चिंतामणी भाग 2

Chintamani

                                                आईबापांनी तो सुधारावा म्हणून खूपच खटपट केली. पण त्यांना यश आले नाही.                                                                        एके दिवशी त्याची आई फारच रागवली. तिने जोरात एक चापट दिली व म्हणाली : ' पुरे कर तुझे चाळे. संपूर्ण दिवसभर ' भगवान ' ' भगवान ' म्हणत बसतोस व अभ्यास मुळीच करीत नाहीस अशा तऱ्हेने तू संपूर्ण जीवन फुकट घालवणार आहेस . तुला हा नंदिपती का खायला घालणार आहे ? होय ; पूजा, प्रभूभक्ती या सर्वाची गरज आहे.त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत पण त्यालाही काही मर्यादा आहे.                                                                            आम्हीसुद्धा प्रभुभक्ती नाही का करत ? तुझे हे वडीलही शिवभक्त आहेत. सारा गाव त्यांना भक्त म्हणतो . परंतू एवढ्याने काय जीवन व्यवहार सोडून द्यायचा असतो ? अभ्यास केला नाहीस तर मोठा होऊन तू काय करणार ? ' वडिलांनीही त्याला शेवटची समज दिली. सांगितले : " पहा श्रीकर ! तू आता मोठा झाला आहेस .तू आता रागंणारे लहान मूल नव्हेस. तुझे शिक्षकही तुझ्याविषयी तक्रार करीत होते: तू दररोज शाळेतून पळून येतोस. एखाद्या झाडाखाली बसून मातीत शिवलिंग तयार करून संपूर्ण दिवसभर त्याच्याशीच खेळत बसतोस. तुला खेळू नको कोण म्हणतो ? पण त्यालाही काही प्रमाण आहे की नाही ? जर उद्यापासून तुझ्याविरुद्ध तक्रार आली तर ती गोष्ट मला खपणार नाही".                                                                                            आईनेही कपाळावर हात मारून घेतला व म्हणाली :" हाय रे दैवा ! कुठून माझ्या पोटी असेल कार्ट जन्माला आले कोणास ठाऊक !" अशा प्रकारे आई वडीलांनी आपला असंतोष व्यक्त केला. मानवी मन किती विचित्र आहे ! स्वतःच्या फुटपट्टीने  दुसऱ्याला मोजते. त्या मापत बसला नाही की, समोरच्या व्यक्तीत विकृती आहे असे समजते.                                                                                                              श्रीकरचे आईबाप या नियमाला कसे अपवाद असणार ? जगाच्या महान आसक्ती त गुरफटलेल्या त्यांच्या मनाला आंतरभक्तिने रंगलेल्या मुलाच्या मनाची काय कल्पना येणार ? सर्वसामान्य आईबापप्रमाने त्यांनीही आपल्या मुलाला शिकण्याचाच उपदेश केला. "अभ्यास कर व मोठा हो. चार पैसे मिळव व संसार सुखी कर म्हणजे आमच्या हृदयाला शांती मिळेल ." अशा प्रकारची वृत्ती असणाऱ्या त्याच्या मनात श्रीकरच्या दिव्य भूमिकेची कल्पनाच कुठून येणार ?                                                                             माणसात हीच प्रबळ मनोवृत्ती दिसून येते. मुलगा शिकला नाही, शाळेत गेला नाही तर आईबापांना अतिशय दुःख होते. ते त्याला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. परंतू जर गीता वाचीत नसेल तर ? उपनिषदाची उपेक्षा करीत असेल तर ? ते म्हणतील " काय करावे ? अजून लहान आहे. त्याला कळत नाही. मोठा झाला की वाचील. नशिबात असेल तर गीता व उपनिषदे वाचील, इतकेच नव्हे तर वेदाचेही अध्ययन करील".                                                                                                        अशा प्रकारची उत्तरे प्रत्येक आईबापाच्या तोंडून आपण ऐकतो. याचे एक कारण असे आहे की , मुलगा जर शिकला तर चार पैसे मिलविल. शिकवण्यापाठीमागे हाच सरळ हेतू असतो. परंतु गीता वाचून काय मिळणार ? गीता वाचण्याचे फळ प्रत्यक्ष दिसत नाही .रुपये व पैश्यामध्ये त्याचे मूल्य करता येत नाही परंतु त्याच्या वाचनाने व मननाने आचरणावर फार मोठा परिणाम होत असतो .                                                                                              दृष्टिकोन विशाल व्हायला विशाल दृष्टिकोन असलेलेच शिक्षण घ्यायला पाहिजे . यानंतर एका प्रात:काळी श्रीकर घर सोडून निघाला ज्या घरी स्वतःच्या भगवंताची उपेक्षा होते, जिथे प्रभुभक्तीचे आकलन नाही, तिथे जगायचे तरी कसे ? नाक दाबून जगणे कसे काय शक्य आहे ? श्रीकरचे मन मोहमाये पासून दूर दूर जात होते .                                                                               फिरत फिरत श्रीकर एका ऋषीच्या आश्रमात आला. तिथे मुले प्रभूची स्तोत्रे गात होती. चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करीत होती. सर्वत्र मंगल वातावरण होते.तिथे त्याचे मन स्थिर झाले. तो आंतर्भक्ती करीत होताच . इथे आल्यावर बहीर्भक्ती ज्ञान झाले .                                                      क्रमशः 

🎭 Series Post

View all