Feb 06, 2023
पुरुषवादी

चिंतामणी भाग ४

Read Later
चिंतामणी भाग ४

                                                           आपल्या पतीराजाचा स्वभाव कसा आहे हे तिला पूर्णपणे माहीत होते. हा तरुण मनुष्य जर आत गेला तर उलटे सुलटे बोलतील . त्यापेक्षा याला जे हवे असेल ते आपणच द्यावे. पत्नीने विचारले: " आपल्याला काय हवे ? मला सांगा म्हणजे मी आपली इच्छा पूर्ण करीन " " मला काहीही नको. मला फक्त त्या महान वैभवशाली, भाग्यशाली पुरुषाचे दर्शन घ्यायचे आहे. " श्रीकर आत गेला.                                                                                             खुशामत करणाऱ्या लोकांनी मणीभद्र वेढला गेला होता. मणीभद्राने त्याला पाहिले व विचारले: " आपण कोण ?  इथे कशासाठी आलात ? " श्रीकरने शांतपणे उत्तर दिले:" मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो आहे .मला मोठी उत्सुकता आहे की, आपण केवढे तप केले असेल ! ज्यामुळे प्रभूने आपल्याला एवढे भव्य वैभव दिले !"                                                                     "शुचीना श्रीमंतां गेहे योगभ्रषटो$भिजायते|.                                                                                 परंतु शेठजी ! ज्या भगवंताने एवढी संपत्ति दिली त्याचे कधी स्मरण करता काय ? कधी प्रभूच्या विचाराचे चिंतन करता काय ? पंधरवड्यातून एक दिवस तरी त्याचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करता काय !" " मूर्खा ! आमच्या शेठजीना वेळच कुठे आहे ? भगवंताचे नाव घ्यायला रिकामपण मिळाले पाहिजे ना ? " एका खुशामत करणाऱ्या व्यक्तीने जबाब दिला. " या बिचाऱ्या शेठजीना या देशात आपल्या किती पेढ्या आहेत हे सुध्दा माहीत नाही. त्या सर्व पेढ्याचा कारभार किंवा व्यवस्था पहायची की ' भगवान ' ' भगवान ' करीत तुमच्यासारखे लंगोटी लावुन फिरायचे ? " दुसऱ्याने टोमणा मारला " तुझे नाव श्रीकर आहे का ? " " होय "  " तुला काय हवे ते सांग . पैसा हवा असेल तर शेदोनशे रुपये  घेऊन आल्या वाटेने जा. विनाकारण आमची खोटी करू नकोस ". शेठजी म्हणाले.                                                                            " शेठजी! आपण म्हणता ते अगदी खरे आहे . पण मला काहीही नको. आपल्यासारख्या महापुरुषाचे दर्शन झाले हीच महत्त्वाची गोष्ट घडली. यापेक्षा मला काहीही नको." असे म्हणून श्रीकरने  चिंतामणी शेठजीच्या पुढे केला. अतिशय प्रकाशमान मणी पाहून शेठजीनी विचारले:" हे काय ? ".                                                             क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...