माय रेसिपी... चिकन चटपटीत...!!

My Receipi

*माय रेसीपी *


चिकन टिक्का,हा डिश खूपच लोकप्रिय आहे...अन् त्यानंतर चिकन_65. डिश ही लोकांच्या बराच पसंतीस पडला.चिकन टिक्का हा प्रकार ज्याला आपण सुक्क चिकन म्हणतो ना त्या टायीप मध्ये येतो. आणि त्याचा तंदुरी सारखा स्मोकी फ्लेवर खाण्याच्या शौकिनाना भारीच आवडतो.पण चिकन 65 हा प्रकार पूर्ण पने डीप फ्राय असतो.त्याचा तेलकट पणा ही कधीतरी चेंज म्हणून छान वाटतो.


आता सूक्क चिकन सारखं तर खायचं आहे अन् चिकन ला स्मोकि फ्लेवर,किंवा जास्त डीप फ्राय तेलकट पना नको असेल तर काय करायचं....
मग मी या सारखाच तिसराच डिश कसा बनवायचा ते ठरवते....
आम्हाला सगळ्यांना हा "चिकन चटपटीत", म्हणून आवडतो...
म्हणजे जास्त स्मोकी पण नाही,अन् तेलकट पण नाही,जास्त मसाले अन् खुप वेळ ही लागत नाही.


चपाती,साधा वा फ्राईड भात,पाव ,असेल तर पटकन तयार होणारा ,चिकन चटपटीत इज माय फेवरेट...!!!
घरामध्ये ऑल टाइम उपलब्ध असलेले मसाले म्हणजे..थोडंसं लाल तिखट, चवी नुसार मीठ,थोडासा कांदा लसूण मसाला,हळद,जिरे पावडर,धने पावडर, आणि आले लसूण पेस्ट.!!!


चिकन ला स्वच्छ धूतले,की चांगल्या उकळत्या पाण्यात उकळून घ्यायचं,हे पाणी पूर्ण काढून टाकायचे,चिकन परत एकदा साध्या पाण्याने धुऊन घ्यायचे.सगळा सुक्का मसाला छान मिक्स करून,चिकन ला चोळून घ्यायचा,थोडंसं लिंबू यावर पिळून ,झाकण घालून पाचसात मिनिटं मुरवत?? ठेवायचं,आता थोडस तेल चांगले गरम झाल्यावर हे मसाला लावून ठेवलेले चिकन चांगले परतवून घ्यायचे.मंद गॅसवर असताना चिकन ला मस्त कलर आला की व्यवस्थित मऊ झालं की ,असे "चटपटीत चिकन",जेवणाला चटकदार चव आणते...!!- **Sush**