेमो दिला. अर्थात तो अतिशय औपचारिक होता. माझी पद्धत बँकेच्या नियमाप्रमाणे असल्याने त्याचे उत्तर देणे मला शक्य झाले. असो. जाताना मात्र मोहंती साहेब कोणत्या तरी दडपणाखाली असावेत असे मला दिसले. मी विचारल्यावर त्यांनी तसे काही नसल्याचे म्हंटले. मी जास्त विषय न ताणता सोडून दिला. त्यांना काहीतरी वेगळेच अपेक्षित होतं असं दिसलं. माझ्या बद्दल ते ना तक्रार करू शकत होते की माझं समर्थन् करू शकत होते. मग एक दिवस बँकेत मला हरिदास आलेला दिसला. तो जुडेकर बरोबर बोलत बाहेत उभा होता. मला शंका आली काहीतरी काळे व्यवहार त्यांच्यात असलेच पाहिजेत. ते काळे व्यवहार असावेत. मी सध्या फक्त लक्ष ठेवण्याचे ठरवले. आता हे सगळं कोण शोधून काढणार ? वाडा हा माझ्यासाठी स्वतंत्र विषय होता. कोणाची तरी मदत घेतली पाहिजे याची मला जाणीव झाली. पोलिसांना सांगणं कठीण होतं. रितसर तक्रार केल्याशिवाय ते काहिही करणार नाहीत हे मला माहित होतं. मला माझ्या एका मित्राची आठवण झाली. तो एका कंपनीत व्हिजिलन्स खात्यात होता. त्याने नोकरी सोडली होती. आता स्वतंत्र व्यवसाय करीत होता, तो अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देत होता. तसा तो मला खूपच सिनियर होता. त्याची माझी भेट एका बँक प्रकरणात झाली होती. माझ्यापेक्षा मोठा असूनही तो मैत्री टिकवून होता. त्याला फोन केल्यावर तो म्हणाला, " मी येऊन बघीन , आणि किती दिवसात तुझं काम करता येईल पाहिन. " तो येत्या रविवारी येईन म्हणाला . मला थोडं सुटल्यासारखं वाटलं. हरिदास जुडेकरला भेटणं ही बातमी कानविंदेंना द्यावीशी वाटली. सांगितल्यावर ते म्हणाले, " मला त्याच्यावर संशय आहेच. तुम्ही फक्त लक्ष ठेवा. वेळोवेळी तसंच काही घडलं तर कळवत चला. " हल्ली इन्स्पे. माझ्याशी बरे वागत होते.
वाड्यावर अधून मधून रात्रीचे रडण्याचे आवाज येतच राहिले. मी तिकडे लक्ष दिलं नाही. माझ्याजवळ पारलोकेंची डायरी होती . ती वाचायची होती. मी लक्षात ठेवूनही विसरत होतो. शुक्रवारी संध्याकाळी बँकेतून घरी आलो. गाडी पार्क केली आणि दरवाज्या उघडून मी आत शिरत होतो, तेवढ्यात अचानक फकीरबाबा दिसले. ते गेटमधून आत शिरत होते. " अल्ला " असं ते जोरात ओरडले. मी त्यांना मुद्दामच आत बोलावून घेतल.