Mar 01, 2024
वैचारिक

छत्रपती

Read Later
छत्रपती

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज जयंती निमित्त मानाचा मुजरा ! 

        आज शिवजयंती उत्सव !  हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. मरगळलेल्या मनाला  उभारी येण्यासाठी घेतलेलं एनर्जी ड्रिंक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रम, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात वारा, वाघ आणि मराठे.

        छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास आपण सर्वजण जाणून आहोत या इतिहासाचा आदर्श आपण कितपत घेतो ? हा प्रश्न मात्र मनाला सतत खुणावत असतो. आपले आदर्श हे जयंती आणि पुण्यतिथी पुरते मर्यादित न राहता त्यांचे आचार आणि विचार आपण प्रत्यक्ष अमलात आणणे गरजेचे आहे. महाराजांच्या काळामध्ये शेतकरी राजा समाधानी होता आणि आता मात्र दररोज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे वाढलेले दिसते. त्याचप्रमाणे नजराणा म्हणून आणलेल्या सुंदर स्त्रीला महाराजांनी आईची उपमा दिली.  आणि आत्ताच्या काळामध्ये दिवसाढवळ्या स्त्रियांवर बलात्कार होताना दिसतात. अवाजवी बोकाळलेला भ्रष्टाचार हा कुठेतरी थांबला पाहिजे. नेतेमंडळींच्या हाती  आपण संपूर्ण राज्याची जबाबदारी टाकतो, तर ती जबाबदारी जनतेची  फसवणूक न करता योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे आहे. राजकीय व्यवस्थेमधील भ्रष्टाचाराची कीड नाहीशी होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली असे म्हणता येईल. 

    ??  शिवजयंती घराघरात  

     शिवविचार मनामनांत ??

      कुमारी - स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//