काटेरी बालपण

Childhood With Difficult Efforts
कथेचं नाव-लहानपण देगा देवा!
शीर्षक-काटेरी बालपण

रम्य ते बालपण असं आपण म्हणतो. पण बालपण रम्य च असतं असं नाही. ते कधी काट्यांनी बोचलेलं, तर कधी निरागसतेने भरलेलं असं सुद्धा असू शकत.... नव्हे निरागसता हा तर बालपणाचा स्थायीभावच म्हणावा लागेल.

वसंतराव व वसुधाताई या आपला संसार नीट नेटका सांभाळायचा आटोकाटप्रयत्न करायच्या. त्यात त्यांनी आपल्या मुलांना खूप दूरच्या शाळे त शिकायला पाठवलं.
नीलू आणि अनिल दोघेही खूप लहान, म्हणजे अनिल दुसरीत व नीलू पहिलीतच होती. नीलू पहिलीत होती, कारण एके ठिकाणी घरावर जप्ती आल्यामुळे वसंत रावांना दुसरीकडे झोपडी वजा घर बांधून आपला संसार थाटावा लागला होता. त्यामुळे पुन्हा नवीन शाळेत दोघांनाही शिकायला पाठवण्यात आलं.
शाळा घरापासून पाच किलोमीटर अंतरावर असेल. जाताना मधे स्मशानभूमी लागायची. तिथूनच जाये करावं लागे. त्याकाळी शहराची वाढ आता सारखी झालेली नव्हती. त्यामुळे रस्ता अतिशय शांत, कुठेच कोणी दिसणार नाही असा...
त्या रस्त्यावरून ही दोघेलहान मुले शाळेत दररोज जाणे येणे करायची.

एकदा असेच दोघेही अनिल आणि नीलू शाळेत जात असताना स्मशानभूमीमध्ये त्यांना दोन व्यक्ती येताना दिसल्या. एका व्यक्तीच्या हातात छोटसं बाळ लाल कपड्यात गुंडाळले लं. दुसरा व्यक्ती एक मोठी सुटकेस घेऊन या मुलांच्या समोरूनच येत होत्या.
हे दृश्य या दोघांनी पाहिलं. आणि दोघांचेही पाय थरथरायला लागले. ही मुले खूप घाबरली. आपण हे काय पाहत आहोत असं वाटलं. आणि तिथेच अनिलला चक्कर येऊन तो खाली पडला. ती दोघे व्यक्ती स्मशानभूमीत निघून गेलीत. नीलू ला काय करावे समजेना....
नीलू लहान असून तिने अनिलला कसं बस सावरलं. आणि शाळेत न जाता घराकडे परत अनिलला घेऊन निघाली. अनिल प्रचंड घाबरलेला होता. त्याच्या अंगात खूप ताप भरला. कसं बस घरी आणून त्याला झोपवलं.
दोन दिवस सारखा तापात तो बरळत होता. तरीही चार दिवसांनी शाळेत जाणं आवश्यक होतं. नंतर शाळेत जात असताना मनाची तयारी करूनच जावं लागे.

स्मशानभूमीच्या रस्त्यावरून जाणं त्यांच्यासाठी एक दिव्य च होतं.

अशी कितीतरी खडतर प्रसंग लहान मुलांवर येतात. काही लहान मुलांचं बालपण तर खूपच काटेरी असतं. आई वडील अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांच्या लहान मुलांचे बालपण खूपच करपले लं आढळतं.
अशी मुलं पाहून आपण अस्वस्थ होतो.

अशा लहान मुलांच्या भविष्यासाठी खारीच्या वाट्याचं योगदान असावं असं वाटते....


छाया राऊत.