त्यावर ते म्हणाले, " हम किसीके घरमे नही जाते. , तूने मेरी बात मानी नही. अब मै कुछ नही कर सकता. " फकीरबाबांचं वय सत्तर पंच्चात्तर असावं. तरीही मी त्यांना विचारलं , " बाबा आगे क्या हो सकता है. बताईये. " त्यावर हासून ते म्ह्णाले, " हमे वो कहनेकी इजाजत नही है , बेटा. जब वक्त आएगा हम आकर बता देंगे. लेकीन तू हमे मानता नही. " त्यामुळे काही न बोलता ते निघून गेले. आता मला ते कुठे जातात हे पाह्ण्याची इच्छा झाली नाही. अचानक मला बसस्टॉपवर भेटलेले दाढीवाले गृहस्थांची आठवण झाली. जे गूढ शास्त्रात प्रविण होते. मला त्यांचं कार्ड सापडेना. का कोण जाणे पण मला आता त्यांना भेटावंस वाटू लागलं. कार्ड खूप शोधलं. शेवटी नाद सोडला. जेवणाचा डबा जुडेकरच्या बायकोनि तयार केला होता. ते मी गरम केलं आणि प्रथम जेवून घेतलं. आता चित्र वर सरकवणं कठीण होतं. आतली दुनिया शोधायला हवी होती. या तळघर कम भुयार दुसऱ्या बाजूने उघडे होते का ? ते पाहायला हवं होतं. शेजारच्या भागातून सारखे आवाज येत होते. कधी ओरडण्याचा, कधी रडण्याचा तर कधी धावण्याचा. मला त्यांची सवय झाली होती. मी स्वैपाकघरात गेलो, तिथली खिडकी मी थोडी उघडी
ठेवित असे. माझी नजर आज तिकडे गेली. विहिरीवर कोणी तरी काही तरी वाकून पाहत होते. माझा श्वास वर खाली झाला. रात्रीचे जेमतेम नऊ वाजत होते. मी पटकन हातात टॉर्च आणि काठी घेतली. आणि धावतच मागच्या बाजूला आलो. तर तिथे डोकावणाऱ्या माणसाने विहिरीत उडी मारल्याचं मला दिसलं. मी विहिरी कडे धावलो. टॉर्च मारून विहिरीत पाहिले . तिथे कोणीच नव्हतं. विहिरीजवळ जाऊन मी टॉर्च मारला. आत काहीही दिसलं नाही , की विहिरीचं पाण्यावर जराही तरंग उमटलेले दिसले नाहीत. थोडावेळ थांबून मी घराकडे परतलो.
आता साडेदहा होऊन गेले. मी सोफ्यावर स्वस्थ बसलो. एकूण सगळाच विचार परत करायला हवा होता.
मी पहिल्या पासून पाहिलं. सगळ्या घटनांमध्ये मला काही रिकाम्या जागा दिसल्या. जुडेकर, गोळे, मोहंती , पारलोके, पाठक आणि मुख्य म्हणजे हरिदास. यांचं काहीतरी कनेक्शन आहे असं वाटू लागलं. मला तर आता मी एका विशिष्ट कटात अडकवला गेलोय की काय अशी शंका येऊ लागली. म्हणजे माझ्या ट्रान्स्फर पासून ते आजतागायत. हा कोणता कट चालू आहे ? कर्जांचा की वाड्याच्या मालकीचा ? की कर्ज मंजूर करून घेण्यात येणाऱ्या अनैतिक व्यवहारांचा . आमच्या मुंबई बँकेतलेही काही लोक यात गुंतलेले असण्याची शक्यता होती. अचानक मला शशीला भेटावंस वाटलं. त्याला नक्कीच काहीतरी माहित असावं. त्याला आलेले अनुभव जर मला त्यानि मला सांगितले तर शोधाशोध करायला मदत होईल. मी शशीचा पत्ता मिळवण्याचे ठर्वलं. मी टॉर्च आणि काठी जवळ घेऊनच झोपण्याचं ठरवलं. पुढच्या काही दिवसांमध्येभुयार वजा तळघराला दुसरिकडून तोंड आहे का ते शोधावं लागणार होतं. कदाचित वाड्याचा नकाशाही सापडेल. नकाशा हा नवीन विचार होता. मला जरा बरं वाटलं. त्या विचारांच्या गर्दीत मला झोप लागली. दिवा तसाच राहिला होता.


