चिंतामणी भाग १

चिंतामणी

           चिंतामणी                                                                              "  तुम्ही ऐकलेत का ? हा बालक भगवान शंकराची पूजा करतो अन् पूजा पण कशी ? जणू मोठ्यांनाही लाजवील अशी ! काय तेजस्वी बालक आहे !                                            हा बालक आहे तरी कोण ? " " हे पूजा करण्याचे का वय आहे ? ज्या वयात घरोघरी जाऊन खेळायचे त्या वयात हा बालक भगवान शंकराची पूजा करतो, आराधना करतो अन् ती पूजाही काही तास चालते ! खरोखरच नवल करण्यासारखी गोष्ट आहे. " " त्यातही तो बालक गवळ्याचा मुलगा आहे. गेल्या जन्मातील कोणीतरी पुण्यशील व्यक्ती असली पाहिजे ". गावातील लोक जमून वर वर्णन केल्याप्रमाणे त्या गोप बालकाचे कौतुक करीत होते. त्याच्या भगवदभक्तीचे वर्णन करीत होते. विहिरीवर पाणी भरणाऱ्यामध्येही अलीकडे हा गोपबालकाचा कौतुकाचा व चर्चेचा विषय होता.त्या गोपबालकाच्या आईचा आनंद काय वर्णावा ?                                                                     आपला मुलगा लहानपणापासूनच प्रभुभक्तिकडे वळलेला आहे. याबद्दल तिच्या मातृहृदयाला अभिमान वाटत होता. आपल्या प्रसव वेदनाचे सार्थक झाले असेही तिला वाटत होते. हजारो वर्षापूर्वीची घटना आहे लोक सुखी व सात्विक होते. त्यांनी भोगवादी विचारसरणीला आपल्या जीवनात स्थान दिले नव्हते. याचा अर्थ भोगवादी विचारसरणीचा संपूर्ण अभाव होता असे नव्हे. परंतु तिचा फैलाव हळूहळू होत होता. खा .प्या मजा करा ही वृत्ती लोकांच्या जीवनात व्यापकपणे प्रविष्ट झाली नव्हती व त्यामुळेच ग्रामवासी त्या बालकाच्या स्तप्रवृत्तीचे व प्रभू भक्तीचे गुणगान करीत असत. त्या गोपपुत्राचे नाव होते : " श्रीकर ".                                                                                     परंतू मानव समाज एक विलक्षण वस्तू आहे प्रारंभी श्रीकराची प्रभुभक्ती अन् शिवपूजा लोक कौतुकाचा विषय झाला होता पण श्रीकर आता मोठा झाला होता. बोबड्या बोला ऐवजी तो आता स्पष्ट बोलू लागला होता.त्याच्या आईने त्याला एक दिवस बोलविले व सांगीतले: " श्रीकर ! तू आता मोठा झाला आहेस. तू आता ' भगवान ' ' भगवान ' असे कुठपर्यंत म्हणत बसणार ? तुला आता शाळेत जायला हवे." वडिलांनीही त्याच्या या वर्तनात विकृती आहे असे वाटू लागले. गावातील लोक त्याला ढोंगी भक्त म्हणु लागले.                                                                                                 एके दिवशी शुभमुहूर्त पाहून वडीलांनी श्रीकरचे नाव शाळेत दाखल केले. प्रभुभक्तित दंग झालेले श्रीकरचे मन शाळेत रमत नव्हते. त्याला तिथे भगवान दिसत नव्हता. चीद् घन स्वरूप भगवान शंकराला शाळेत स्थान नाही हे पाहून तो बैचेन होत असे. शिक्षकांना वाटले: ' हा मुलगा अध्ययन करणे कठीण दिसते. याचे मन चंचल आहे. याचे अभ्यासात लक्षण दिसत नाही. सहाध्यायी अभ्यासात पुष्कळच पुढे गेले. परंतू श्रीकर सुरुवातीला जिथे होता तिथेच अजूनही आहे. '                                    क्रमशः      

🎭 Series Post

View all