Sep 30, 2022
// rablogging.com_GGINT //
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

चेहरा

Read Later
चेहरा

विषय - स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो ?

 

शीर्षक - चेहरा

 

शांता आणि तिची मोठी बहीण कांता आज भलत्याच आनंदात होत्या. कारणही तसेच होते. कांताच्या मोठ्या मुलाचे उद्या लग्न होते. गेले वर्षभर ती आणि तिची लहान बहीण मिळून वरुण साठी लायक मुलगी शोधत होत्या. आणि शेवटी त्यांना आपल्याच शहरात मुलगी मिळाली. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी परिस्थिती झाली होती. दोघीही बहीणी खूप समाधानाने हसल्या होत्या जेव्हा त्यांना सुकन्या सून म्हणून गवसली ते पण आपल्याच शहरात....काय धावपळ करत होत्या. गावोगावी मुली बघण्यासाठी फिरत होत्या. दगदग करुन घेत होत्या. पण ते सारे एकदाचे थांबले. मनाजोगती सूनबाई मिळाल्यावर. आणि मोठी बहिण कांता ही लहान बहिण शांतालाच सगळं क्रेडीट देत होती. आज तिच्या मुळेच मला एवढी छान सून मिळाली म्हणून तिचे आभारही मानत होती. शांता तिच्यावर रागावली पण, काय ताई तू पण, अगं तुझा मुलगा तो माझा मुलगा...माझं कर्तव्यच होतं ते, बस सगळा सोहळा सुखात पार पडो म्हणजे कमावले. तिने कांता ताईच्या गळ्यात पडत म्हंटले. 

 

गेले महिनाभर कांता सोबतच शांताही तिला लग्नाच्या खरेदीत घरकामात, लग्न समारंभाचे प्लॅनींग करण्यात, सगळ्यात तिने मदत केली. घरातील सगळेच दोघींनाही "वेड्या" म्हणत होते. एवढ्या त्या सुनबाईला घेऊन एक्साईट होत्या. कांताचे पती एका कंपनीत जाॅब करायचे. घरची परिस्थिती चांगली होती. थोडी शेतजमीनही होती. त्यामुळे सगळं छान चालल होतं. त्यानंतर त्यांना दोन वर्षाच्या अंतराने दोन मुलं झालीत. राजा राणीच्या संसाराला चार चाँद लागलेत. त्यातही दोन्ही मुलं अत्यंत हुशार, शांत, संयमी, मृदूभाषी. आईवडीलांचे ऐकणारे. त्यामुळे नातेवाईक आणि आजूबाजूचेही त्यांच्या परिवाराचे नेहमीच कौतुक करीत. दोघेही अभ्यासात हुशार म्हणून आईवडीलांना विशेष कौतुक. 

 

लवकरच वरुणला चांगल्या पॅकेजची नोकरी लागली. पहिल्या पगारात मग वरुण आईबाबा आणि लहान भाऊ रक्षित साठी कपडे घेऊन आला होता. पगारही बाबांच्या हातावर ठेवला. पण बाबांनी पगार न घेता त्याला त्याच्या खात्यातच पैसे ठेवायला सांगितले. एवढा गुणी लेक, मग अश्या मुलाचे लग्नं म्हणजे आपण कल्पना करु शकतो....आईवडील किती आनंदी असतील त्याच्या लग्नासाठी. आणि सूनबाईला घेऊनही त्यांच्या खुप अपेक्षा होत्या. 

 

साग्र संगीत सगळे विधी पार पडलेत. बस उद्याचे लग्नही निर्विघ्न पार पडो. कांता शांताने देवा जवळ मनोमन प्रार्थना केली.

 

दुसरा दिवस उजाडला. पहाटे पासून घरात लगबग सुरु झाली. एकाच शहरात असल्यामुळे तशी घाई नव्हती. बरोबर मुहूर्तावर सगळे वाजत गाजत नाचत वधू मंडपी, म्हणजेच हाॅलवर गेलेत. वधूपक्षाकडील मंडळींनी छान, रिती नुसार स्वागत केले. साग्र संगीत मानपान करत आनंदाने लग्न सोहळा पार पडला. घरातील सत्यनारायणाची पूजा आटोपली. घरी आलेले पाहूणे एकेक परतले. कांताने शांताला अजून दोन दिवस थांबवून घेतले. मुलांची "शेज" सजवायला.

 

तो दिवस आला. काही विधी करुन सजवलेल्या बेडरुम मध्ये सुनबाई सुकन्याला पाठवले. साडी नेसलेली दागिण्यांनी मढलेली, दोन्ही हातांवर पायांवर मेहंदी काढलेली. हळदीने माखलेली सुकन्या तेजस्वी दिसत होती. सुंदर दिसत होती. वरुण तिला निहारतच होता. तेव्हढ्यात तिचा मोबाईल वाजला.

