चिकटवलेली अभिधानं भाग२(अंतीम)

A Story Of A Woman

 कथेचे नाव- चिकटवलेली अभिधानं

     कॅटेगरी   - राज्यस्तरिय कथामालिका

    सब कॅटेगरी - सामाजिक कथा     


           "सत्य एक दिवस समोर येतचं" या उक्तीप्रमाणे ते समाजासमोर आलचं . प्रसंग होता रेवाच्या माहेरी तिच्या मुलीच्या \"नामकरण विधीचा .\"


      राजशने दारू पिऊन कार्यक्रमात धिंगाणा

घातला . मनातले घाणेरडे विचार त्याच्या ओठावर आले," मुलगी झाली . तिचं काय नाव ठेवायचं .मला वंशाचा दिवा हवा होता . माझ्या उद्योगाला माझ्या मुलाचं नाव मला द्यायचं होतं "आमोद मसाले " . या कारटीला इथेच ठेवं . माझ्याघरी आणायचे नाही".


       रेवाच्या मनात विचार आला, "कळत कसं नाही या अविचारी माणसाला याला एका स्रीनेच जन्म

दिला .स्त्रीमुळेच यानी जग बघीतलं तरी याला मुलगी नको . किती दारिद्री विचाराचा नवरा मिळाला मला ".


          आलेले पाहुणे तमाशा पाहून जेवण न करताच निघून गेले . रेवाच्या बाबांना हदयविकाराचा झटका आला . तातडीने त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले . डॉक्टरांनी रेवाच्या वडिलांना मृत घोषित केले .


         वडिलांच्या मृत्यूनंतर रेवाची आई सतत आजारी असायची . दोघींच्याही जीवनात आनंद उरला

नव्हता . रेवाच्या माहेरी नोकर चाकर तिच्या आईची काळजी घ्यायचे तरीपण रेवाच्या आईची तब्येत दिवसें दिवस खालावत चालली होती . बाबांच्या दुःखातून रेवा पुरती सावरली नव्हती तर वर्षभरातच तिला आई सोडून गेली. 


         रेवाला माहेर उरलं नव्हतं . त्यात राजेशचा केवळ रेवाच्या संपत्तीवर डोळा . रेवाच्या नावानी गडगंज संपत्ती होती . राजेशचे उद्योगावर म्हणावे तसे लक्ष नव्हते . तो रेवाच्या संपत्तीवर ऐश करत होता .


         रेवाची पहिली मुलगी बघता बघता दोन वर्षाची झाली . राजेशने कधीच तिचा लाड केला नाही . कधी तिला नावानी हाक मारली नाही . ये पोट्टे असंच त्याचं बोलणं . रेवावरही शारिरिक अत्याचार करायचा . तिला सतत हाणून पाडून बोलून मानसिक अत्याचारही करायचा . दारु पिऊन आल्यावर लैंगीक अत्याचार तर नेहमीचाच . रेवा जीवनाला कंटाळली होती . ती मानसिकरित्या खचली होती .


        एम.बी.ए . झालेली मुलगी तिला कसलीच उजागरी नव्हती . राजेश म्हणेल तसं वागावं लागायचं सासु सासऱ्यांचा भावनिक आधार होता . राजेश क्रूर, वाईट विचारांचा माणूस होता . तो दारु प्यायल्यावर रेवाला नेहमीच भांडण उखरून काढून वाद घालायचा रेवा एक शब्द बोलली तरी तिला मारमार मारायचा . त्याचे आई बाबा रेवाला वाचवायला मध्ये पडले की त्यांनाही मारायचा . वाईट वृत्तीचा माणूस म्हणून कॉलनीतही बदनाम होता . त्याच्या वात्रट स्वभावामुळे कुणी त्याच्याशी बोलत नव्हते . त्याचाही दोष रेवाला दयायचा की तूच माझ्याविषयी लोकांना वाईट सांगतेस . त्यामुळे रेवा राजेशच्या धाकानी शेजाऱ्यांशी बोलत नव्हती घरातल्या घरातच राहायची .


       असेच दिवस जात होते . रेवा ईश्वराकडे राजेशला सुबुद्धी दे मागणं मागायची . रेवावर मानसिक, शारिरिक, लैंगीक, आर्थिक अत्याचार सुरुच होते . रेवाची सही घेवून रेवाची संपत्ती विकून राजेश सट्टा लावायचा . दरवर्षी काही ना काही विकायचा ह्या आर्थिक अत्याचारालाही रेवा कंटाळली होती . एक दिवस आपण रस्त्यावर येवू ही भीती तिच्या मनात होती .


       तिचे सासरे तिला एक दिवस म्हणाले," रेवा सर्वकाही तुझचं आहे .का अत्याचार सहन करतेस या नालायक नवर्‍याचे . तू मुलीला घेवून वेगळी राहा . आम्ही सोबत राहू तुझ्या ".


       त्यावर रेवा म्हणाली," नाही बाबा मी, बाबांना वचन दिलं होतं की दोन्ही घराची इज्जत राखण्याचं . त्याच्या मते, मुलीनी नवऱ्याचं घरं सोडणं म्हणजे सासर माहेर दोन्ही घराची प्रतिष्ठा धुळीला मिळणे . त्यांचा विचार चुकीचा असला तरी माझ्यासाठी वचन महत्वाचं . "


              अत्याचार करणाऱ्याची पापाची पायली भरली की, देवच त्याचा नाश करते . तसेच
काहिशे राजेशसोबत झाले .


