छडी लागे छम छम

Chhadi Lage Chham Chham

***** गोष्ट छोटी डोंगराएवढी *****

                      छडी लागे छम छम 

  छडी लाग छम छम 

  विद्या येई घम घम

 छम छम छम

 **** जीवन शिक्षण विद्या मंदिर ****


जीवनातील पहिली शाळा. शाळेच्या गेटच्या समोर दिसायच्या छोट्या गडा सारख्या २५ -३० उंच पायऱ्या.

  ( खरच विद्येच्या मंदिरात जातांना पहिल्या पायरीच्या पाया पडायच्या राहून गेल्या, जश्या मंदिरात जातांना पहिल्या पायरीच्या पडतो.)

जसा घराचा पाया पक्का असला की वरचे घर डौलात उभे राहते तसेच प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का असला की नक्कीच पुढचे शिक्षण छान होते.

शाळेतले गुरुजी आणि बाई सगळे विषय खूप छान सोप्या पद्धतीने समजून शिकवत. त्याच्या सरावही खुप घेत त्यामुळे विषय पक्का होत असे.

घरचा अभ्यास तपासतांना हमखास हातात दिसायची छडी. कोणी उगीच अभ्यास केलेला नसेल त्याला  तर छडी चा प्रसाद मिळायचा.

कुणाला छडीचा प्रसाद मिळाला कि बाकी मुलं ते बघुन किंवा घाबरून ही अभ्यास करत.

पाढे पाठ करायला सांगितले असले आणि पाढे पाठ नसले की तेव्हा ही छडी राहायची मुलांचे पाढे बघायला./ पाठ करून घ्यायला.

PT (physical education) कसरत कधी कधी छडी ची जागा झाडाची ओली काडी घ्यायची. कुणी आळस केला / जास्त मागे पुढे केल की पडायची .

बाई आणि गुजींच्या हातात कधी कधी छडी दिसायची. कधी छडी खाऊन, कधी तिला घाबरून अभ्यास केला. आणि आम्ही घडलो .आजच्या पिढीला शिकऊ शकतो आहे .आमच आयुष्य खूप छान झाल आहे.

बाई ,गुरूजी ,अशा सगळ्या गुरूंना ज्यांनी खरच खूप चांगले धडे दिले /शिकवले ,पाठीवर शाबासकीची थाप दिली, चुकांना समजून सांगितले अश्या सगळ्या गुरूंना गुरूपोणिमा  निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.

     **** त्रिवार वंदना ****