तिने वरुण कडे बघितले, जणू त्याची परवानगी मागत होती ती. त्यानेही डोके हलवून उचल फोन म्हंटले. तिच्या चेहर्‍यावर हास्य उमलले. आनंदाने तिने आलेला विडीओ काॅल उचलला. हेड सेट कानाला लावला आणि बोलू लागली. पलिकडून अंधार होता. बहूदा लाईट बंद केलेला असावा. खुप आनंदाने सुकन्या आपल्या मैत्रिणीला बेडरुम दाखवत होती. वरुणला पण दाखवले तिने. स्वतः ती कशी दिसते, तिची साडी कशी आहे. ते ही तिने आरश्या समोर मोबाईल पकडून दाखवले. मेहंदी पण दाखवली. आणि बराच वेळ गप्पा मारुन फोन ठेऊन दिला. मग वरुण जवळ येत तिने सांगितले. तिची लग्नाला येऊ न शकलेली ती मैत्रिण होती. तिची बेस्ट फ्रेंड...!

 

नवपरिणीत जोडप्यांची जशी रात्र जायला हवी तशीच वरुण सुकन्याची रात्र गेली. दोघेही एकमेकांवर जाम खुश होते. काही दिवस फिरण्यात गेले. सुकन्याची बेस्ट फ्रेंड तिला अधून मधून विडीओ काॅल करायची. मग ती बराच वेळ तिच्याशी बोलायची. इकडे आईपण सूनेच्या येण्याने आनंदी होतीच. तिला हवे नको सगळ्याकडे कांताचे लक्ष असायचे. रक्षितही वहिनी सोबत मनसोक्त गप्पा मारायचा. वरुण तर, ती जीवनात आल्यावर जणू तृप्त झाला होता आणि अधिक समजदार शांत भासत होता. 

 

पंधरा दिवसांची सुट्टी संपली. सुकन्यालाही आॅफीस मध्ये जायचे होते. उच्च शिक्षित, सुस्थावर घरातील सुकन्या एका कंपनीमध्ये अॅडमिनीस्र्टेशन मध्ये जाॅब करायची दोन तीन वर्षांपासून. 

 

दोघेही आपापल्या आॅफीस मध्ये जाऊ लागले. वेळेत घरी यायचे. परिवारासोबत दोघांचेही दिवस मजेत चालले होते. तिच्या मैत्रिणीचा विडीओ काॅल तर रात्री ठरलेलाच असायचा. पण घरी कुणाला काही तक्रार नव्हती त्याबाबतीत.

 

एकदा आॅफीसच्या कामाने सुकन्याला मुंबईला जायचे होते. तशी तिची इच्छा नाहीये वरुणला सोडून जायची, हे तिने त्याला सांगितले. पण वरुणने तू जा, काही हरकत नाही म्हणून सांगितले. आॅफीसमधले सहकारी महाबळेश्वरला फिरायला तिथून जाणार आहेत. पण मी परत येते मुंबईतून असे ती म्हणाली. त्यावर वरुणने तिला, तू पण सगळ्यांच्या सोबत फिरायला जा. आणि सहकार्‍यां सोबत परत ये म्हणाला. मग आनंदाने ती मुंबईला जायला निघाली.

 

दोन दिवस झाले असतील तिला तिकडे जाऊन. इकडे रक्षित आपल्या आॅफीसचे काम करत असता अचानक त्याच्या लॅपटाॅप मध्ये प्राॅब्लेम आला. त्याला अर्जन्ट मध्ये काही क्लाईटंसना काही महत्वाची माहिती द्यायची होती. इकडे वरुण पण आपल्या लॅपटाॅप वर महत्वाचे काम करत होता. त्यांची नजर सुकन्याच्या लॅपटाॅप वर पडली.

 

रक्षितने लगेच तिला फोन लावला. आणि त्याला किती अर्जंट काम आहे ते सांगितले. सोबतच तिचा लॅपटाॅप वापरु का ते विचारले. तिनेही काही प्राॅब्लेम नाही. वापर माझा लॅपटाॅप असे म्हंटले. कोड सुद्धा त्याला सांगून दिला. 

 

रक्षितने लॅपटाॅप उघडून आपले काम केले. काही इमेल पाठवले. त्याचे काम झाल्यावर त्याला तिच्या काही इमेलने प्रभावीत केले. आणि उत्सुकते पोटी त्याने काही वाचलेत. त्यानंतर त्याची उत्सुकता अजून वाढली. मग त्याने काही खटपटी करुन तिची पिक्चर फाईल ओपन केली. नंतर काही विडीओ होते ते बघितलेत. स्क्रिन शाॅट्स पलिकडून आलेले ते बघितले. तो घामाघूम झाला होता सगळं बघून...!

 

वरुणचे लक्ष त्याच्याकडे गेले. अरे असा काय बघतोस लॅपटाॅप कडे? काय झाले तुला एवढा घाम आला? काही प्राॅब्लेम आहे का...? त्याने काळजीने रक्षितला विचारले.