मला गाढ झोप लागली. केव्हातरी साडेतीनच्या आसपास मला जाग आली. ती बाथरूमला जाण्याच्या जाणिवेने आणि तहानेने. उठल्यावर लाइट चालू राहिलेला दिसला. मी तो प्रथम बंद केला. पाणी वगैरे पिऊन मी पुन्हा झोपलो. थोड्याच वेळात मला पुन्हा झोप लागली. मध्येच केव्हातरी रडण्याचा सूर ऐकू आला. मी खडबडून जागा झालो. फक्त पावणेचार वाजले होते. म्हणजे पंधरा मिनिटेच झोप लागली होती. बाजूला ठेवलेली काठी आणि टॉर्च घेऊन मी जिन्यावरून फिरवला. रडण्याचा आवाज येत असला तरी मुलगी आज दिसत नव्हती. जिन्याला लागून वरच्या मजल्यावरच्या कठड्याला धरून एक म्हातारी स्त्री उभी राहून खाली वाकून पाहत होती. जिचे केस पांढरे स्वच्छ आणि पिंजारलेले दिसत होते. तिचाचेहरा पांढरट होता.तिचे डोळे शून्यात पाहत होते. तरीही ती माझ्याकडे पाहत असल्यासारखीवाटली . अंगावर कानडी बायका त्या धर्तीचेकाळसर लुगडे होते. तोंड अर्धवट उघडे होते. आत दात दिसत नव्हते. हळू हळू तिची आकृती विरळ होत होत नाहीशी झाली. आता रडण्याचाही सूर थांबला होता. ही बाई आणि ती मुलगी यांचा काहीतरी संबंध असलाच पाहिजे. पारलोकेंनी सांगितलेली हिच ती आजी होती का ? मी डायरी वाचली नव्हती म्हणून मला कळत नसावं. असो. माझी झोप आता पार उडाली होती. साडेचार पावणेपाचलाच उठून मी चहा केला. तो घेतल्यावर जरा बरं वाटलं. उठण्याची वेळ नसल्याने मी पारलोकेंनी दिलेली डायरी काढली. ती अर्धवट पेन्सिलमध्ये अर्धवट शाईमध्ये लिहिली होती. काही काही अक्षरं फार फिकट तर काही अतिशय गडद होती. सुरुवातीची काही पानं फाडलेली दिसली. असो. पहिल्याच पानावर मला वाड्याच्या तळघर वजा भुयाराचा नकाशा सापडला. मला आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. कारण तो पेन्सिलमध्ये काढलेला होता. चित्राच्या दरवाज्यापासून ते चर्चपर्यंतचा तो नकाशा असावा. वेगवेगळ्या खाणाखुणांनी भरलेला नकाशाचा फारसा अर्थबोध होत नव्हता . मी तो दिवसा उजेडी पाहण्याचं व माझ्या मित्राला दाखवण्याचं ठरवलं. पुढचे पान उलटले . पुन्हा नकाशाचहोता. अशी पहिली तीन चार पानं नकाशा होता. मग लिखाण होतं. त्यात तारीख होती. फाल्गुन १४, शके १८५२"आजच्या दिवसी , ताईसाहेबांशी ज्वर होता. त्याकारणे, कलेक्टर साहेब दोन प्रहरी वाड्यात परतले. सोबत डाक्तर होता., ते समई ओखद देऊनही ज्वर वाढत गेला. डाक्तराने ओखद दुसरे दिले. परंतु फरक पडला नाही. रात्रीच्या प्रहरी ताईसाहेबांना वायू झाल्याने त्या सारख्या, "चिरू " नावाचा घोष करीत होत्या. कलेक्टार साहेबांच्या आत्याबाई त्यांच्या अंगावर फिस्कारित होत्या. आणि चिरू येईल असे खोटे बोलत होत्या. चिरू कोठे होती हे मात्र त्या सांगत नव्हत्या. ........ " पुढचं लिखाण पेन्सिलमध्ये असल्याने नीट दिसत नव्हतं. पण तळघराबाबत
काहीतरी लिहिलेले दिसत होते. माझे डोळ्यांना पेन्सिलचे लिखाण कळेना मी वाचणे सोडून दिले. उद्या पाहू असे ठरवून मी डायरी नीट ठेवून दिली. ती हरवून चालणार नव्हती. मी ती बँकेच्या माझ्या लॉकरमध्ये नेऊन ठेवण्याचे ठरवले. मग मात्र मी झोपलो. सकाळी साडे आठला उठलो.

