चौकट मर्यादा आणि विश्वासाची

Gosht choti dongraevdhi..chaukat

"हो आई हो ,चुकल होत माझं खरच चुकल होत ग ,पण किती वेळा माफी मागायची ग मी," तोंडातून बोलत नसलो तरी रोज कोसतो ग स्वतःला,
रोज वाटत की कस काय वागलो मी,कस काय हात लावला दारूला, कसा गेलो वाहवत,पण ते पहिलं आणि शेवटचं होत ग,मला खरच जाण आहे माझ्या चुकीची,पण म्हणून का मला रोज रोज टोमणे मारणार का तुम्ही,१६ वर्षांचा अमेय जीव तोडून बोलत होता.
       ' दहावीला असणारा अमेय अभ्यासात खूप हुशार होता'.मित्र सुद्धा त्याला तसे कमीच.रोज शाळा ,अभ्यास याशिवाय विश्व नव्हत त्याच.असच एका मित्राच्या   वाढदिवसानिमित्त असलेल्या पार्टीत मित्रांच्या मोहाला बळी पडून त्याने थोड ड्रिंक केलं आणि घरी बवाल झाला.त्यालाही कळलं की मित्र घाबरट म्हणो किंवा काही ,चूक ते चूकच असत,आणि त्याने आई - बाबा ,आजी - आजोबा, मोठा दादा ह्या सगळ्यांची बऱ्याचदा माफी ही मागितली होती.
    "आज सहा महिने झाले त्या गोष्टीला पण काहीही घडल तरी अमेय ची दारू निघत असे."
    'माफी मागून चुका गायब होत नाहीत ,अमेय.' तुला अस बोलल तरच मर्यादेच्या चौकटीत राहायला शिकशील तू,अमेय ची आई उसळून म्हणाली.
    ' मर्यादेची चौकट????' आणि "विश्वासाच्या चौकटीच "काय ग आई?? ती तर कधीच पार केली तुम्ही."सगळेच आयुष्यात चुकतात ग,तुम्हीसुद्धा कधीतरी चूकले असालच ना..दादा ने सुद्धा एकदा खोटं बोलून बाबां कडून पैसे उकळले होते,त्याला चूक कळली आणि माफी देखील मिळालीच ना..मग मीच का.."सगळेच चुकतात ग पण त्या चुकीची जाण होण म्हणजेच प्रायश्चित्त ना ग"! अमेय बोलला.
'जशी मर्यादेची चौकट तू मला लावतेय,तशीच विश्वासाची चौकट का नाही ग'.."त्या साबळे काकू खोटं बोलताय ग तुझ्याशी,मी कुठेही पार्ट्या करायला गेलो नाही,"राहुलला अचानक चक्कर आली आणि म्हणून त्याला सोडवायला मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या कारण क्लास सुटल्यावर मी सरांना प्रॉब्लेम्स विचारायला थांबलो आणि राहुल त्याला बर नव्हत म्हणून त्याच्या बाबांची वाट पाहत होता,भले राहुलनेच मला त्या दिवशी ड्रिंक घ्यायला फोर्स केलं असल तरी आज तो आजारी होता ग आणि तुझ्या संस्कारानेच मला मदतीचं  बाळकडू पाजलय हे नाही विसरलो ग मी..म्हणून मदत केली त्याची आणि तेच साबळे काकूंनी तुला तेलमिठ लावून सांगितलं,आणि तू सुद्धा एकदाही काय झालं होत अमेय? अस एकदाही न विचारता मला साबळे काकूंच्या  सांगण्यावरून बोल लावलेस..तू का नाहीं जपलीस विश्वासाची चौकट आई?का?? " सार जग आपल्या विरोधात गेल तरी माझं कुटुंब माझ्या सोबत राहील,माझ्या चुका मला समजून सांगेल ,मी बरोबर असेल तर माझी बाजू ठामपणे जगासमोर मांडेल,यासाठीच प्रत्येक कुटुंबाला देखील विश्वासाची चौकट असते ना ग, तू का पार केलीस ती आई? सांग ना?"बोल आई बोल...."अमेयच बोलण ऐकून त्याची आई 'सुन्न 'झाली".बरोबरच तर होत त्याच,आजकाल मुल चुकतात त्यांच्याच चुकितून शिकतात देखील.त्यांना गरज असते ती फक्त कुटुंबाच्या साथीची.त्यांच्या विश्वासाची. "बाळा आम्ही आहोत" या शब्दांची,कारण मुद्दाम चुका कोणीच करत नाही, त्या होतात,जाण झाली की ,मुल सुधारतात देखील पण कुटुंबाने जर विश्वासाची चौकट मोडली तर मुल देखील मर्यादेच्या चौकटीतून अलगदपणे बाहेर पडतात त्यांच्या ही नकळत..म्हणून लोक काही बोलो आधी त्याची शहानिशा करा लगेच आपल्याच पोराला ' हे अस बोलले ' ' तुला अमुक नाव ठेवत ' 'तमुक अस बोलत ' आपल्या पाल्याला हिनवू नका.समजून घ्या.
       "अमेयच्या आईने काही न बोलता अमेय ला घट्ट मिठी मारली,"आणि ,अहो ,"साबळे वहिनी "ऐका ओ जरा...'असा आवाज देऊन ती दाराबाहेर पडली.
         मुलांनी मर्यादेच्या चौकटीत राहावं अस वाटत असेल तर आई बापानं देखील विश्वासाच्या चौकटीत राहण गरजेचं आहे.नाही का!