 

"दादा हे बघतोस का फोटो, विडीओ, मेल....."

"का बरे?"

"अरे वहिनीचे आहेत...."

"बॅड मॅनर्स...तुझं काम झालं असेलं तर बंद कर तिचा लॅपटाॅप."

"अरे दादा बघ तर खरे, तू बघितले पाहिजे..."

तो पटकन लॅपटाॅप, वरुण समोर ठेवतो. "बघ फोटो, विडीओ..."

सुकन्याच्या पहिल्या रात्रीचे जेव्हा तिच्या मैत्रिणीने विडीओ काॅल केला होता तेव्हाचे स्क्रीन शाॅट तिच्या मैत्रिणीने पाठवलेले. हसून वरुण म्हणाला," ह्यात काय एवढे...." फोटो पुढे पुढे पुढे तो सरकवत बघत होता. आता मात्र त्याचे डोळे विस्फारले होते....मेल वाचून झाले. विडीओ बघून झाले....आणि वरुण गप्प झाला एकदम...त्याला काय बोलू आणि काय करु काहीच कळेना...!

 

रक्षितने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. घळाघळा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डोकं गच्च पकडून तो हमसाहमशी रडू लागला. रक्षितने आईबाबांना बोलावले. आधी तर त्यांना कळतच नव्हते काय झाले ते. रक्षितने काय झाले ते सांगितले. त्यांनीही फोटो विडीओ बघितले पण बाबा तर मधूनच उठून गेले बाहेर. ते नाही पाहू शकले विडीओ आणि फोटोपण...!

 

काय होते त्या फोटो आणि विडीओ मध्ये....?

त्या विडीओ मधली मुलगी, सभ्यपणाचा आव पांघरुण आपल्या माहेरचे संस्कार विसरुन, सासरच्यांची फसवणूक करणारी एक स्त्री, आपल्या विवाहीत मुलबाळ असलेल्या, वयस्कर बाॅसच्या इशार्‍यावर, तो सांगेल तेव्हा आणि तशी, आंघोळ करताना, नग्न होऊन पोज देत होती. तो सांगेल त्या भागाचे त्याला विडीओ काॅलने दर्शन देत होती. तो मग तिचे स्क्रिन शाॅट काढून तिलाच दाखवायला पाठवायचा....... 

 

किती अवघड परिस्थिती होती ती. चकीत करणारी घटना आणि विश्वासाला तडा गेल्यामुळे नवर्‍या सकट घरचे सगळेच डोक्याला हात लावून बसले. कसे बसे सावरुन त्यांनी दोन दिवस धीर धरला. चवथ्या दिवशी ती परत आली. तिच्या आईवडीलांनाही कांताने तोपर्यंत बोलावले. तिचे फोटो, विडीओ सगळं त्यांच्या समोर ठेवले. थोडंफार बघून बाबा आणि तिच्या भावाने तिच्यावर हात उगारला. पण वरुणच्या बाबांनी त्यांना शांत केले. आईला तर एवढा राग आला. ती सर्वां समक्ष तिला खुप रागावली. शेवटी आपल्या रागाला तिने अश्रू वाटे भोकांड पसरुन बाहेर काढले. 

 

प्रतिष्ठित घरातली मुलगी सुकन्या...काहीच कमी नव्हते तिला तिच्या घरी आणि आता नवर्‍याच्या घरी पण. नंतर तिच्या आई वडीलांनी त्यांना हात जोडून पुर्ण परिवाराची माफी मागितली. तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या म्हणाले. आता वरुणने तिच्यासोबत रहायला नकार दिला आणि लवकरच डिवोर्स फाईल होऊन डिवोर्स झाला....! 

 

कुणीही जबरदस्तीने असे कृत्य करुन घेऊ शकत नाही.

आईवडीलांच्या विश्वासाला किती तडा द्यावा मुलींनी..?

मिळालेल्या स्वातंत्र्याचा असा किळसवाना वापर करावा..?

काय म्हणावे ह्या विकृतीला....?

सालसपणाच्या आत दडलेल्या चेहर्‍याला....

असे कृत्य करणार्‍या ह्या मुलीला आपण काय म्हणणार...?

आपली येणारी पिढी घडवणारी ही मुलगी.....!

एक माता.....मुलांवर संस्कार देणारी....!

काय जन्मास घालणार....काय म्हणावे...?

इथे आपल्या लघुकथेच्या विषयाची टॅग लाईन अगदी फिट्ट बसते....!

"स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो ?"

कुठे चुकतोय आपण...! खरेच, क्षणिक इच्छापुर्तीसाठी आपण हे काय पेरुन जातोय...! कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच...!

स्वतःच्या मनाला जरा आवरावे मुलींनी आणि मुलांनीपण !

सत्य घटना !

संगीता अनंत थोरात

08/08/22

ईरा राज्यस्तरीय करंडक लघुकथा

टीम:- अमरावती

०००

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now