   

आज मी डायरी घेऊन बँकेत गेलो. ती माझ्या लॉकरमध्ये नीट ठेवली. मी कोणी पाहत नाही याची काळजी घेतली. दुपारपर्यंत काहीच घडलं नाही. अचानक तीन वाजता माझ्या केबिनचा दरवाजा वाजला . मी येस कम इन म्हणण्याच्या आतच हरिदास दार लोटून आत आला. मला जरा धक्का बसला. याचं काय काम आहे कळेना. मला त्याचं न विचारता आत येणं आवडलं नव्हतं. मी त्याला तसाच उभा ठेवला. ते पाहून तो म्हणाला, " काय साहेब बसायला बी देनार नाही का ? " मी मनात नसताना त्याला बसायला सांगितलं. त्याने मग मला तो लोन एजंट असल्याचं सांगितलं. शेवटी म्हणाला," साहेब आजपर्यंत माझ्या सगळ्याच गिऱ्हाईकाना लोन मिळालं . तुम्ही आलात आणि वेगवेगळे फाटे फोडत राहिलात. साहेब नक्की तुम्हाला किती टक्के पायज्येत ते तरी सांगा बाकीच्यांची टक्केवारी मला पाठ आहे. अगदी पिंटो साहेब ते मोहंती साहेब सुद्धा. मोकळे पणानि बोला साहेब. मला काही अडचण नाही . गिऱ्हाईक ते पैसे देतं. " त्याने हवेत प्रश्न सोडला.

माझा राग नुसता उसळत होता. मी स्वतःवर ताबा मिळवित म्हंटलं. " हरिदास , निघा तुम्ही. तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलात . " मी दुसरी फाइल पुढे ओढली आणि त्याला जाण्याचं सुचवलं. मग काही वेळ तो नुसता खुर्चित बसून राहिला. बहुतेक शब्दांची जुळवाजुळव करित असावा. मग उठत तो म्हणाला, " साहेब नीट विचार करा. नाहीतर ............काय होई*ल ते मी सांगू शकत नाही. " ............ आता माझ्या सहनशक्तीची परिसीमा झाली होती. मी त्याला दरवाज्याकडे बोट दाखवून म्हणालो. " दरवाज्या तिक्डे आहे. ........ " तो निघाला पण जाण्यापूर्वी म्हणाला, " साहेब गोळेची बायको कशी वाटते ............????? " आणि बाहेर पडला. इतका सगळा तपशील त्याला कसा कळतो. समजेना. मग पुन्हा आत येत तो खिशातून एक पाकीत काढीत म्हणाला, " साहेब तळघराचा नकाशा आहे हा . लागेल तुम्हाला. ठेवून घ्या. ...."
मला धक्क्यावर धक्के बसत होते. तो गेला. मी बराच वेळ त्या पाकिटाला हात लावला नाही. का कोण जाणे मला असं वाटलं की
हरिदास जुडेकरला भेटला असणार. शंका नको म्हणून मी जागेवरून उठून बाहेर आलो. पै दचकून जागेवर बसत असलेले दिसले. आणि बाहेरच्या काचेच्या दरवाज्या मागे मला जुडेकर हरिदासशी बोलत असल्याचे जाणवले. मी फटकन दार उघडले. हरिदास जुडेकरच्या हातात नोटा कोंबत असताना दिसले. मी पुढे होऊन जुडेकरच्या हातातल्या नोटा हिसकावून घेतल्या आणि म्हंटले, " अच्छा म्हणजे हे असं आहे तर.आज मी डायरी घेऊन बँकेत गेलो. ती माझ्या लॉकरमध्ये नीट ठेवली. मी कोणी पाहत नाही याची काळजी घेतली. दुपारपर्यंत काहीच घडलं नाही. अचानक तीन वाजता माझ्या केबिनचा दरवाजा वाजला . मी येस कम इन म्हणण्याच्या आतच हरिदास दार लोटून आत आला. मला जरा धक्का बसला. याचं काय काम आहे कळेना. मला त्याचं न विचारता आत येणं आवडलं नव्हतं. मी त्याला तसाच उभा ठेवला. ते पाहून तो म्हणाला, " काय साहेब बसायला बी देनार नाही का ? " मी मनात नसताना त्याला बसायला सांगितलं. त्याने मग मला तो लोन एजंट असल्याचं सांगितलं. शेवटी म्हणाला," साहेब आजपर्यंत माझ्या सगळ्याच गिऱ्हाईकाना लोन मिळालं . तुम्ही आलात आणि वेगवेगळे फाटे फोडत राहिलात. साहेब नक्की तुम्हाला किती टक्के पायज्येत ते तरी सांगा बाकीच्यांची टक्केवारी मला पाठ आहे. अगदी पिंटो साहेब ते मोहंती साहेब सुद्धा. मोकळे पणानि बोला साहेब. मला काही अडचण नाही . गिऱ्हाईक ते पैसे देतं. " त्याने हवेत प्रश्न सोडला.
