चिंतामणी भाग ६ अंतिम

चिंतामणी

                                             "राजा ! नीट विचार कर, म्हणजे ध्यानात येईल की , खऱ्या चिंतामणीची किंमत मलाही नाही किंवा तुलाही नाही. परमेश्वराने अत्यंत चातुर्य वापरून तुला हा सुंदर देह दिला आहे. खरोखर मानव देह हाच चिंतामणी आहे. गेल्या जन्मात प्रभूचा तू लाडका असल्यामुळे तुला त्याने अत्यंत विलोभनीय असे वैभव दिले आहे. सत्ताही दिली आहे.                                                                                                 या सृष्टीत आल्यानंतर माझे काम करील, लोकाचे जीवन पुष्ट करील, स्वास्थ व समाधान निर्माण करील, ईश्वरविमुखांना ईश्वर-सन्मुख करील. परंतु राजा, तू स्वतःलाच विचारून पहा की, यातले तू काही तरी केले आहेस का ? "....                                                                                                   " शेठजी ! तुम्हीही जरा विचार करा.तुम्ही लहानाचे मोठे  झालात, पुष्कळ द्रव्य मिळवलेत, लग्न झाले, संसार सुखी झाला, मुलेबाळे झाली , चैनीत दिवस चालले आहेत. अशा प्रकारचे कुत्र्याचे जीवन असते. मग तुमच्यासारख्याना जीवनात वैशिष्ट ते काय ? पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे हे सारे तुम्हाला प्राप्त झाले आहे ;पण या जन्मात काय केलेत ? "....                                                                                                 " मानव देहाचे भांडवल घेऊन या जगात आलात. हा चिंतामणी भगवंताने तुम्हाला दिला. पण त्याचा काय उपयोग केलात ?....." " तुम्ही अशा प्रकारचा हा चिंतामणी खर्च करून मला उपदेश करायला प्रवृत्त झाला आहात ? ".                                                               राजा सुज्ञ होता. त्याला स्वतःचा दोष समजला. त्याने श्रीकरची क्षमा मागितली .त्याला प्रणाम केला. शेठजीनीही राजाचे अनुकरण केले ." आजपासून मी हा देह सार्थ करीन .माझे वैभव मी प्रभूकार्यासाठी खर्च करीन.शेठजी ! हा तुमचा चिंतामणी परत घ्या. मला याची जरूर नाही. " राजाने शेठजीना आपला निर्णय सांगितला." महाराज ! हा मणी तुमच्याजवळ राहू द्या .प्रभुकार्यात हा मदतरूप होईल.                                                                                               ज्यावेळी पैशाची गरज भासेल त्यावेळी याचा उपयोग करा. या सुवर्णामुळे मानव देह सुवर्णमय होईल. आपण असा समाज निर्माण करा की, ज्यावेळी लोकांच्या जीवनात कलहाऐवजी आत्मीयता येईल, दुःखाऐवजी सुखाला व आनंदाला भरती येईल. बुभुक्षितता व लाचारी यांच्या जागी संयम, शांती व तेजस्विता येईल.                                                                 राजा ! दीन, लाचार , दुःखी झालेल्या लोकात अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या या कार्यात प्रभू मदत करो ! "शेठजीनी आपले मनोगत व्यक्त केले. थोड्याच काळात चंद्रसेनाने आपल्या प्रजेला तेजस्वी व सुखी केले. कर्तव्यनिष्ठ व सुसंस्कृत केले. परंतु शेजारी असलेल्या मत्सरी राजांना चंद्रसेनाचा हा उत्कर्ष सहन झाला नाही .त्यांना वाटले : राजा चंद्रसेनाची प्रजा एकाएकी सुखी कशी झाली ? याच्या राज्यात काहलाचे बीज ही नाही. सर्व लोक सुखी व आनंदी दिसत आहेत . अलौकीक जीवन जगत आहेत.  हेरांनी सांगितले :" राजाला एका गवळ्यापासुन चिंतामणी नावाच्या मण्याची प्राप्ती झाली आहे. त्यामुळे त्याचे वैभव वाढले आहे ." अनादी काळापासून माणसाला दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. मानवी जीवनातील ही एक विकृती आहे . स्वतः श्रीमंत व्हावे व दुसऱ्याने गरीब असावे असे प्रत्येकाला वाटते.                                                                           चंद्रसेन राजाचा हा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे शेजारच्या राजांनी त्याच्यावर चढाई केली. श्रीकरने चंद्रसेनाच्या प्रजेची संपूर्ण तयारी केली. मानवी जीवनाचे साफल्य कशात आहे हे समजावून दिले. ऋषी व संत याच्यासाठी लोकांच्या मनात आदरभाव निर्माण केला . लोकाचा ईश्ववरील विश्वास दृढ केला . भगवंत कार्य करण्याची प्रेरणा लोकात उत्पन्न केली.                                                                                               लढाईत दुसरे राजे पराभूत झाले .ते पकडलेही गेले .त्या सर्वांना श्रीकर समोर उभे करण्यात आले. श्रीकरचे दिव्य तेज पाहताच सर्व नतमस्तक झाले. ते म्हणाले:.    " चंद्रसेन राजाने आम्हा सर्वांना गुलाम केले आहे. कृपा करून आम्हाला मुक्त करा." श्रीकर म्हणाला: " तुम्हाला चंद्रसेनाने गुलाम नाही केले. आपल्या भोगविलासानेच तुम्हाला गुलाम बनवले आहे. आजपर्यंत कधी विचार तरी केला होतात का; की , हा मानवी देह आपल्याला कशासाठी मिळाला आहे ? तुम्ही चंद्रसेनाचा चिंतामणी पळवून नेण्याकरिता आला होतात ना ? याचे हे फळ तुम्हाला भोगावे लागत आहे.                                                                                          तुम्ही सर्वांनी संगनमत करून त्याच्यावर चढाई केलीत पण यश आले नाही. चंद्रसेनाला भगवंताची मदत असल्यामुळे तुमच्यापैकी कोणीही त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्हाला हा मानव देहरूपी चिंतामणी मिळाला आहे. त्याच्याकडे कधी ध्यान दिलेत का ? तुम्ही चंद्रसेनाप्रमाने आपल्या प्रजेला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला का ? प्रभुकार्यासाठी कधी द्रव्याचा उपयोग केला का ? " सर्व राजांना आपली चूक कळून आली व त्यांनी श्रीकर ची माफी मागितली.                                                                                    श्रीकर त्यांना म्हणाला :" अशी शपथ घ्या की, ईश्वराने दिलेल्या या मानव देहरुपी चिंतामणीचा योग्य उपयोग करू प्रजेत ईश्वरी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करू ऋषी मुनींनी जी वैदिक संस्कृती उभी केली तिच्या विषयी प्रजेत आदरभाव निर्माण करू. इतक्या गोष्टी करणार असाल तरच मुक्त व्हाल." श्रीकरचा आदेश सर्व राजांनी मानाला. प्रत्येक राजाने आपल्या प्रजेला दैवी केले. पुढे श्रीकरने प्रत्येक राज्यात फिरून राजाने काय करावे ते समजावून दिले . जीवनाकडे पाहण्याची भव्य दृष्टी समजवली. भगवंताने दिलेल्या मानव देहरुपी चिंतामणीचा योग्य उपयोग करून जग सुधारण्याचा  प्रयत्न केला व आपले जीवन सार्थ केले.                                                                             कथा आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा. काही चुकले असेल तर तसदीबद्दल. क्षमस्व!                                 संदर्भ:- श्राध्द वाड्डमय (स्वाध्याय परिवार)

🎭 Series Post

View all