बालदिन

Childhood Is best Life

\"बालपणीचा काळ सुखाचा\"
\"लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा\"
\"आयुष्यातील सर्वांत सुंदर पान म्हणजे बालपण\"
बालपणा बद्दल किती छान लिहिले आहे!
खरचं प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर,सोनेरी क्षण म्हणजे बालपण...
अशाचं बालपणाचा दिवस म्हणजे 14 नोव्हेंबर.
म्हणजेचं \"बालदिवस\" किंवा \"बालदिन\"
बालदिनाची पायाभरणी 1925 मध्ये झाली होती
आणि 1953 मध्ये त्याला जगभरामध्ये मान्यता मिळाली.20 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी बालदिन साजरा करण्याची घोषणा केली.
अनेक देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर भारतात 20 नोव्हेंबर ऐवजी 14 नोव्हेंबर त्यांचा जन्म दिवस हा \"बालदिन\" म्हणून साजरा केला जाऊ लागला.
नेहरूंना लाल गुलाब आणि लहान मुले खुप आवडत असे.त्यांना प्रेमाने \"चाचा नेहरु\" म्हणतात.
नेहरू म्हणाले होते ,"आजची मुले उद्याचा भारत घडवतील,आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो ते देशाचे भविष्य ठरवतील."
मुले हे भारताचे भविष्य आहे.मुलांवरच उद्याचे भविष्य आधारित आहे. आजची मुले हे उद्याचे भावी नागरिक आहेत.मुले चांगल्या प्रकारे घडतील तेव्हाच उद्याचे भविष्य घडेल.मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात. मुलांची फुलाप्रमाणे काळजी घेणे,योग्य प्रकारे जतन करणे ,वाढविणे हे सर्वांचे कर्तव्य असते.
बालदिनानिमित शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुलांना आनंद देण्यात येतो. अनेक ठिकाणी अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलांना खाऊ आणि इतर साहित्य देवून बालदिन साजरा करतात.
गरीब,निराधार मुले यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करुन बालदिनाचा आनंद दिला जातो आणि घेतला जातो.
बालपण हे निरागस, निष्पाप, निःस्वार्थ असते.छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मानणार असत.बालपण म्हणजे ओल्या मातीचा गोळा....
जसा आकार,रंग रूप दिले जाईल तसे ते घडते...
भारतात तर अनेक गोष्टींत विषमता असल्याने अनेक मुले बालपणाच्या आनंदास मुकतात.
गरीबी, अज्ञान, अत्याचार, अन्याय, शोषण अशा अनेक गोष्टींत कित्येकांचे बालपण हरपते.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांना बालपणा चा आनंद घेवूचं देत नाही.
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून शाळेत टाकतात. वेगवेगळ्या कला ,चांगल्या गोष्टी शिकाव्या म्हणून मुलांना वेगवेगळे वर्ग यात गुंतवले जाते.आईवडील सांगतील त्याप्रमाणे रोजचे वेळापत्रक, आयुष्याचे नियोजन यामुळे मुलांच्या भावनांचा कोंडमारा होतो.फुल उमलण्या पूर्वीच कोमेजून जाते.
मुलांवर संस्कार करणे गरजेचे असते.त्यांना चांगले विचार, चांगली दिशा देणे हे पालकांचे कर्तव्य चं आहे.त्यांचे फक्त चांगले मार्गदर्शक व्हावे. सर्कशीतील रिंग मास्टरप्रमाणे वागू नये.
मुलांना त्यांचे बालपण स्वच्छंदपणे जगू द्यावे. अभ्यास, खेळ, छंद याचे नियोजन करून द्यावे, क्षमतेपेक्षा जास्त ,अवाजवी अपेक्षा त्यांच्या कडून करू नये,त्यांच्या तील गुण,क्षमता पाहून निर्णय घ्यावा.
आजकालच्या मुलांचे बालपण तर मैदानी खेळांपेक्षा mobile games, video games,T.V , Social media यातचं बंदिस्त झाले आहे.
घरातील वातावरण, शिक्षणपद्धती, विकासाकडे वाटचाल, काळाची गरज यामुळे की काय मुलांना ही हे सर्व आवडू लागते आणि पालकांचा ही मग नाईलाज होत असतो.
गरज आणि योग्य नियोजन याप्रमाणे आपण त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितले तर कदाचित मुले ऐकू शकतील....पण अगोदर पालकांनी ही जबाबदारी ने वागायला हवे नाही तर मुले आपल्या चं आई वडिलांचे अनुकरण करतात.
जर इमारतीचा पाया मजबूत असेल तर चं इमारत सर्व संकटाचा मुकाबला करून उभी राहते. बालपण हे पुढील आयुष्य रुपी इमारतीचा पाया असतो.त्यामुळे बालपणात झालेले संस्कार,जडणघडण पुढील आयुष्य घडवते आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इतरांसाठी, समाजासाठी, देशासाठी ही महत्त्वाचे ठरत असते.

या फुलरुपी बालकांना बालदिनाच्या दिवसाप्रमाणे रोज छान जपले,काळजी घेतली,आनंद दिला तर ते पण फुलांप्रमाणे आपल्याला आनंद देतील ,प्रसन्नता देतील....