चिंब भिजलेले भाग.. 4 अंतिम

चिंब भिजलेले


राज्यस्तरीय करंडक कथामालिका फेरी
विषय:- प्रेम कथा
कवितेचे नाव:- चिंब भिजलेले भाग 4 अंतिम


आईबाबा... या ना.. मधु दोघांना आत घेते तसा अनिकेत पण पटकन पुढे होऊन हातातील पिशव्या आणि बॅग घेऊन आतमध्ये ठेवतो.


चिरंजीव सुधारले की काय सुनबाई?


बाबा तुम्ही आता या आणि आधी फ्रेश व्हा मग बोलू आपण.बाबा.. लग्न झाल्यापासून आमच्यात कुठलंच नातं नाही आणि यांनी माझ्याशी खरतरं पैशांसाठी लग्न केलं. व्हील वर नातवंड साठी अट बघितली आणि हा माणूस पैशासाठी माझ्यासोबत झोपायला पण तयार झाला. सॉरी बाबा मला माफ करा मी हे असले शब्द वापरते पण माझा नाईलाज आहे. जे नाही ते उगाच डोईजड का करू? यांचे बाहेर दुसऱ्या मुलीससोबत प्रेमसंबंध आहेत.


सुनबाई..माफ तर तू आम्हाला कर गं. याची थेरं आम्हाला माहीत होती पण सुधारेल म्हणून लावलं तुझ्याशी लग्न पण नशीब खराब त्याच. तो सुधारेल म्हणून व्हील मध्ये पण फेर बदल केले.


हो मधु माफ मर आम्हाला. हा सगळ्या गोष्टी ऐश्वर्या ने सांगितल्या होत्या पण तू सांगायची वाट पाहत होतो.


आई सगळं क्लिअर आहे तर मग मला एक गोष्ट सांगायची आहे. मला घटस्फोट हवाय.


नक्की घे. आता आम्ही तुला रोखणार नाही. आणि हे व्हील. सगळी जमीन आणि इस्टेट आम्ही मूलगी म्हणून तुझ्या नावे करतोय.


अनिकेत डोक्याला हात लाऊन बसतो.


मधूचा घटस्फोट होतो आणि त्या वाचक गर्दी मध्येच तिला तिचा जोडीदार भेटतो.


सारंग.... जो तिच्या लिखाणावर भाळला होता.

तिच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी त्याला सांगून दोघे त्यांच्या नात्याची सुरवात करतात. अनिकेतचे आईबाबा मुलगी म्हणून मधुचं कन्यादान करतात. अनाथ असलेल्या सारंग ला ऐश्वर्या बहीण म्हणून लाभते. पावसाच्या चिंब सरीत दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात होते.

समाप्त..

श्रावणी लोखंडे
जिल्हा:-पालघर




🎭 Series Post

View all