छोले भटुरे Recipe in Marathi

गरमागरम छोले आणि टम्म फुगलेले भटुरे सगळ्यांना आवडतात


छोले भटुरे

       छोले भटुरे म्हटलं की सगळ्यांना खूप आवडतात. गरमागरम छोले आणि टम्म फुगलेले भटुरे, आहाहाहा आत्ताच खावेसे वाटताय ना. सगळ्यांचे आवडते गरमागरम छोले भटूरे, चला वळूया रेसिपीकडे

साहित्य : छोले पावकिलो, दोन चमचे चहा पावडर, एक चक्रफूल, प्रत्येकी चार लवंग मीरे, एक दालचिनीचा तुकडा, दोन तेजपत्ताची पाने, दोन कांदे बारीक चिरलेली किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करुन घेणे, दोन टोमॅटोची प्युरी, दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, आलं लसून पेस्ट दोन चमचे, दोन चमचे लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, दोन चमचा धना जीरे पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा आमचूर पावडर, हिंग, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल.

कृती : छोले रात्रभर पाण्यात भिजत घालणे.  नंतर कुकरमध्ये छोले घालून दोन चमचे चहा पावडर एका कपड्यात बांधून त्याची पोटली करुन त्यात घालणे.  तेजपत्ता, लवंग, चक्रफुल, चिमूटभर खायचा सोडा आणि मीठ घालून चार शिट्ट्या काढून छोले मऊ शिजवून घेणे.

आता कढईमध्ये तेलात लवंग, मीरे, जीरे, दालचिनी घालून कांद्याची पेस्ट घालून एक दोन मिनिटे परतवणे. आता त्यात आलं लसून पेस्ट घालून परतवणे. आता त्यात टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतवणे. नंतर त्यात सगळे कोरडे मसाले घालून परतवणे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतवले कि त्यात वाफलेले छोले घालून एकत्र करणे. वाटीभर छोले थोडे कुस्करून म्हणजे बारीक करुन घालणे जेणेकरून आपली ग्रेवी घट्ट होईल. आता त्यात चवीनुसार मीठ घालून छान एकत्र करणे. आता छोल्याच शिजवलेल पाणी घालून पाच दहा मिनिटे चांगले उकळून देणे.
आता दुसऱ्या पॅनमध्ये तेलात लसूण बारीक चिरून घालणे. लसूण गुलाबीसर झाला कि त्यात एक चमचा आलं किसून घालणे. आता हिरवी मिरचीचे तुकडे घालून परतवणे. नंतर त्यात अर्धा चमचा लाल मिरची घालून हा तडका छोल्याच्या भाजीवर घालून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.


भटूरे

साहित्य : अर्धा किलो मैदा, अर्धी वाटी आंबट दही, तीन चमचे बारीक रवा, दोन पळ्या तेल, मीठ अर्धा चमचा, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि तळण्यासाठी तेल.

कृती : मैद्यामध्ये हे सगळे साहित्य घालून पीठ छान  मळून घेणे. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मळायच. त्याला तेल लावून वरतून ओल्या कापडाने झाकून अर्धा तास भिजत ठेवणे. आता छोटे छोटे गोळे करून पुरी प्रमाणे लाटून घेणे. भटूरे गरम तेलात मिडियम फ्लेमवर छान गुलाबीसर तळून काढणे.
आपले छोले आणि भटुरे दोन्ही पण तयार आहे. यासोबत मस्त कांदा आणि काकडीची कोशिंबीर घ्यायची.

किचन तुमचे आणि रेसिपी माझी.

खात रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा, ते लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.

धन्यवाद


सौं तृप्ती कोष्टी


🎭 Series Post

View all