माझा राग नुसता उसळत होता. मी स्वतःवर ताबा मिळवित म्हंटलं. " हरिदास , निघा तुम्ही. तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलात . " मी दुसरी फाइल पुढे ओढली आणि त्याला जाण्याचं सुचवलं. मग काही वेळ तो नुसता खुर्चित बसून राहिला. बहुतेक शब्दांची जुळवाजुळव करित असावा. मग उठत तो म्हणाला, " साहेब नीट विचार करा. नाहीतर ............काय होई*ल ते मी सांगू शकत नाही. " ............ आता माझ्या सहनशक्तीची परिसीमा झाली होती. मी त्याला दरवाज्याकडे बोट दाखवून म्हणालो. " दरवाज्या तिक्डे आहे. ........ " तो निघाला पण जाण्यापूर्वी म्हणाला, " साहेब गोळेची बायको कशी वाटते ............????? " आणि बाहेर पडला. इतका सगळा तपशील त्याला कसा कळतो. समजेना. मग पुन्हा आत येत तो खिशातून एक पाकीत काढीत म्हणाला, " साहेब तळघराचा नकाशा आहे हा . लागेल तुम्हाला. ठेवून घ्या. ...."
मला धक्क्यावर धक्के बसत होते. तो गेला. मी बराच वेळ त्या पाकिटाला हात लावला नाही. का कोण जाणे मला असं वाटलं की
हरिदास जुडेकरला भेटला असणार. शंका नको म्हणून मी जागेवरून उठून बाहेर आलो. पै दचकून जागेवर बसत असलेले दिसले. आणि बाहेरच्या काचेच्या दरवाज्या मागे मला जुडेकर हरिदासशी बोलत असल्याचे जाणवले. मी फटकन दार उघडले. हरिदास जुडेकरच्या हातात नोटा कोंबत असताना दिसले. मी पुढे होऊन जुडेकरच्या हातातल्या नोटा हिसकावून घेतल्या आणि म्हंटले, " अच्छा म्हणजे हे असं आहे तर.

हप्ता देण्याचं काम करताय का ? " दोघांचेही चेहरे गोरेमोरे झाले. तरीही निर्लज्जपणे हरिदास म्हणाला, " सर, हे पैसे मी जुडेकर कडून मागे

घेतले होते तेच परत करतोय. आणि आम्हाला जर तसं काही करायचंच असेल तर आम्ही काय तुम्हाला विचारणार आहोत ? " जास्त मध्ये मध्ये करू नका पारलोकेंची अवस्था काय झाली हे लक्षात घ्या. " मी काही न बोलता आत शिरलो. पै कपाळावरच घाम पुसत असताना दिसले. मी जागेवर बसलो. इथले बहुतेक सगळेच या हरिदासला सामिल असल्याचा मला संशय येऊ लागला. मी फाईल पुढे ओढणार तेवढ्यात एक उंच
जाडसर पोलिस खात्यातल्या माणसासारखा माणूस आत आला आंणी " मे आय कम इन" म्हणून त्याने विचारले. तो माझा मित्र श्रीकांत प्रभुदेसाई होता. अर्ध टक्कल पडलेला , बारिक बारिक डोळे असलेला आणि फुटबॉलसारखा चेहरा असलेला श्रीकांत चांगलाच इंप्रेसिव्ह दिसत होता. मी सुद्धा त्याला सात आठ वर्षांनी पाहत होतो. त्याने हस्तांदोलन केले आणि तो बसला. मी त्याल प्रथम कॉफी मागवली. आत्ताच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर त्याचं येणं न्हणजे थंडगार वाऱ्याची झुळुक येण्यासारखं होतं. मी त्याला आत्ताचा प्रसंग सांगितला. त्यावर त्यो म्हणाला,
" मला तू तुझे संशय आणि इथली परिस्थिती ब्रिफ करून लिहूनच दे. म्हणजे मी अभ्यास करून ठरवीन माझी लाईन ऑफ ऍक्शन काय आहे ते.” ते ऐकल्यावर मी त्याला माझ्याबरोबर घरी चलण्याचा आग्रह केला. नाहीतरी ह्या आडगावात तो कुठे राहणार होता ? तो ही तयार झाला. साडेपाच सहाच्या सुमारास आम्ही निघालो. घरी पोहोचल्यावर वाड्याचे निरिक्षण करीत तो म्हणाला, " एवढ्या मोठ्या वाड्यात तू एकटा म्हणजे कठीण आहे. वहिनी सोडून गेल्या यात काही आश्चर्य नाही. " मला त्याचं हे बोलणं फारसं आवडलं नाही. तो वाड्यातल्या प्रत्येक खोलीत फिरत होता. आणि लांबलचक उसासे सोडित होता. ते पाहून मी त्याला म्हंटलं. " मला तरी बदल्यांमध्ये आव्हानं घेण्याची आणि ती पुरी करण्याची आवड आहे. " हे बघ आज तरी निदान जेवणाचा डबा आहे. उद्याचं उद्या बघू. तो फ्रेश होऊन सोफ्यावर बसला. मी चहा केला .