           रेवाच्या लग्नाला दहा वर्षे उलटून गेले होते . रेवाची अत्याचार सहन करण्याची क्षमता संपली होती . अशातच एका रात्री अकरानंतर पोलीसांचा फोन रेवाच्या फोनवर आला . तुमच्या पतींचा अपघात झालाय . दवाखान्यात भरती केलयं ताबडतोब या .
सासू सासऱ्यांसोबत रेवा दवाखान्यात पोहचली . तालुक्यावरून राजेशचा मोठा भाऊ मनोजही आला . राजेश ऑन दि स्पॉटच गेला होता . त्यानी ज्यांचा गाडीला ठोस दिली होती त्या गाडीतील दोघं गंभीर जखमी झाले होते .
त्यातील एक किरकोळ जखमी झाला होता .
त्यानी घडलेली हकीकत सांगीतली ,
राजेश बारमधून पिऊन निघाला, तशी त्याची वेगात असलेली गाडी आमच्या गाडिला येवून धडकली . त्यानंतर जे झाले ते तुम्ही बघतच आहात .


                  राजेशच्या मृत्युचे दुःख त्याच्या आईवडिलांनाही झाले नव्हते एका राक्षसाच्या तावडीतून त्यांची सुटका झाली होती . त्यांना काळजी होती ती त्यांच्या सुनेची . ति राजेशच्या अत्याचारांनी मानसिकरित्या खचली होती . तिच्यात आत्मविश्वास उरला नव्हता . पुढे हीचे कसे होईल अशी त्यांना चिंता वाटत होती . गेल्या दहावर्षापासून घरात डांबून ठेवलेल्या रेवाचं कसं होईल ? त्यांना प्रश्न पडला होता 


          महिनाभरातच रेवा तिचा व्यवसाय सांभाळायला लागली . पाच वर्षात रेवानी पवार मसालेंना एवढया उंचीवर नेवून ठेवले की, यावर्षी तिला "उद्योजिका ऑफ दि ईयर " पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले .


        रेवानी सत्काराला उत्तर देतांना तिच्या संघर्षाची गाथा सांगतांना म्हटले की, माझा नवरा मला सतत हिणवायचा, "तुला काही समजत नाही ." मला असे विचार बाळगणार्यांना सांगावसं वाटतं ,


" तुला काही समजत नाही हिणवून
करू नका स्त्रीचा अवमान….!
स्त्रीनेच घडविले जगात ओळखल्या,
जाणारे सर्व व्यक्ती महान……!! "


         आपण सर्वजण माणूस म्हणूनच जन्माला आलोय . पुरुषप्रधान समाजानी स्वार्थासाठी
स्त्री माणूस व पुरुष माणूस असा लिंगभेद
केला . याही पुढे जावून स्रीच्या नावापुढील माणूस काढून टाकून बाई व माणूस अशी अभिधानं बोलण्यातून प्रचलित झाली . मग बाई बाईच झाली ती माणूस राहिली नाही . तिच्याकडे भोगवस्तू म्हणून पाहिल्या जातयं आजही तीच स्थीती आहे. काही प्रमाणात झालाही असेल बदल परंतु कित्येक स्त्रीया आजही शारिरिक, लैंगीक, मानसिक अत्याचाराला बळी पडतात.

        पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकतेने स्री मानसिक दृष्ट्या . परावलंबी झाली ती परावलंबी नसून तीची मानसिकता परावलंबी आहे मानसिकता बदलली की प्रत्येक स्त्री ही एक शक्ती आहे . नवरात्रातील नऊ देव्या स्त्रीचचं प्रतिक आहे ना ?



           अठरा हाताची जगदंबा देवी हे स्त्री शक्ती स्वरूप आहे. स्त्री एकावेळी अनेक आघाड्यावर काम करू शकते ह्याचं प्रतिक आहे.
तिला मोकळे आकाश मिळाल्यास घरात डांबून न ठेवल्यास ती संस्कार सांभाळून आकाशी उंच झेप घेवू शकते हे कित्येक स्रीयांनी सिद्ध करून दाखविले आहे.


        " संस्कृती आणि कर्तृत्वाचा,
         निर्धार तिचा…..!
        निर्धार तिचा संस्कृतीला जपून,
        आकाशी झेप घेण्याचा….!!"


         स्वतःला सिद्ध करण्याची संधी तिला दया नंतरच श्रेष्ठ- दुय्यम, कमजोर- ताकदवर,
भित्री- धीट, परावलंबी- स्वावलंबी अशी पुरुषी व बायकी अभिधानं कर्तृत्वानी चिकटवा. लिंगभेद करून स्त्रीला परावलंबी हे अभिधान चिकटवणं बंद करा . हीच आज माझी या सभागृहाला विनंती आहे. कर्तृत्वान स्रियांचा खरा पुरस्कार हाच की समाजानी आपली विचारधारा बदला .


        " स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी,
        देवू चला मुलांसारखीच मुलीला…!
      श्रेष्ठ- दुय्यम कर्तृत्वानी ठरवावं ,
        थारा न उरावा भेदभावाला…!!"

       ही विचारधारा मनी रुजवा तोच मी माझा खरा
पुरस्कार समजेल .
रेवाची जीवनगाथा व तिचे विचार ऐकूण सभागृह विचारमग्न झालं….

समाप्त !


    कशी वाटली रेवाची गाथा कमेंन्ट करून जरूर सांगा . लाईक व शेअर लेखिकेच्या नावासह करा .

खरंच स्त्री परावलंबी आहे का? अभिप्राय द्या .

तुमच्या अभिप्रायान माझं लिखान समृद्ध होतं .


धन्यवाद !

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे

       टीम - अमरावती
 












🎭 Series Post

View all