छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज


*छत्रपती शिवाजी महाराज*

उगवला सुर्य एक जेव्हा
शिवनेरी गड दुमदुमला,
जिजाऊच्या पोटी रत्न तो
बाळ शिवाजी हो जन्मला.

पाजता संस्कारी बाळकडू
लाभता शौर्याची शिकवण,
आई भवानीच्या चरणी केले
स्वरक्त वाहून शिवबाने प्रण.

स्वराज्यासाठी लढण्याचा
उचलला बालपणीच विडा,
मुठभर मावळे सोबतीला
तरी शत्रुंना शिकवला धडा.

जाती धर्माला नव्हता थारा
फुलविला समानतेचा मळा,
बंध जोडूनी जिव्हाळ्याचे
त्यांनी लावला रयतेला लळा,

जिंकले गड किल्ले युक्तीने
फडकला झेंडा भगवा त्यावरी,
छत्रपती महाराज शिवाजी
नाव हे गाजते सर्व भूवरी.

-----------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®