चहा घेता घेता तो म्हणाला, " आपल्याला बराच तपशील लागेल. " मी त्याला सरदार साहेबांचं चित्र आणि तळघराबद्दलही सांगितलं. जेवणं वगैरे झाल्यावर मी आज बरेच दिवसांनी वेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलो. त्याची नजर बेडरूमवरून फिरत होती. तो आणखी काही बोलेल असं मला वाटलं पण त्यानी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. लाईट बंद करून आम्ही अंथरूणावर पडलो. थोडावेळ असाच गेला. मग तो म्हणाला, " विकास , मी अश्या जुन्या जागा खूप पाहिल्येत. माझा थोडाफार अभ्यासही आहे. इथल्याही काही गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्यास तरी हरकत नाही. " मग मी त्याला अथ पासून इतिपर्यंत सांगितलं. ते ऐकून तो म्हणाला. " मला वाटतं मी इथे पंधरा विस दिवस राहावं. " मी अर्थातच त्याला होकार दिला. मला पण कोणीतरी बरोबर राहावं असं वाटत होतं.

त्या रात्री काही खास घडलं नाही. आवाज नेहमी प्रमाणे येत राहिले. श्रीकांत अधून मधून जागा होत असे आणि आवाजाची दिशा पाहून बेडरूम बाहेर जात असे. त्याला आवाज नवीन होते. मी मात्र निर्धास्तपणे बरेच दिवसांनी झोपलो होतो. सकाळ झाली . आम्ही दोघांनी चहा घेतला. आज शुक्रवार बँकेत जायचं होतं. मी श्रीकांतला म्हंटलं, " तू काय करणार आहेस ? तुला एकटं वाटू शकतं. " त्यावर तो म्हणाला ," मी पण तुझ्या ऑफिसमध्ये येईन . प्रथम मी माझा बँक अकौंट उघडीन म्हणजे संशयाला जागा नको. .......... मी पाहिजे तर जरा उशिरा निघेन. " असं म्ह्णून तो अंघोळीला गेला. आमची इतर आन्हिकं उरकेपर्यंत जुडेकर येईल असं वाटलं होतं. पण आज तो आला नाही. त्याच्या बायकोची पण येण्याची शाश्वती वाटत नव्हती. तिच्याबद्दल मी श्रीकांतला सांगितलं. तो म्हणाला त्याच्या वेळेत ती येईल तर ठिक आहे नाहीतर तिला पुन्हा यावं लागेल. मला खरंतर जुडेकरच्या बायकोला ठेवायची इच्छा नव्हती. ती जुडेकरला बातम्या पुरवीत असणार असं मला वाटलं. असो. मी ऑफिसला गेलो. श्रीकांत घरी एकटा होता. मी गेल्यावर श्रीकांतनि सगळा वाडा पिंजून काढला. वाड्यामध्ये दिवसा चांगलं ऊन पडत होतं. त्यानी सरदार साहेबांचं चित्र परत वर सरकवता येईल का ते पाहिलं. त्याला फ्रेमच्या बाजूला कसलासा खटका दिसला. त्याची उंची चांगली असल्याने त्याचा हात तिथे पोहोचत होता. त्याने तो वर सरकवला. आणि खडर्रर्रर्र....ऽ ..ऽ असा आवाज करी चित्र वर सरकले. त्याला आतल्या पायऱ्यांची कल्पना नसल्याने तो आत शिरला नाही. दिवस असल्याने नीट दिसत होतं. मग त्याला एकदा हे कळल्यावर त्याने तोच खटका खाली खेचला. आणि सरदार साहेब प रतकोनाड्यावर विराजमान झाले. असो. तो असे पर्यंत जुडेकरची बायको आली नाही. तो ऑफिसला आला त्याचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्याने स्टाफशी मैत्री केली. स्टाफनेही त्याला खातं उघडायला मदत केली. त्याने त्याला मिळणाऱ्या कर्जाची सुद्धा माहिती करून घेतली. ....... त्त्या दिवशी जुडेकर कामावर आला. त्याला दोन तीन दिवसांची रजा पाहिजे होती. कारण विचारल्यावर म्हणाला," सर मुंबईला माझी मेव्हणी राहाते तिच्याकडे एक फंक्शन आहे त्यासाठी जायचंय. ....." बोलता बोलता त्याने माझ्या प्रतिक्रियेसाठी पाहीलं. तेवढ्यात त्याचा हात नाकाच्या शेंड्याकडे गेला. मी ओळखलं की तो खोटं बोलतोय. माणसाचा हात बोलता बोलता जर नाकाच्या शेंड्याकडे गेला तर तो चक्क खोटं बोलतोय समजावं असा एक शरीरबोली शास्त्राचा नियम मला आठवला. मी त्याची रजा मंजूर केली. तो गेला , मी त्याचा अर्ज श्रीकांतला दाखवला. त्यावर श्रीकांत म्हणाला," मला वाटतं त्याच्या मागोमाग मी मुंबईला जावं म्हणजे छडा लागेल. " मी जुडेकरला परत बोलावलं. त्याला विचारल्यावर म्हणाला, " सर मी उद्या सकाळच्या आठच्या एस.टीनी जाणार आहे. " त्याला मी कोणत्याही प्रकारे त्याची बायको का येत नाही, किंवा तो घरी का आला नाही असं विचारलं नाही. त्याचं प्रेशार वाढवायचं मी ठरवलं. श्रीकांतला सांगितल्यावर त्याने जुडेकरवर लक्ष ठेवण्याचं ठरवलं. त्यासाठी तो जुडेकर घरी निघाल्याबरोबर निघाला. पुढचं मला माहित नाही. ते तो आल्यावर समजेलच. म्हणजे मी घरी एकटाच असणार होतो. असो. घरी गेलो. संध्याकाळच्या संधिप्रकाशात मला घराच्या पायरीवर कोणीतरी बसलेले असल्याचे दिसले. गाडी गेटजवळ सोडून मी मुख्य दरवाज्याकडे गेलो. पाठमोरी असलेली ती व्यक्ती म्हणजे गोळेची बायको होती. तिच्या अंगावर परत लाल साडी दिसली. तिच्या जवळ एकच साडी असावी किंवा तिला ती अतिशय आवडत असावी. अत्यंत पारदर्शक असा ब्लाऊज तिने घातला होता. आत ब्रा नसावी. आतलं गोर गोरं मांसल अंग दिसत होतं. ती गोड हसली. माझ्या भुवया आक्रसल्या होत्या. ते पाहून ती म्हणाली. ," हल्ली वहिनी घरी नाहीत , म्हणजे तुमची आबाळ होत असणार हे आलंय लक्षात माझ्या म्ह्णूनच मी कामासाठी आले. ........" असं म्हणून ती माझ्या मागोमाग घरात शिरली. तिच्या अंगाचा वास मला तापवत होता. काळोख पडत होता. घरातले दिवे मी लावले . ती आकर्षक हसत , पार्श्वभाग हालवित स्वैपाकघरात गेली .तिने दहा पंधरा मिनिटात चहा करून आणला. मला दिला आणि स्वतः करता घेतला. आम्ही दोघे सोफ्यावर बसून चहा पीत होतो. माझी नजर तिच्या लालबुंद ओठांकडे जातहोती. तिच्या येण्याचा हेतू काय असावा हे सुद्धा मला जाणवू घ्यावेसे वाटले नाही पुढच्या तासाभरात तिनी स्वैपाक केला . ती स्वैपाकात निष्णातहोती. अतिशय चविष्ट जेवण तिनी केलं होतं. बरेच दिवसात मी असे जेवलो नसल्याने भरपूर जेवलो. माझ्या मनात ना श्रीकांतचा , ना लीनाचा, ना गोळेचा, कसलाच विचार आला नाही. मी इतका भारलो होतो. की कधी बेडरूममध्ये तिच्या बरोबर जातो असं मला वाटू लागलं.

तिने ते ओळखलं असावं. लवकरच मी बेडरूममध्ये झोपण्याची तयार केली. ती आत आली. मी खिडकीशी पाठमोरा असल्याने मला दिसली नाही मागच्या बाजूने येत तिने माझ्याभोवती विळखा घातला. तिचे गरम श्वास माझ्या मानेभोवती फिरत राहिले. मागे वळून मी तिला आवेगाने मिठीत घेतली. तिचा चेहरा खरोखरीच सुंदर होता. पांढरा स्वच्छ चेहरा लालबुंद ओठ मी माझ्या ओठांमध्ये पकडून चुंबनांचा वर्षाव केला. इतके लाल मादक ओठ मला कधीच मिळाले नव्हते. आता आम्ही दोघेही अर्ध नग्न अवस्थेत बेडवर पडून होतो. पुढचे सगळे प्रकार आम्ही सुरू केले. भान राहिले नाही. तिने नक्की काय केलं मला कळलं नाही पण ती माझा गाल चाटत होती. मला रक्ताचा वास आला म्हणून मी तिला बाजूला सारून पाहिले . ती हासत होती आणि पुन्हा पुन्हा माझ्या गालाजवळ चाटण्यासाठी धडपडत होती. मला किळस आली. मी सहज म्हणून माझ्या गालावर हात फिरवून पाहिलं . हाताला चिकट चिकट रक्त लागलं. तिने माझ्या गालाचा चावा घेतला होता.
ती ब्लड सकर होती की काय कोण जाणे असा विचार मनात आल्याबरोबर मी तिला दूर ढकलली. ती पुन्हापुन्हा माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करीत होती. कशीतरी मी आता तिला दरवाज्याजवळ नेऊन बाहेर ढकलून दिली . ती तिथे वेडीवाकडी पडली. त्याबरोबर मी दरवाज्या शिताफीने आतून लावून घेतला. बाहेरून ती ओरडत होती, " साहेब दार उघडा मला तहान लागल्ये.

.... " मग तिने मला वाटेल तशा शिव्या द्यायला सुरुवात केली. पण मी दरवाज्या उघडला नाही . रात्रीचा एक वाजून गेला होता. ती दरवाज्यावर धडका मारीत होती. अचानक मला गोळेच्या गालावरच्या जखमा आठवल्या. ही त्याची लग्नाची बायको होती, का वश केलेली एखादी हडळ होती कळेना. अशाच जखमा मी हरीदासच्या गालावरही पाहिल्या होत्या. गोळे आणि पाठक गुरुजी काहीतरी जारण मारण आणि चेटुक विद्या करीत असणार याची मला खात्री वाटू लागली. काही वेळातच मला मुख्य दरवाज्याचा अडसर उघडल्याचा आवाज ऐकू आला. मी पटकन बेडरूमचे दार उघडले ........... पाहतो तर काय गोळेची बायको वेगाने दरवाज्या बाहेर जाताना दिसली. एवढी अंगापिंडाने जाडजूड बाई , पण तिच्या हालचाली चपळ होत्या.

मी तिच्या मागे धावलो. पण ती गेटजवळ जाऊन गेट उघडायचा प्रयत्न करताना दिसली. मी तिथे पोचायच्या आत ती गेट उघडून पळत जाताना दिसली. ती विचित्र वेगाने धावत होती. ती जिवंत भुताटकी होती असंच मला वाटलं. मी धापा टाकीत घरात आलो. माझ्या गालावरची जखं आता वाळत होती.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all